आसईची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आष्टीची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)
आसईची लढाई
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
आसईची लढाई
आसईची लढाई
दिनांक सप्टेंबर २३ १८०३
स्थान आसई, जालना जिल्हा महाराष्ट्र
विकीमॅपीया
परिणती ब्रिटीश विजय
युद्धमान पक्ष
मराठा संस्थानिक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
शिंदे
रघूजी भोसले (दुसरे)
आर्थर वेलेस्ली
सैन्यबळ
३००००घोडदळ
१०० तोफा
२०००० पायदळ सैनिक
४५०० घोडदळ
२० तोफा
४५०० पायदळ सैनिक
बळी आणि नुकसान
१२०० ठार व ४८०० जखमी ४२८ ठार ११५६ जखमी

आसईची लढाई मराठे व इंग्रज यांच्यात सप्टेंबर २३, १८०३ रोजी जालना जिल्ह्यातील आसई येथे झाली. यात मराठ्यांचे संख्याबळ जास्त असूनपण मोठा पराभव झाला.

पार्श्वभूमी[संपादन]

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूरग्वाल्हेर येथे गेलेले होते. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्यांच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. दुसऱ्या बाजीरावाचा होळकरांनी ऑक्टोबर २५, १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली. हा तह वसईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले.

मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली याने केले.

युद्ध[संपादन]

आसईच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना

इंग्रजांनी युद्धात उतरायचे ठरवल्या वर त्यांना मराठ्यावर आक्रमण करणे भाग होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम नागपूरच्या भोसल्यांवर प्रथम आक्रमण करावयाचे ठरवले.शिंद्यानी पण आपली सेना शत्रूला शक्यतो लवकर संपवावे यासाठी भोसल्यांच्या मदतीला आणली. मराठे व इंग्रज हे दोन्ही फौजा चांगले स्थळ व वेळेच्या शोधात होत्या. मराठ्याचे ४०-५० हजार नियमित सैनिक होते व बराच मोठा तोफखाना होता. मोठे संख्याबळ व तोफखान्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करु असा विश्वास मराठ्यांच्या सरदारांना होता तर वेलस्लीला त्याच्या शिस्त बद्द इंग्रज लष्करावर विश्वास होता. इंग्रज मराठ्याच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होती तर मराठ्याना अजूनही पारंपारिक गनिमी काव्याच्या पद्धतीवर विश्वास होता.

इंग्रजांचे सैन्य दोन मुख्य पलटणीत विभागले होते. एक पलटण घेऊन कर्नल स्टीवनसनने पश्विमेकडून चाल केली तर वेलस्लीने दुसरी पलटण घेउन दुसऱ्या बाजूने चाल करायचे व दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचे ठरविले. परंतु वेलस्लीला मराठ्यांची गाठ लवकर पडली. सप्टेंबर २३ १८०३ रोजी दोन्ही सेना आमने सामने आल्या.

मराठ्यांची सेना [[केळणा व जुई नदीच्या संगमापाशी स्थित होती. मराठे सेनापतींच्या अंदाजानुसार वेलस्लीला नदी ओलांडावी लागेल व त्याचा फायदा आपण घेऊ असा विश्वास होता. युद्धनीतीच्या दृष्टीने मराठे स्थिती वरचढ होती. वेलस्लीकडे सेना कमी होती तसेच कुमक येण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागली असती. परंतु वेलस्लीने आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याने कैतना नदीच्या कडे कडेने नदी कुठे पार करता येईल याचा अंदाज घेतला. स्थानिक वाटाड्यांनुसार जवळ कुठेही नदी उथळ नव्हती, परंतु आष्टीजवळ त्याला उथळ जागा सापडली. परंतु मराठ्यांनीपण वेलस्लीचे भारतीयांबाबतीत शिस्तीचे अंदाज चुकवले, वेलस्लीच्या फौजेला मराठ्याशी आमने सामने युद्ध करावे लागले. त्यामुळे ब्रिटीश फौजही अंदाजापेक्षा जास्त मारली गेली परंतु ७४ व्या व ७८ व्या हायलॅंडर तुकडीने मराठ्यांच्या सेनेचे कंबरडे मोडून काढले मराठ्यांची सेनेने पळ काढला. साधारणपणे ६००० मराठे सैनिक कामी आले. ब्रिटीशांचे १५०० सैनिक मारले गेले. वेलस्लीच्या वेलस्लीच्या मते त्याच्या कारकिर्दीतील त्याने लढलेले सर्वोत्तम युद्द होय.

कारणमीमांसा[संपादन]

मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे १,२०० जण ठार झाले तर इंग्रजांचे ४२८ जण. इंग्रजांची उच्च दर्जाची शस्त्रे व युद्धपद्धती यात कितीतरी पटीने इंग्रज वरचढ होते. तसेच मराठ्यांचे गनीमी काव्याचे तंत्र युरोपीयन आमने सामनेच्या युद्धतंत्रापुढे काम करु शकले नाही. मराठ्यांच्याकडे महादजी शिंद्यानंतर त्यांच्या तोडीचा सेनापती नव्हता त्याचे नुकसान मराठ्यांना झाले.

साहित्यात[संपादन]

बेनार्ड क्रॉमवेल यांच्या शार्पेज सिरीज अतंर्गत शार्पेज ट्रायंफ: रिचर्ड शार्पे अँड बॅटल ऑफ असायी, सप्टेंबर १८०३ मध्ये या युद्धाचे वर्णन आहे. यात रिचर्ड शार्पे वेलेस्ली यांचा मोठ्या बहादुरीने जीव वाचवतो असे वर्णन केले आहे.

संदर्भ[संपादन]

  • शार्पेज ट्रायंफ: रिचर्ड शार्पे अँड बॅटल ऑफ असायी, सप्टेंबर १८०३ -बेनार्ड क्रॉमवेल