हिंदू कालमापन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू कालमापनात कालगणना करण्याची नऊ माने सांगितली गेली आहेत.
- ब्राह्म- ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून
- दिव्य - देवांच्या वर्षादि मानावरून (देवांचे एक अहोरात्र = १ सौरवर्ष व ३६० अहोरात्र = १ दिव्य वर्ष)
- पित्र्य -
- प्राजापत्य -मन्वंतरगणनेवरून
- बार्हस्पत्य - गुरू या ग्रहाच्या राशीसंक्रमण कालावरून
- सौर - सूर्याच्या परिभ्रमणकालावरून
- सावन - एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस मोजून त्याप्रमाणे
- चांद्र - चंद्रभ्रमण, तिथी इत्यादींवरून
- आर्क्ष - नक्षत्रे, तारका इत्यादींवरून
यापैकी मनुष्यास उपयुक्त अशी चार माने आहेत-
- सावन
- सौर
- चांद्र
- नाक्षत्र
सौरवर्ष सौरमास चांद्रमास इत्यादींवरून ही कालगणना होते.
युगे
[संपादन]४,३२,००० या संख्येस ४,३,२,१ या संख्यांनी गुणले असता क्रमाने येणाऱ्या संख्येइतक्या सौरवर्षांची कृत युग(१७२८००० सौरवर्षे), त्रेता युग(१२९६००० सौरवर्षे), द्वापर युग(८६४००० सौरवर्षे), व शेवटी कलि युग(४३२००० सौरवर्षे) अशी चार प्रकारची युगे होतात.
या उपरोल्लेखित युगांची एकत्र बेरीज केली असता येणाऱ्या संख्येच्या सौरवर्षांएवढे 'महायुग' असते.
मन्वंतर गणना
[संपादन]या प्रकारे ७१ महायुगे झाल्यावर एक मन्वंतर होते.
कल्प गणना
[संपादन]४,३२,००,००,००० सौर वर्षांचे एक कल्प होते. हे १००० महायुगांबरोबर आहे.
ब्रह्मदेवाचा दिवस
[संपादन]ब्रह्मदेवाच्या अहोरात्र मध्ये ८,६४,००,००,००० इतकी सौरवर्षे होतात. ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य १०० वर्षे इतके कल्पिलेले आहे. या कालास 'महाकल्प' म्हणतात. त्यानुसार ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य ३१,१०,४०,००,००,००,००० इतकी सौरवर्षे आहे.[ संदर्भ हवा ]
कलि युगातील शककर्ते
[संपादन]वर्तमान कलियुगाचा प्रारंभ १७ फेब्रुवारी इसवी सनापूर्वी ३१०२ या रोजी झाला असे समजतात.[ संदर्भ हवा ]त्यानुसार त्याच्या प्रारंभापासून ३०४४ वर्षे युधिष्ठिर शक,त्यानंतर १३५ वर्षे उज्जयनीतील विक्रमाचा शक, नंतर, पैठणच्या राजाचा शालिवाहन शक वगैरे.
पहा : संवत्सर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |