२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक
२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान |
इंग्लंड वेल्स | ||
विजेते | पाकिस्तान (१ वेळा) | ||
उपविजेते | भारत | ||
सहभाग | ८ | ||
सामने | १५ | ||
मालिकावीर | हसन अली | ||
सर्वात जास्त धावा | शिखर धवन (३३८) | ||
सर्वात जास्त बळी | हसन अली (१३) | ||
|
२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही इंग्लंड आणि वेल्स येथे १ ते १८ जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.[१] सदर स्पर्धेची हे ८वी आवृत्ती आहे. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील.
अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेशचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. २००६ च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले.
पात्रता
[संपादन]३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले:[२]
पात्रता | देश |
---|---|
यजमान | इंग्लंड |
पूर्ण सदस्य | ऑस्ट्रेलिया |
भारत | |
न्यूझीलंड | |
पाकिस्तान | |
दक्षिण आफ्रिका | |
श्रीलंका | |
बांगलादेश |
मैदाने
[संपादन]२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक तीन ठिकाणी खेळवली जाईल असे १ जून २०१६ रोजी जाहीर करण्यात आले.: द ओव्हल, एजबॅस्टन आणि सोफिया गार्डन्स.
लंडन | बर्मिंगहॅम | कार्डीफ |
---|---|---|
द ओव्हल | एजबॅस्टन क्रिकेट मैदान | सोफिया गार्डन्स |
प्रेक्षकक्षमता: २६,००० | प्रेक्षकक्षमता: २३,५०० | प्रेक्षकक्षमता: १५,६४३ |
सराव सामने
[संपादन]सराव सामन्यांचे नियम हे साधारण एकदिवसीय सामन्यांपेक्षा वेगळे होते, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून मान्यता मिळाली नाही. प्रत्येक संघ १५ खेळाडूंसहीत खेळू शकत होता, परंतु त्यापैकी जास्तीत जास्त ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करु शकत.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाज
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाज
- भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाज
- पाऊसामुळे सामना प्रत्येकी ३४ षटकांचा खेळवण्यात आला.
- ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही.
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
गट फेरी
[संपादन]स्पर्धेचे वेळापत्रक १ जून २०१६ रोजी जाहीर झाले.[३]
गट अ
[संपादन]संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | निधा |
---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड (पा) | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | +१.०४५ |
बांगलादेश (पा) | ३ | १ | १ | ० | १ | ४ | ०.००० |
ऑस्ट्रेलिया | ३ | ० | १ | ० | २ | २ | -०.९९२ |
न्यूझीलंड | ३ | ० | २ | ० | १ | १ | -१.०५८ |
बाद फेरीसाठी पात्र
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला.[४]
- तमिम इक्बाल (बा) हा आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशी फलंदाज ठरला.
- ज्यो रूटची (इं) एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी.
- गुण: इंग्लंड २, बांगलादेश ०.
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- पावसामुळे आधी सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला, नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३ षटकांमध्ये २३५ धावांचे नवे आव्हान ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला.
- जोश हेजलवूडची (ऑ) ५२ धावांत ६ बळी ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.[५]
- गुण: न्यू झीलंड १, ऑस्ट्रेलिया १.
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
- ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसानंतर सामना पुढे चालू होवू शकला नाही.
- हा ऑस्ट्रेलियाचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[६]
- डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा सर्वात कमी डावांत ४,००० धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला (९३).[७]
- गुण: ऑस्ट्रेलिया १, बांगलादेश १.
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश.[८]
- गुण: इंग्लंड २, न्यू झीलंड ०.
गट ब
[संपादन]संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | निधा |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत (पा) | ३ | २ | १ | ० | ० | ४ | +१.३७० |
पाकिस्तान (पा) | ३ | २ | १ | ० | ० | ४ | -०.६८० |
दक्षिण आफ्रिका | ३ | १ | २ | ० | ० | २ | +०.१६७ |
श्रीलंका | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.७९८ |
बाद फेरीसाठी पात्र
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- हाशिम आमलाच्या सर्वात कमी डावांत २५ एकदिवसीय शतके पूर्ण (१५१ डाव)[९]
- षटकांची गती कमी राखल्याने श्रीलंकेचा कर्णधार उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादण्यात आली.[१०]
- गुण: दक्षिण आफ्रिका २, श्रीलंका ०
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी ४१ षटकांमध्ये २८९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
- गोलंदाजी करताना वहाब रियाझने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा दिल्या (८७).
- गुणः भारत २, पाकिस्तान ०.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही
- गुणः पाकिस्तान २, दक्षिण आफ्रिका ०.
वि
|
||
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
- गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०
- ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र, तर दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर.
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- फहीन अश्रफचे एकदिवसीय पपदार्पण
- गुण: पाकिस्तान २, श्रीलंका ०
- ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र, तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर.
बाद फेरी
[संपादन]उपांत्य | अंतिम | |||||||
अ१ | इंग्लंड | २११ (४९.५ षटके) | ||||||
ब२ | पाकिस्तान | २१५/२ (३७.१ षटके) | ||||||
ब२ | पाकिस्तान | ३३८/४ (५० षटके) | ||||||
ब१ | भारत | १५८ (३०.३ षटके) | ||||||
ब१ | बांगलादेश | २६४/७ (५० षटके) | ||||||
अ२ | भारत | २६५/१ (४०.१ षटके) |
उपांत्य फेरी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- रुमाल रईसचे (पा) एकदिवसीय पदार्पण
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी पाकिस्तान पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती आणि १९९ नंतर आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील ही त्यांची पहिलीच अंतिम फेरी होती.
वि
|
||
२६५/१ (५० षटके)
तमीम इक्बाल ७० (८२) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
- कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा हा पहिलाच सहभाग होता.
- युवराज सिंग त्याचा ३०० वा एकदिवसीय सामना खेळला.[52]
- विराट कोहली (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावा पूर्ण करणारा, डावांच्या बाबतीत सर्वात वेगवान फलंदाज ठरला (१७५ डाव).
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
- फखार झमानचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
- पाकिस्तानने प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
- कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाकिस्तानची ही सर्वोच्च धावसंख्या होती.
- विजयाचे हे अंतर कोणत्याही आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील धावांच्या बाबतीत सर्वात मोठे होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामने".
- ^ "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चे संघ" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-16 रोजी पाहिले.
- ^ "२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत-पाकिस्तान, ऑस्ट्रेलिय-इंग्लंड आमनेसामने" (इंग्रजी भाषेत).
- ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग" (इंग्रजी भाषेत). २ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला". स्पोर्टींग न्यूझ (इंग्रजी भाषेत). 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश: तुम्हाला माहित असावं असं सारं काही" (इंग्रजी भाषेत). ७ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "२७ वर्षे जूना विक्रम वॉर्नरने मोडला" (इंग्रजी भाषेत). ६ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी: न्यू झीलंडला पराभूत करून इंग्लंड उपांत्य-फेरीत" (इंग्रजी भाषेत). ७ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आमला रिॲसर्ट्स हीज ५०-ओव्हर ग्रेटनेस" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चार तासांच्या डावामुळे उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी" (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेला हरवून उपांत्य फेरी प्रवेशाचे भारताचे लक्ष्य" (इंग्रजी भाषेत). 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी: श्रीलंका स्टन इंडिया टू थ्रो ग्रुप बी वाईड ओपन" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचे नेतृत्व करित मेंडीस, गुणतिलकने जिवंत ठेवले श्रीलंकेचे आव्हान" (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१७ रोजी पाहिले.