शास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या (कोणत्याही) विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला किंवा समजून घेण्यास शास्त्र असे म्हणतात. किंवा असे म्हणता येईल की, एखाद्या विषयाचास + अस्त्र म्हणजेच एखाद्या अस्त्राचा वापर करून केलेल्या सखोल अभ्यासाला शास्त्र म्हणतात.

फायदे[संपादन]

काही शास्त्रे अनुभवजन्य ज्ञानाच्या शोधात असतात व ते प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा वापर करतात. या शास्त्रांचा एक स्वतंत्र गट होतो. या गटातील शास्त्रांना विज्ञान हे नाव देता येईल. विज्ञान गटाबाहेर असणारी शास्त्रे उद्दिष्ट व पद्धती या दोन्ही बाबतींत विज्ञानांपेक्षा वेगळी आहेत.[१] गणित हे एक शास्त्र आहे. तसेच इतर विज्ञानातील उपपत्तीन्ची मांडणी करण्यात गणित उपयोगी पडते. त्याची कारणे दोन.

कोण्यताही उपपत्तीमध्ये एक भाग गणनेचा असतो. उदाहरणार्थ कालमापनात अमुक सेकंद, अमुक मिनिटे, अमुक तास, अमुक दिवस, अमुक महिने, अमुक वर्षे या साऱ्या संकल्पना संख्या वापरून व्यक्त करता येतात. संख्या हा गणितातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्याचप्रमाणे कोण्यताही उपपत्तीत विशिष्ट "space"[मराठी शब्द सुचवा]ची संकल्पना असते. "space" हा गणितातील दुसरा महत्त्वाचा विचार आहे. किंबहुना गणित म्हणजे "संख्या व space वापरून व्यक्त झालेला विचार" अशी गणिताची व्याख्या करता येईल.

संदर्भ[संपादन]