टायगर वूड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टायगर वूड्स
टायगर वूड्स

एल्ड्रिक टॉंट टायगर वूड्स (डिसेंबर ३०, इ.स. १९७५ - ) हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे. दोन वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत ९७ विजेतेपद मिळवले आहे. त्यात पीजीए टूर मधील ७१ विजेतेपदांचा समावेश आहे. द मास्टर्स, यु.एस. ओपन, द ओपन आणि पीजीए चॅंपियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून कारकीर्द स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.