इ.स. १९७५
Appearance
(इ. स. १९७५ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७२ - १९७३ - १९७४ - १९७५ - १९७६ - १९७७ - १९७८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी ५ - ऑस्ट्रेलियातील तास्मानियाच्या तास्मान ब्रिजला खनिजवाहू जहाज लेक इलावाराने धडक दिली. १२ ठार.
- जानेवारी १५ - ॲंगोलाला (राष्ट्रध्वज चित्रित) पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.
- फेब्रुवारी ११ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली.त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
- फेब्रुवारी २८ - लंडनमध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.
- मार्च ६ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली.
- एप्रिल १२ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.
- एप्रिल २१ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- एप्रिल २४ - स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.
- मे १२ - कंबोडियाच्या आरमाराने अमेरिकेचे एस.एस. मायाग्वेझ हे जहाज पकडले.
- मे १६ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.
- मे १६ - जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.
- जून ५ - सहा दिवसांच्या युद्धानंतर सुएझ कालवा पुन्हा खुला.
- जून १२- अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातून १९७१च्या लोकसभा निवडणुकीत झालेली निवड रद्द ठरवली.
- जून २१ - वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- जून २५ - भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै ५ - आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- जुलै ५ - केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- जुलै ६ - कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जुलै ११ - चीनमध्ये इ.स.पू. तिसऱ्या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.
- जुलै १२ - साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- जुलै १७ - अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
- जुलै २० - सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
- जुलै ३१ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियनचा नेता जिमी हॉफा गायब.
- ऑगस्ट ३ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.
- ऑगस्ट १५ - बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
जन्म
[संपादन]- जानेवारी ३१ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री
- एप्रिल १९ - जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- मे २ - डेव्हिड बेकहॅम, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
- मे १६ - निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ९ - अँड्रु सिमन्ड्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १० - स्कॉट स्टायरिस, न्यु झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै २१ - रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.
- डिसेंबर ३० - टायगर वूड्स, अमेरिकेचा महान गोल्फपटू
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ३ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री.
- फेब्रुवारी १४ - पी.जी.वुडहाउस, ब्रिटिश लेखक.
- फेब्रुवारी २४ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल १३ - फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल १७ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- मे २ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
- ऑगस्ट १५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर २ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- डिसेंबर ४ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
अज्ञात मृत्युदिनांक
[संपादन]- शंकर वासुदेव किर्लोस्कर - मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.