दुराणी साम्राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| दुराणी साम्राज्य د درانیانو واکمني |
|
| इ.स. १७४७ - इ.स. १८४२ | |
|---|---|
| राजधानी | कंदाहार (पूर्वकालीन) काबूल (उत्तरकालीन) |
| राजे | अमीर: अहमदशाह अब्दाली (संस्थापक) अयूबशाह दुराणी (अंतिम अमीर) |
| भाषा | पश्तो (अधिकृत) दारी (प्रचलित भाषा) |
| क्षेत्रफळ | वर्ग किमी |
दुराणी साम्राज्य (पश्तो: د درانیانو واکمني ;) हे इ.स. १७४७ ते इ.स. १८४२ या कालखंडात अफगाणिस्तानात अस्तित्वात होते. इ.स. १७४७ साली अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने कंदाहारात त्याची स्थापना केली. इ.स. १७७३ साली अहमदशाहाचा मॄत्यूनंतर त्याच्या वंशजांकडे साम्राज्याचे अमीरपद चालू राहिले.
परमोत्कर्षाच्या काळात दुराणी साम्राज्य पंजाबापासून इराणापर्यंत व मध्य आशियातील अमू दर्या नदीखोर्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. इ.स. च्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीत असलेल्याओस्मानी साम्राज्याखालोखाल विस्तार पसरलेले हे दुसरे इस्लामी साम्राज्य होते. [१].
[संपादन] राज्यकर्ते
दुराणी साम्राज्याचे राजे अमीर या किताबाने उल्लेखले जात. साम्राज्याचा संस्थापक अहमदशाह अब्दाली याच्यानंतर त्याचे वंशज गादीवर बसले. कालक्रमानुसार त्यांची सूची अशी:
| नाव | कार्यकाळ |
|---|---|
| अहमदशाह अब्दाली | इ.स. १७४७ - इ.स. १७७२ |
| तिमूरशाह दुराणी | इ.स. १७७२ - इ.स. १७९३ |
| झमनशाह दुराणी | इ.स. १७९३ - इ.स. १८०१ |
| महमूदशाह दुराणी | इ.स. १८०१ - इ.स. १८०३ (पहिल्यांदा) इ.स. १८०९ - इ.स. १८१८ (दुसर्यांदा) |
| शुजाशाह दुराणी | इ.स. १८०३ - इ.स. १८०९ |
| अलीशाह दुराणी | इ.स. १८१८ - इ.स. १८१९ |
| अयूबशाह दुराणी | इ.स. १८१९ - इ.स. १८२३ |
[संपादन] संदर्भ
- ↑ द दुरानी डायनॅस्टी. लुई डुप्री, नॅन्सी हॅच डुप्री. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ऑनलाइन (इ.स. २०१०). २५ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- अब्दाली टोळीचा इतिहास (इंग्लिश मजकूर)
- दुराणी घराण्याची वंशावळ (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत