द्राविडी पक्ष
Appearance
द्राविडी पक्ष तमिळ: திராவிடக்கட்சிகள்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यांचे मूळ पेरियारच्या द्राविडी चळवळीमध्ये आहे. द्रविड भाषा वापरणाऱ्या दक्षिण भारतीय लोकांमध्ये उत्तर व मध्य भारतामध्ये वापरात असणाऱ्या हिंद-आर्य भाषासमूहामधील भाषा येत नसल्यामुळे उपेक्षेच्या भावना निर्माण झाल्या. ह्यामधून तमिळनाडूमध्ये स्वाभिमान चळवळ जागृत झाली ज्याचे रूपांतर राजकीय उद्देशासाठी झाले. १९४४ साली स्थापन झालेली द्रविडर कळघम हा पहिला द्रविडी राजकीय पक्ष मानला जातो. सध्या द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोन प्रमुख द्राविडी पक्ष असून गेल्या अनेक दशकांपासून तमिळनाडूच्या राजकारणावर ह्या दोन पक्षांचेच वर्चस्व आहे.
द्राविडी राजकीय पक्षांची नावे
[संपादन]- द्रविडर लीग (निवडणुकीत सहभागी होत नाही)
- द्रविडर लिबरेशन ऑर्गनायझेशन
- पी.एम.के.
- द्रविड मुनेत्र कळघम (DMK)
- अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK)
- डी.एम.डी.के. (DMDK)
- अम्मा मक्कल मुन्नेट्ट्र कळगम (AMMK)
- अखिल भारतीय महत्त्वाकांक्षी द्रविड मुनेत्र कळघम (LDMK)
- मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK)