वोल्गोग्राद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वोल्गोग्राद (मराठी) Волгоград (रशियन) |
|||
| शहर | |||
|
|||
| देश | |||
| राज्य | वोल्गोग्राद ओब्लास्त | ||
| स्थापना वर्ष | १५५५ | ||
| महापौर | रोमान ग्रेबेन्निकोव्ह | ||
| क्षेत्रफळ | ५६५ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | १०,२१,२४४ | ||
| - घनता | १,८०८ प्रति वर्ग किमी | ||
| प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
| http://www.volgadmin.ru/ru/ | |||
वोल्गोग्राद (रशियन: Волгоград) हे रशियाच्या संघातील महानगरांपैकी एक आहे. इ.स. १५८९ ते इ.स. १९२५ या कालखंडात या शहराचे नाव त्सारित्सिन असे होते, तर इ.स. १९२५ ते इ.स. १९६१ या काळात जोसेफ स्टालिन याच्या नावावरून ठेवलेल्या स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई. इ.स. १९६१ सालापासून या शहरास वोल्गोग्राद या नावाने ओळखले जाते. ते वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसले असून वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे शहर आहे. सुमारे ५६५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या महानगराची लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)