हिप्परगाराव
| ?हिप्परगाराव महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | उमरगा |
| जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
हिप्परगाराव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]येथील लोकांचे राहणीमान साधे आणि सोपे आहे. सुमारे ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. येथील लोकांचा व्यवसाय जनावर, शेळी आणि शेतीशी संबंधित कामांवर आधारित आहे. येथे बैल, म्हैस, गाय आणि इतर पाळीव प्राणी तसेच कुत्रा, मांजर यांचा संगोपन केला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यात शेळी, बकरी, कुक्कुटपालन या व्यवसायांमध्येही लोक गुंतलेले आहेत.
येथे बोलीभाषा मराठी आहे. गावात विविध सण उत्साहाने साजरे केले जातात. पोळा, गौरी, गणपती, लक्ष्मी, नवरात्रि, विशेष नवरात्रि आणि दशहरा या सणांचे गावात विशेष महत्त्व आहे. कारण गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर श्री यमाई देवीचे मंदिर आहे.
श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र हिप्परगाराव
[संपादन]हिप्परगाराव तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील यमाई देवी मंदिर हे उमरगा शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराला भाविक कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येतात. याच यमाई देवीचे मुळपीठ (मुळस्थान) साताऱ्यातील औंध गावी आहे. भाविकांच्या म्हणण्यानुसार, यमाई देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिची मोठी बहीण असल्याने, श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन नंतर श्री यमाई देवीचे दर्शन घेतल्यावर भक्तीपूर्ण अनुभव पूर्ण होतो.
हे मंदिर पुरातन काळापासून अस्तित्वात असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ म्हणजे महाराष्ट्रात आहे. मंदिरापासून कर्नाटक राज्य तीन किलोमीटर अंतरावर आहे. नॅशनल हायवे ५६ वर तलमोड गाव चार किलोमीटर आणि तुरोरी शहर सात किलोमीटर अंतरावर आहेत.
मंदिराच्या बाहेर दिव्य दीपमाळ असून, येथे कल्लोळ तीर्थ आहे. बाजूला श्री दत्त मंदिर आणि विठ्ठल-रुक्माई मंदिर आहे. या मंदिरात श्री मातंगी देवी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, पळघर देवीचे विश्रामगृह आणि महादेव मंदिर आहेत. मंदिराच्या समोर मोठा पटांगण आहे आणि बाजूला सार्वजनिक बाथरूम, सभागृह व मंडळे आहेत. मंदिराच्या भोवती डोंगराळ परिसर असून येथे विविध फुलझाडे आणि वनस्पती आहेत. मंदिरावर येण्यासाठी बाजूने डांबरी आणि सिमेंट रस्ता आहे.
श्री यमाई देवी मंदिराला येण्यासाठी कर्नाटक राज्यातून एक रस्ता आहे जो व्होनाली या गावातून (सुमारे ३ किलोमीटर) जोडतो. तसेच तुरोरी आणि तलमोड गावातूनही मंदिराला येणारे रस्ते आहेत. हिप्परगाराव या गावाची कुलदैवत ही देवी असून हे गाव मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. देवीची पंच कमिटी आहे, ज्यात नऊ पुजारी आणि इतर गावकरी मंडळ यांचा ट्रस्ट आहे. श्री मातंगी देवीचे पुजारी आणि इतर मानकरी मंडळ देखील येथे कार्यरत आहेत.
कोजागिरी पौर्णिमेला देवीची यात्रा आयोजित केली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांत दीपावलीचा सण साजरा केला जातो. सिक्री पौर्णिमा, तुळशी विवाह, गुढीपाडवा, नागपंचमी आणि इतर विविध कार्यक्रम या गावात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सालाची बारा महिन्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील मारुती मंदिरात श्रावण महिन्यात पोथी गाथा वाचली जाते. याशिवाय पारायण, वार्षिक सप्ताह आणि जल्लोष देखील साजरे केले जातात.
नागरी सुविधा
[संपादन]हिप्परगाराव या गावात ग्रामपंचायत आहे उपजिल्हा रुग्णालय आहे येथे दोन टाईम महामंडळ बस येत असते पक्के रस्ते वीज पथ दिवे ,गटारीची व्यवस्था, पाणी फिल्टर ची सुविधा, किराणा दुकाने, दूध डेअरी, हॉटेल ,पिठ गिरन्या ,जिल्हा परिषद शाळा 8वी पर्यंत व्यवस्थित आहे, इतर कुठल्या साधन नाहीत
जवळपासची गावे
[संपादन]हिप्परगा राव पासून तीन किलोमीटर वरती पूर्वेला हिप्परगा राव वाडी( कुरुंदवाडी )हे गाव आहे त्याच्याच पुढे दीड किलोमीटर वरती कर्नाटक राज्य होनाळी हे गाव आहे ,गावापासूनच उत्तर दिशेला तलमोड , गावापासून पश्चिम दिशेला तुरोरी गाव आहे, त्याच्या जवळपास चिंचकोट आणि कोळसुर आष्टा ,मळगी ,गुरुवाडी ,मळगेवाडी ,धामोरी ,दक्षिणेला उजळंब ,एकांबा ही गावे आहेत हिप्परगा राव ची मुख्य बाजारपेठ तूरोरी व उमरगा आहे....[१]
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ Mandavkar, Veera (2022). "बौद्धिक संपदा : माहिती आणि गुणदोष (Intellectual Property: Information and Pros and Cons)". SSRN Electronic Journal. doi:10.2139/ssrn.4097713. ISSN 1556-5068.