फ्रीडलँडची लढाई
Appearance
फ्रीडलँडची लढाई तत्कालीन प्रशियातील फ्रीडलॅंड शहराजवळ (आताचे रशियातील प्रावदिन्स्क शहर) जून १४, इ.स. १८०७ रोजी फ्रांस व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला. या लढाईबरोबरच चौथ्या संघाचे युद्ध संपुष्टात आले. या लढाईनंतर लगेच जुलै ७ रोजी फ्रांस व रशियाने तिल्सितचा तह मंजूर केला व युद्ध संपवून एकमेकांना साहाय्य करण्याचे वचन दिले. या तहात झालेला फ्रेंच साम्राज्याचा विस्तार नेपोलियनच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू होता.