उमरगा तालुका
?उमरगा तालुका महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: ढोर उमरगा | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,००५.८ चौ. किमी |
मुख्यालय | उमरगा |
जवळचे शहर | सोलापूर |
प्रांत | महाराष्ट्रराज्य |
विभाग | छत्रपती संभाजीनगर |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता |
२,४१,३३९ (२००१) • २४०/किमी२ ९२५ ♂/♀ ७९.३०२ % |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | धाराशिव |
विधानसभा मतदारसंघ | उमरगा तालुका
न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = उपविभागीय कायांलय |
तहसील | उमरगा तालुका |
पंचायत समिती | उमरगा तालुका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१३६०६ • +०२४७५ • एम एच २५ |
उमरगा तालुका (इंग्रजी: Omerga Tehsil) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
माहिती
[संपादन]उमरगा शहर हे उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
उमरगा शहरामध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे..
उमरगा बसस्थानकाजवळ हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर पुरातन असून, रचना एखाद्या राजवाड्यासारखी आहे. प्रत्येक दगडावर आकर्षक कोरीव नक्षीकाम आहे. येथे शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. मंदिराला एकूण सात दरवाजे आहेत. येथे ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. वनवासाच्या वेळी राम, लक्ष्मण येथे येऊन गेल्याची अख्यायीका आहे. सन २००० मध्ये २५ लाख रुपये खर्चून पाच शिखरांचे एकच भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण सीतेसह विविध देवतांच्या मूर्ती आहेत.या गावी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर राष्ट्रकूट, चालुक्य घराण्याशी संबधित आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो, तेव्हा भक्तांची गर्दी असते.
बालाघाट पठाराचा प्रदेश → उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.
हवामान → उष्ण व कोरडे.
नदी → बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…ही नदी उमरगा तालुक्यातून वाहते.
उमरगा तालुक्यातील धरणे→ जकेकूर, तुरोरी, कोळसूर, बेनीतुरा, सावळसूर...
पिके → ज्वारी, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा.
नगदी पिके→ ऊस, द्राक्षे, केळी..
प्राणी → हरीण, रानडुक्कर, माकड, वानर, खार.
पक्षी → मोर, पोपट, कबूतर.
अचलबेट → उमरगा शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलबेट नावाचा डोंगर आहे. येथील गुंफेमध्ये अनेक वर्षांपूर्वी साधू, तपस्वी तप करीत असत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या मध्यावर ही गुंफा आहे. यामध्ये धुनी व शिवलिंग स्थापन केले आहे. गुंफेवर पाच शिखरांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मनमोहक झाडी व फुलांनी हे स्थळ नटले आहे. मंदिरावर जाण्यासाठी डोंगराच्या मध्यातून पायऱ्या व वाहनांसाठी डोंगराच्या बाजूने रस्ता बनवण्यात आला आहे. सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वी काशीनाथ महाराज या गुंफेमध्ये यज्ञकुंड पेटवून जप करत असत. येथे विठ्ठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर बालाघाट डोंगरामध्ये आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे..
कसगी → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध, येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
येणेगूर → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
तुरोरी → हे ठिकाण पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
उमरगा शहरामध्ये दर रविवारी उस्मानाबाद जिल्हातील सवांत मोठा आठवडी बाजार भरतो..
उमरगा हा एक् बाजारपेटेने सामावलेला आहे. उमरगा शहरात् पचायत् समिती आहे. मुंबई ते हैद्राबाद महामार्ह न. ६५ उमरगा शहरातून जाते. उमरगा शहारातील लोक भाषा मराठी आहे. येथील लोक प्रमुक्याने मराठी बोली बोलतात. येथील प्रमुख मंदिरे म्हणजे महादेव मंदिर आणि दत्त मंदिर.
वाहतूक
[संपादन]उमरगा तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत[१][२].
१) राष्ट्रीय महामार्ग ६५: पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग उमरगा तालुक्यातून पश्चिम-पूर्व गेला आहे. येणेगूर, दाळींब, उमरगा, तुरोरी इत्यादी गावे या महामार्गावर आहेत.
२) राष्ट्रीय महामार्ग ५४८बी: मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजयपूर-अथणी-चिकोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक) हा नवीन राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून गेला आहे.
याशिवाय उमरगा-गुलबर्गा, तुरोरी-मुळज-निलंगा इत्यादी प्रमुख मार्ग तालुक्यातून जातात.
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
[संपादन]• कवठा • बलसूर • दाळिंब • येणेगूर • गुंजोटी • आलूर • कदेर •माडज
शहरे आणि गावे
[संपादन]उमरगा तालुक्यात उमरगा व मुरूम ही दोन शहरे आहेत, आणि गावे खालील प्रमाणे:
- आचार्य तांडा
- आलूर
- अम्बरनगर
- आष्टा जहांगीर
- औराद
- बाबळसूर
- बलसूर
- बारडवाडी
- बेळंब
- बेडगा
- भगतवाडी (उमरगा)
- भिकार सांगवी
- भुसणी
- बोरी (उमरगा)
- चंडकाळ
- चिंचकोटा
- चिंचोली भुयार
- चिंचोली जहांगीर
- चिरेवाडी
- दाबका
- दाळींब
- दावलमलिकवाडी
- धाकटीवाडी
- धानोरा दगड
- डिग्गी
- दुधनाळ
- एकुंडी जहांगीर
- एकुंडी वाडी
- एकुरगा
- एकुरगावाडी
- फ़ुलसिंगनगर
- गणेशनगर (उमरगा)
- गुगळगाव
- गुंजोटी
- गुंजोटीवाडी
- गुरूवाडी
- हंद्राळ
- हिप्परगाराव
- इंगोले तांडा
- जगदाळवाडी
- जकेकूर
- जकेकूरवाडी
- जवळगा बेट
- [[कदेर
- कलदेव निंबाळा
- कालनिंबाळा
- कंटेकूर
- कराळी
- कसगी
- कसगीवाडी
- काटेवाडी (उमरगा)
- कवठा (उमरगा)
- केसर जवळगा
- कोळेवाडी (उमरगा)
- कोळसूर (गु)
- कोळसुर (क)
- कोराळ
- कोरेगाव (उमरगा)
- कोरेगाववाडी
- कोथळी (उमरगा)
- कुन्हाळी
- माडज
- महालिंगरायवाडी
- मळगी
- मळगीवाडी
- मानेगोपाळ
- मातोळा खु.
- मुळज
- मुरळी (उमरगा)
- मुरूम (ग्रामीण)
- नागराळ
- नाईचाकूर
- नाईकनगर (उमरगा)
- नारंगवाडी
- पळसगाव (उमरगा)
- पारसखेडा
- पेठसांगवी
- रामपूर (उमरगा)
- समुद्राळ
- सावळसूर
- सुंदरवाडी
- सुपतगाव
- तलमोड
- थोरलीवाडी (उमरगा)
- त्रिकोळी
- तुगांव
- तुरोरी
- उमरगा (ग्रामीण)
- वरनाळवाडी
- व्हंताळ
- वागदरी (उमरगा)
- येळी
- येणेगूर
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धाराशिव जिल्ह्यातील तालुके |
---|
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका |