क्योल्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्योल्न
Köln

Cologne montage.png
Koeln Flagge.gif
ध्वज
DEU Koeln COA.svg
चिन्ह
क्योल्न is located in जर्मनी
क्योल्न
क्योल्नचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°57′″N 6°58′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 50°57′″N 6°58′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३८
क्षेत्रफळ ४०५.१ चौ. किमी (१५६.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२१ फूट (३७ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर १०,२४,३७३
  - घनता २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
stadt-koeln.de


क्योल्न (जर्मन: Köln; इंग्लिश वापर: Cologne; कोलोन) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्गम्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथील क्योल्नर डोम नावाच्या कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध असणारे क्योल्न ऱ्हाइनलँड परिसरामधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

अंदाजे पहिल्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्योल्नवर इतिहासामध्ये अनेकदा फ्रेंचांनीब्रिटिशांनी सत्ता गाजवली. मध्य युगादरम्यान आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तरेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रांपैकी एक असलेले क्योल्न हान्से संघामधील आघाडीचे शहर होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून केल्या गेलेल्या असंख्य बाँबहल्ल्यांदरम्यान क्योल्नची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. युद्ध संपल्यानंतर जर्मन सरकारने येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुन्हा बांधण्याचे प्रयत्न केले.

आजच्या घडीला क्योल्न जर्मनीमधील एक आघाडीचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.

भौगोलिक रचना[संपादन]

क्योल्न शहर जर्मनीच्या ऱ्हाइनलँड भागात ऱ्हाइन नदीच्या किनाऱ्यांवर सुमारे ४०० चौरस किमी क्षेत्रफळाच्या भूभागावर वसले आहे.

हवामान[संपादन]

क्योल्न जर्मनीमधील सर्वात उबदार शहरांपैकी एक आहे. परंतु येथील हवामान वर्षामधील बराच काळ ढगाळ असते,

हवामान तपशील: क्योल्न-बॉन विमानतळ
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 16.2
(61.2)
20.7
(69.3)
25.0
(77)
29.0
(84.2)
32.4
(90.3)
36.8
(98.2)
37.2
(99)
38.8
(101.8)
31.7
(89.1)
27.6
(81.7)
18.7
(65.7)
16.6
(61.9)
३८.८
सरासरी कमाल °से (°फॅ) 5.4
(41.7)
6.7
(44.1)
10.9
(51.6)
15.1
(59.2)
19.3
(66.7)
21.9
(71.4)
24.4
(75.9)
24.0
(75.2)
19.8
(67.6)
15.1
(59.2)
9.5
(49.1)
5.9
(42.6)
१४.८३
(५८.७)
रोजची सरासरी °से (°से) 2.6
(36.7)
2.9
(37.2)
6.3
(43.3)
9.7
(49.5)
14.0
(57.2)
16.6
(61.9)
18.8
(65.8)
18.1
(64.6)
14.5
(58.1)
10.6
(51.1)
6.3
(43.3)
3.3
(37.9)
१०.३१
(५०.५६)
सरासरी किमान °से (°फॅ) -0.6
(30.9)
-0.7
(30.7)
2.0
(35.6)
4.2
(39.6)
8.1
(46.6)
11.0
(51.8)
13.2
(55.8)
12.6
(54.7)
9.8
(49.6)
6.7
(44.1)
3.1
(37.6)
0.4
(32.7)
५.८२
(४२.४७)
विक्रमी किमान °से (°फॅ) -23.4
(-10.1)
-19.2
(-2.6)
-12.0
(10.4)
-8.8
(16.2)
-2.2
(28)
1.4
(34.5)
2.9
(37.2)
1.9
(35.4)
0.2
(32.4)
-6.0
(21.2)
-10.4
(13.3)
-16.0
(3.2)
-२३.४
वर्षाव मिमी (इंच) 62.1
(2.445)
54.2
(2.134)
64.6
(2.543)
53.9
(2.122)
72.2
(2.843)
90.7
(3.571)
85.8
(3.378)
75.0
(2.953)
74.9
(2.949)
67.1
(2.642)
67.0
(2.638)
71.1
(2.799)
८३८.६
(३३.०१६)
सूर्यप्रकाश (तास) 43.0 74.0 101.6 151.8 184.1 177.0 184.3 179.5 134.5 103.8 53.1 40.3 १,४२७
संदर्भ: Data derived from Deutscher Wetterdienst[१]

अर्थव्यवस्था[संपादन]

क्योल्न शहरामध्ये लुफ्तान्सा कंपनीचे मुख्यालय तसेच फोर्ड, टोयोटा इत्यादी वाहन उत्पादक कंपन्यांची युरोपीय मुख्यालये आहेत. क्योल्नमधील उद्योग बहुरंगी असून माहिती तंत्रज्ञान, विमा, मनोरंजन इत्यदी क्षेत्रांशी निगडीत अनेक कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा क्योल्नमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून १. एफ.सी. क्योल्न हा फुसबॉल-बुंडेसलीगा मध्ये खेळलेला येथील प्रमुख क्लब आहे. ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन हे २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरले गेलेले स्टेडियम क्योल्नमध्ये सर्वात मोठे आहे.

प्रसिद्ध रहिवासी[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

क्योल्नचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[२]

युनायटेड किंग्डम लिव्हरपूल
फ्रान्स लील
बेल्जियम लीज
नेदरलँड्स रॉटरडॅम
इटली तोरिनो
बल्गेरिया बुर्गास
लक्झेंबर्ग एश-सुर-आल्झेत
जपान क्योतो
ट्युनिसिया ट्युनिस
फिनलंड तुर्कू
जर्मनी नॉयक्योल्न
इस्रायल तेल अवीव
स्पेन बार्सिलोना
चीन बीजिंग
आयर्लंडचे प्रजासत्ताक कॉर्क
ग्रीस थेसालोनिकी
निकाराग्वा कोरिंतो
अमेरिका इंडियानापोलिस
रशिया वोल्गोग्राद
जर्मनी ट्रेप्टो-क्योपेनिक
पोलंड कातोवित्सा
पॅलेस्टाईन बेथलहम
तुर्कस्तान इस्तंबूल
रोमेनिया क्लुज-नापोका
फिलिपाईन्स बातांगास
कॅनडा सास्काटून
ब्राझील रियो दि जानेरो

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]