फ्रीडलँडची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रीडलँडची लढाई तत्कालीन प्रशियातील फ्रीडलॅंड शहराजवळ (आताचे रशियातील प्रावदिन्स्क शहर) जून १४, इ.स. १८०७ रोजी फ्रांसरशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला. या लढाईबरोबरच चौथ्या संघाचे युद्ध संपुष्टात आले. या लढाईनंतर लगेच जुलै ७ रोजी फ्रांस व रशियाने तिल्सितचा तह मंजूर केला व युद्ध संपवून एकमेकांना साहाय्य करण्याचे वचन दिले. या तहात झालेला फ्रेंच साम्राज्याचा विस्तार नेपोलियनच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू होता.