Jump to content

विकास पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकास पाटील
जन्म २४ सप्टेंबर, १९८२ (1982-09-24) (वय: ४२)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ - चालू
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चार दिवस सासूचे
लेक माझी लाडकी
बायको अशी हव्वी
बिग बॉस मराठी ३
वडील रेखा पाटील
आई बाळकृष्ण पाटील
पत्नी
स्वाती पाटील (ल. २०१०)
अपत्ये

विकास पाटील हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. तो चला खेळ खेळू या दोघे (२००९), सूत्रधार (२०१३), आणि तुझ्या विन मार जावान (२०१५) सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.[] चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी दूरचित्रवाणी इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे आणि लेक माझी लाडकी, माझिया माहेरा, मिसेस तेंडुलकर आणि बायको अशी हव्वी या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. २०२१ मध्ये, विकासने बिग बॉस मराठी ३ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला.[]

जन्म आणि प्रारंभिक जीवन

[संपादन]

विकास पाटील यांचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण पाटील आणि आईचे नाव रेखा पाटील आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी 'हमशकल' या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरे जावे लागले. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून त्यांनी थिएटर आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

विकासने एमएसएस हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्रात विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो सक्रियपणे मनोरंजन उद्योगात सामील झाला.

कारकीर्द

[संपादन]

विकासने २००८ साली प्रमोद समेळ दिग्दर्शित चल खेळ खेळुया दोघे या चित्रपटाद्वारे व्यावसायिक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटापूर्वीही तो अनेक वर्षे रंगभूमीवर सक्रिय होता. चित्रपटात काम केल्यानंतर त्यांना मालक, असा हा अतरंगी, तुझ्या विन मार जावान, मराठी टायगर्स, शेंटीमेंटल अशा अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

ईटीव्ही मराठीच्या प्रसिद्ध दूरचित्रवाणी शो चार दिवस सासूचे मधून विकासला प्रसिद्धी मिळाली. शोनंतर तिने झी मराठीच्या कुलवधू या शोमध्ये छोटी भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये, त्याला स्टार प्रवाहवरील लेक माझी लाडकी या शोमधून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या शोमध्ये तो साकेतच्या भूमिकेत दिसला होता. याअगोदर त्याने सुवासिनी, माझिया माहेरा, अंतरपाट मध्ये सुद्धा काम केले होते. २०२१ मध्ये त्याने बायको अशी हव्वी मध्ये मालिकेतही मुख्य भूमिका निभावली त्यानंतर तो बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाला आणि तिसरा मान पटकावला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bigg Boss Marathi 3: Vikas Patil turns emotional as he reveals how his 8-year-old son got bedridden - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Full list of Bigg Boss Marathi 3 contestants: Sneha Wagh, Sonali Patil and Vishhal Nikam join Mahesh Manjrekar show". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-21. 2022-01-25 रोजी पाहिले.