सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा ८
श्री. माहितगार यांनी घातपाती कारवाया थांबवाव्या
[संपादन]श्री. माहितगार, कोणतेही कारण न देता आपण ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था हे पान अर्धसुरक्षित केले आहे, असे दिसते. आपली कृती जातीय स्वरूपाची आहे, असे म्हटल्यावाचून गत्यंतर नाही. हे पान फेसबुकवर शेअर करण्यात आल्यानंतर चर्चेत आले. फेसबुकवरील जातीयवादी ब्राह्मण मंडळींनी या पानाविरुद्ध ओरड केली. त्यानंतर श्री. जे यांनी या पानावरील सर्व मजकूर उडवून टाकला होता. श्री. जे यांचे हे एकतर्फी संपादन मी उलटवले. त्यामुळे आपल्या पोटात दुखण्याचे कारण काय?
अशा एकतर्फी ‘घातपाती कारवाया' आपल्याकडून होऊ नये, अशी अपेक्षा आहे. ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था हे पान धुळपाटीमधून बाहेर काढून आपण आपला नि:पक्षपातीपणा सिद्ध करावा.
-brurthari (चर्चा) १७.00, २६ जुलै २०१३ (IST)
वरील दुव्यात आपण आरोप बाजीने भर पडून संपादन गाळण्या सटीक पणे काम करताहेत का हे पहाणे सुधारणा आणि अद्ययावत करण्या करता कदाचित मला मदतच होइल. या आपल्या कोणत्याही अर्थाने मांडलेल्या विचाराशी मी सहमत नाही. संपादन गाळण्यात सुधारणा करण्यासाठी (आभा-समान दूर- ध्वन्य) गदारोळ आणि विवादपटूना आमंत्रित करणे योग्य नाही. सहजासहजी होणार्या आरोपबाजीचा आपण संपादन गाळण्या सुधारीत करण्यासाठी उपयोग करुन घेतल्यास योग्य राहील. हा माझा विचार पटत असेल तर वरील दुव्यातील आपल्या संबंधित विचारात आपण फेरफार करणे श्रेयस्कर ठरेल. -- संतोष दहिवळ ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) ११:२४, १९ मे २०१३ (IST)
- संपादन गाळण्या अद्ययावत करण्याची आपली सध्याची पद्धत आपण म्हणता तशी 'सहजासहजी होणार्या आरोपबाजीचा आपण संपादन गाळण्या सुधारीत करण्यासाठी उपयोग करुन घेतल्यास योग्य' अशीच राहीली आहे.सगळ नियमात राहून केलतरी कूणीतरी उगीच घाबरवत म्हणून घाबरण्यात हशील नाही म्हणून आवेशा तसे लेखन झाले आपल्या म्हणण्याचा आदर ठेवत संबंधीत वाक्ये वगळली आहेत.
Synchbot service blocked by filter
[संपादन]Hello Mahitgar. It looks like you maintain the "भला मोठ्ठा अमराठी मजकूर (सदस्य नामविश्व)" abuse filter. It currently blocks the Synchbot service, which creates user pages for global users who have an account on this wiki (and on other wikis). This seems to be deliberate. Would you like me to disable the Synchbot service on this wiki? —Pathoschild १८:४८:२५, ०२ जून २०१३ (UTC)
I don't speak Marathi (mr-0), so I'll ask you to fix this
[संपादन]I know you hate the SWMT, but can you please remove the "Bold text" from लंडन (London)? It's in the infobox (माहितीचौकट), after the London website ("लंडनचे संकेतस्थळ") link. PiRSquared17 (चर्चा) ०२:४६, ११ जून २०१३ (IST)
माफ करा
[संपादन]आपल्या परवानगीशिवाय, आपल्या कामामध्ये नेहमीप्रमाणे 'नाक खुपसत' आहे. आपल्या Typoच्या चुका दुरुस्त केल्या आहेत.आपल्या लक्षात त्या आल्याच असत्या.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:५८, २१ जून २०१३ (IST)
चेतोबा
[संपादन]>>..दगडाला शेंदूर फासून इतर देव कुणीही बनवू शकत नाही असे काही आहे काय ?<< बनवू शकतो. आणि त्याचे देऊळही बांधतो. पण अशा शेंदूर फासून बनविलेल्या देवांपैकी मारुतीचे, गणपतीचे, म्हसोबाचे, खैसोबाचे देऊळ असते, चेतोबाचे देऊळ असल्याचे ज्ञात नाही, म्हणून वेगळा उल्लेख केला..J (चर्चा) २२:०२, २५ जून २०१३ (IST).
- :) मान्य चेतोबाच अस सामान्य रहाण त्याच असामान्यत्व दाखवत, मग नक्कीच उल्लेखनीय ठरत ! प्रतिसादा करता धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१९, २५ जून २०१३ (IST)
मराठीतील क्रियापदे
[संपादन]>>मराठी विकिपीडियातील काही साहाय्यभूत भावी कामाच्या दृष्टीने मराठी क्रियापदांची यादी हवी आहे. तसेच मराठीत वापरल्या जाणाऱ्या केवल प्रयोगी अव्ययांची यादीसुद्धा उपलब्ध झाल्यास पहावे. << केवलप्रयोगी अव्ययांची यादी अव्यय या पानावर आहे. मराठीतील धातूंची यादी एका संकेतस्थळावर होती, तिथून नकल-डकव पद्धतीने देता आली असती. पण दुर्दैवाने ते स्थळ आता उघडत नसल्याने मराठी भाषेतील धातूंची यादी एखाद्या शब्दकोशावरून उतरवून घेऊन टंकित करावी लागेल. यादी भली मोठी असणार. नमुना म्हणून मराठी भाषेतील धातू या पानावर काही धातू उतरवले आहेत. उभ्या रांगेत एकाखाली एक लिहिण्याऐवजी आडवे एकापुढे एक लिहिले असते तर सोईस्कर झाले असते असे वाटते.....J (चर्चा) २२:४३, २६ जून २०१३ (IST)
तार्कीक उणीवा
[संपादन]तार्कीक उणीवा या लेखात इंग्रजीस काही मराठी शब्द दिले आहेत. तसेच कमेंट मधील भाषांतरही तपासुन ते प्रगट करावे ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:०८, २९ जून २०१३ (IST)
==cikitsaatmak-- चिकित्सामक अधिक योग्य.....J (चर्चा) १०:५०, ८ जुलै २०१३ (IST)
क्र/क्र आणि क्त/क्त
[संपादन]http://archive.org/stream/marhfirstbookfo00dmgoog#page/n21/mode/2up हे पान उघडून पहावे. त्या पानावर जोडाक्षरे दिली आहेत, त्यांतील क्र (क्र) कसा लिहिला आहे ते पहावे. आधी त्र लिहून त्याला’क’ची वाटी जोडली की क्र होतो. अशाच प्रकारे आधी त्त लिहून त्याला ’क’ची वाटी जोडली की क्त होतो..ही जुना क्र आता पार विस्मरणात गेला आहे...J (चर्चा) ००:५०, १९ जुलै २०१३ (IST)
अक्षरविषयक लिखाण
[संपादन]’र’वरच्या लिखाणात थोडी भर टाकली आहे. वेळ मिळाल्यास जरूर नजरेखालून घालावी. ....J (चर्चा) १४:२९, १९ जुलै २०१३ (IST)
शुलेचि
[संपादन]"The material in the vicinity of this tag needs gramatical correction with spell check to complete the sentence in accordance with marathi language grammer rules."
या ’टॅग’(मराठी शब्द आठवत नाही!)च्या जवळपासचा मराठी मजकूर, मराठी भाषेच्या प्रचलित नियमांनुसार, आवश्यक तेथे व्याकरणशुद्ध करून, त्याचे शुद्धलेखन तपासणे गरजेचे आहे. ...J (चर्चा) १४:५३, २३ जुलै २०१३ (IST)
Darkicebot
[संपादन]Could you please remove the bot flag from my bot, User:Darkicebot? It will not be active. Thanks, Razorflame (चर्चा) ०६:५५, २५ जुलै २०१३ (IST)
भाषांतर्भाव
[संपादन]मी विकिवर सदस्य बनण्याच्या आधीची ही चर्चा आहे, अर्थात, ती मला लागु नाही असे नाही.फक्त ती माझ्या लक्षात आली नाही किंवा मी ती बघितली नाही. असो. जर एकमताने एखादा शब्द मंजूर होतो तर तो निर्णय सर्वांनाच लागू होतो असे माझे मत आहे. त्यात आपण व जे सारख्या मातब्बरांनी घेतलेला निर्णय चपखलच.मी ते शोधून शब्द बदलण्याचा प्रयत्न करतो.प्रयत्न याचेसाठी कि एव्हढ्यात मे तेथे अनेक भाषांतरे केली आहेत.त्यातून नेमके शोधून ते बदलावे लागेल. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
हा शब्द योजण्यामागे माझी भूमिका अशी होती- ट्रांस= बदलणे-उदा. ट्रांस-फोर्मेर,ट्रांस-लेशन इत्यादी
इनक्ल्यूड-अंतर्भाव , क्ल्यूड=भाव ट्रांस-क्ल्यूड-(भाषांतर)बदल करून (त्यास लक्ष्य भाषेत)नेण्याची क्रिया=भाषांतर्भाव असो.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:५२, २९ जुलै २०१३ (IST)
- गिल्टी वगैरे नाही मी फक्त माझी भूमिका मांडली.शब्द शोधत आहे.मिळाल्यावर कळवितोच.
- धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३१, ३० जुलै २०१३ (IST)
आपण हे बघितले काय? वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:४४, ३० जुलै २०१३ (IST)
- होय याची चावडी/प्रगतीवर यापुर्वी घोषणा झाली आहे आणि मला कल्पना आहे. आपल्या कडे 'J' सारख्या सदस्यांना हा प्रॉब्लेम येईल कारण J नावाचे वेगळ्या व्यक्तीचे फ्रेंच विकि अकाऊंटपण आहे.पण अद्याप कुणा सदस्याने समस्या न मांडल्याने आल्याने मी सुद्धा पुढे लक्ष दिले नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५९, ३० जुलै २०१३ (IST)
भाषांतरे
[संपादन]मी येथे काही भाषांतरे केली आहेत. आपणास सवड मिळाल्यास त्याचे 'पुनरावलोकन'(रिव्हू) करावे ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १२:३९, ३० जुलै २०१३ (IST)
- काम हाती घेतल्या बद्दल,धन्यवाद. साहाय्य पानांचे अनुवाद करणे या मुळे मिडियाविकिवर सुकर होते आहे. ट्रांसलेट विकिवरील अनुवाद इकडे संदर्भाकरता सध्या आपोआप उपलब्ध होत नाहीत (सवडीने बग नोंदवेन) पण तोपर्यंत ट्रांसलेटविकिवर वापरलेले शब्द मिडियाविकि साहाय्य पानावर दिसण्यात सारखे पणाकडे जरा लक्ष द्यावे लागेल. बाकी सवडीने तिकडे चक्कर टाकेन. धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४४, ३० जुलै २०१३ (IST)
Good morning from Calabria, and kind of collaborations request for items in the Marathi language.
[संपादन]Good morning to you, I am writing to say hello and know how you are, besides this I apologize if you think I could have done advertising or anything like that on wikipedia Marathi, absolutely not my intention to create advertising or spam. I am for the dissemination of ideas, as were our ancestors encyclopaedists in the Enlightenment, but also for a union and collaboration among the various Wikipedias, we are all brothers, sons of the same mother earth .. we have some small differences but the heart is unique. those who know me and have heard me speak knows that I have a mind free from malice and that he wants a Union of Wikipedians, acting in one heart and one soul. If you want to help too in Marathi I'll be happy. thank you very much from the heart--Lodewijk Vadacchino (चर्चा) ०६:२२, ४ ऑगस्ट २०१३ (IST)
Good morning again,
it is I who thank you, thank you for the warm welcome .. my heart rejoices to see that my ideas begin to bear fruit after years of work, I who am the son of farmers know a little wait. Years ago I had a clear idea in 2012 at a meeting chat with users of my tongue had already proposed this reaffirming with vigor, thanks to the many thanks that people gave me knowing that I was a Wikipedian, even invited me to a model his degree with a thesis on wikipedia, in that moment I felt small, but great at the same time. Do you wonder if you can help me with the article in the radio, this radio has given me more experience following his steps summer of last year. Weather permitting of course ask the items you want, without any problems. thanks again with my whole heart, I have really moved.--Lodewijk Vadacchino (चर्चा) ०७:४८, ४ ऑगस्ट २०१३ (IST)
रसग्रहण
[संपादन]रसग्रहण व योग्य टीकेने काव्यास किंवा कोणत्याही लेखनास धार येते असा माझा समज आहे.आपण कवीमनाने केलेल्या रसग्रहणाबद्दल शतशः धन्यवाद.आपण दाद दिल्याबद्दल आभार.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:५०, ८ ऑगस्ट २०१३ (IST)
तसेच यथादृश्य संपादकाएवजी 'दृक्-संपादक' हा शब्द कसा वाटतो?
वि. नरसीकर (चर्चा • योगदान)
- 'दृक्-संपादक' सुद्धा चांगला आहे.आधीच्या पिढींना या पैकी कोणताही शब्द सहज उमजेल. नवीन पिढीतील मुलांचा शब्द संग्रहाची (कठीण परी)स्थिती पहाता त्यांना कोणते शब्द समजण्यास सुलभ जातील याचा नेमका अंदाजा येत नाही. मराठी विकिपीडियावर टंक या शब्दावर मोठी चर्चा झाली.पण प्रत्यक्ष महाविद्यालयीन सर्वेक्षणात मुलांना तो शब्द,(आणि तसेच इतरही बरेच) समजत नसल्याचे लक्षात आले.
- जेवढी चर्चा केली तेवढ्या लोकांना माहित होतो हा एक भाग झाला. दुसरा भाषा बदलती असल्याने नवीन पिढीतून त्यांना समजतील असे शब्द निवडले गेले तेवढे बरे .
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५०, ८ ऑगस्ट २०१३ (IST)
आंतरविकि सांगकामे
[संपादन]आता आंतरविकि दुवे घालण्याची गरज न उरल्याने हे काम करणाऱ्या सांगकाम्यांचे फलॅग काढण्यास माझा पाठिंबा आहे.
अभय नातू (चर्चा) ०७:१६, १० ऑगस्ट २०१३ (IST)
- धन्यवाद
विकिपीडिया मेसेजेस्
[संपादन]मला विकिपीडिया वरील दिसणारे मेसेजेस् संपादीत करयचे आहेत. ते कोठुन करू? उदा. माझ्या सदय पानावर झालेले बदल सागणारा संदेश / मि विपी मधून लॉग आऊट केल्यावर दिसणारा संदेश. - प्रबोध (चर्चा) ०२:४८, ३१ ऑगस्ट २०१३ (IST)
- धन्यवाद! - प्रबोध (चर्चा) २३:२७, ५ सप्टेंबर २०१३ (IST)
वात्रटिका
[संपादन]वात्रटिकात बराच रस घेताय !
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १९:२६, ९ सप्टेंबर २०१३ (IST)
काहीतरी कारण
[संपादन]संवादासाठी काहीतरी कारण हवे ना? आपल्या उद्देशाबद्दल मनात काहीच किंतू/परंतु नाही. दरम्यान, आज वाचलेला एक लेख मला फार महत्वाचा वाटला.त्याचा एक दुवा देत आहे. मला वाटते ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी असावी.कृपया तो जरुर बघावा ही विनंती.[१]
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:३६, १० सप्टेंबर २०१३ (IST)
- संवादाचे स्वागत आहे. लेखाचा दुवा उघडला नाही. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५८, १० सप्टेंबर २०१३ (IST)
यथादृश्य संपादक
[संपादन]नमस्कार. यथादृश्य संपादकाच्या अनुवाद मोहिमेचा दुवा बघितला - त्याबद्दल धन्यवाद. थोडे काम तिकडे करण्यास सुरुवात केली आहे; पुढेही यथाशक्ती करेन. पुन्हा एकदा धन्यवाद.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:३६, १५ सप्टेंबर २०१३ (IST)
कठीणच दिसते बुवा यापुढे !
[संपादन]कृपया अंकुल या लेखाचे मी संपादित केलेले शेवटचे आवर्तन बघावे. महाराज! गाळणीने माझ्यावर चक्क असभ्यपणाचा आरोप लावला आहे. तेथे मी काय असभ्यपणा दाखविला हे मला कळेनासे झाले आहे.राग मानत नाही. शेवटी मशीन ती मशीनच.:-)
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २२:१५, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
- हो लक्ःश गेले गाळणी तपासतो आहे.माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२४, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
- मुख्य समस्येचे निराकरण झाले. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५६, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
अहो ! क्षमाप्रार्थी वगैरे काय? माझा तसा उद्देश नव्हता. फक्त गंमत म्हणून व आपले या त्रुटीकडे लक्श जावे म्हणून हा उपद्व्याप केला.आपण त्यावर बरीच मेहनत घेत आहात. चाचणी स्थितीत तर हे चालायचेच. मला वाटते,मी काही मजकूर गाळला व संपादन केले त्यात एकुण बाईटस् मध्ये (-) चिन्ह आले त्यामुळे असे घडले असेल.गाळणीचे क्रियान्वयन झाले. कोणाचे संपादन काढणे हा असभ्यपणा नाहीतर काय? असो. --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३४, २० सप्टेंबर २०१३ (IST)
जीवचौकट
[संपादन]कृपया साचा जीवचौकट बघावा. तसेच चिंच लेखही बघावा.त्यात जीवचौकटीत मथळ्यात व शास्त्रीय वर्गीकरण याचे समोर -> ;" | <- असे चिन्ह येत आहे. मी बराच प्रयत्न केला परंतु ते हटवु शकलो नाही. वेळ असेल तर त्याकडे कृपया लक्श्य द्यावे ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:००, २० सप्टेंबर २०१३ (IST)
- होय नक्की पहातो. - माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२७, २१ सप्टेंबर २०१३ (IST)
घालमोड्या
[संपादन]- हा जोतिबा फुले यांनी वापरलेला शब्द आहे. त्यांच्या वाङ्मयात असे अनेक शब्द येतात.
- २००२साली हाच शब्द डॉ. नदाफ यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात वापरला.
- अगदी अलीकडे व्ही. शांतारामांच्या ’पिंजरा’ चित्रपटातील (बहुधा) जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या गाण्यात "अरे घालमोड्या कशाला करतोय्स खोड्या, हे वागणं बरं नव्हं; अरे बत्ताशा..." हाच शब्द आला आहे.
- नामदेव ढसाळ यांच्या फेसबुकवरील लिखाणातही " अरे स्वतःचे आकार मी बदलू कसे ? हे पालखीचे भोई ... हे घालमोड्या दादा, तू आमचा कुणीही नाहीस. बाबासाहेबांनीच म्हटलेय, ज्याला समर्थन करता येत नाही तोच भ्याड विरोध करतो."असे वाक्य आहे.
- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई सरकारच्या घालमोड्या वृत्तीचे परखड विश्लेषण करतात. ते म्हणतात, ‘‘सरकारने १९८६ साली शहाबानो प्रकरणात मूलतत्त्ववादी मुस्लिमांची बाजू घेतली आणि दुसरीकडे बाबरी मशिदीचे कुलूप उघडून रामलल्लाची पूजा करण्याची परवानगी दिली. या निर्णयांमुळे देशातील मुस्लिम समाज कायमचा धर्मवादी झगड्यात जखडून गेला. दोन्ही समाजांतील कट्टरपंथीय बळावले. सर्वसामान्य मुस्लिमांचे यामुळे न भरून येणारे नुकसान झाले.’’
या वाक्यांतून अर्थ स्पष्ट होत नसला तरी (साच्यात) घालणे +मोडणे असा अर्थ असावा. थोडक्यात काय तर धरसोड वृत्तीचा हा मथितार्थ!.... ~ ~ ~ ~(?)््््(/) जे.--११:५४, २१ सप्टेंबर २०१३
एक सुधारणा
[संपादन]’पिंजरा’तल्या त्या गाण्यात ’लाजमोड्या’हा शब्द आहे, घालमोड्या नाही!
हाकामारी नावाचे भूत लोकांना हाका मारीत हिंडते अशी अफवा १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात पुणे शहरात पसरली होती. ’ओ’ देण्याऱ्या माणसाला ते भूत धरते असे लोक सांगत. मात्र त्यापूर्वी आणि नंतरही ’हाकामारी’हा शब्द कधी वाचनात आलेला नव्हता. तो त्याकाळचा तात्कालिक शब्द असावा....जे. १३:०४,२१सप्टेंबर २०१३
यथाअवकाश करतो
[संपादन]ते काम यथाअवकाश करतोच. --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:५४, २२ सप्टेंबर २०१३ (IST)
- ओके हरकत नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१७, २२ सप्टेंबर २०१३ (IST)
गीता रहस्य
[संपादन]- गीता रहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ?(द्+गी हे मला खालील दुव्यावरील ग्रंथात लिहिल्या प्रमाणे टंकता आले नाही.) ---काही फॉन्ट्सवर ’द्ग’ हे अक्षर उभ्या जोडणीचे जोडाक्षर टंकता येते असे मी पाहिले आहे, पण टंकल्यानंतर दुसऱ्या संगणकाच्या पडद्यावर ते तसे दिसेलच अशी खात्री नाही.
- अर्काइव्ह डॉट ऑर्गवरील मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण या दुव्यावर गीतारहस्य ग्रंथ दिसतो आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे का सुयोग्य आवृत्ती आहे याची खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे. --- मी पाहून सांगीन. पण ग्रंथाच्या सुरुवातीला भगवद्गीतेच्याच ओळी दिसत आहेत, ’गीतारहस्याच्या’ नाहीत, त्यामुळे शंका घ्यायला जागा आहे. शेवटचे पान उघडून पाहिले की समजेल.
- उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ?--- मूळ गीतारहस्य उघडून पाहीन.
- गीता रहस्यचे किती खंड होते ? एकच का अधिक ?-- आमच्या घरी गीतारहस्य होते, त्यावेळी त्याचा एकच खंड होता. पुस्तक खूप जाड आणि जड होते, एवढे आठवते.....J (चर्चा) ११:४६, २५ सप्टेंबर २०१३ (IST)
आणखी
[संपादन]विकीच्या बाहेर जाऊन ’द्ग’ टंकून पाहिले. उदा० गूगल सर्चवर. जमते. विकीवरच काही तरी अडचण आहे. पूर्वी नव्हती. त्यासाठी आता संपादनाच्यापानाखाली असलेल्या मुळाक्षरांच्या यादीत ’द्ग’ अशा प्रकारची जोडाक्षरे द्यावीत, म्हणजे नकल-डकव पद्धतीने वापरात येतील तिथे पूर्वी ’ॲ’(’अ’वर चंद्र) होता, आता काढून टाकला आहे. तोही परत टाकावा.......J (चर्चा) ११:५६, २५ सप्टेंबर २०१३ (IST)
जुना, उभ्या जोडणीचा क्र
[संपादन]क्र हे अक्षर ’क’ला’र’ची तिरपी रेघ काढून जोडताना ’क’च्या वाटीचा अडथळा होतो. ’क’चा स्वरदंड(’क’मधली उभी रेघ) फार छोटा आणि वाटी फार मोठी असेल तर ’र’ जोडायला फारच थोडी जागा शिल्लक रहाते. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी क्र लिहिण्यासाठी, ’त्र’ला ’क’ची उजवी वाटी जोडून तयार होणाऱ्या अक्षराला क्र समजावे, अशी पद्धत ठरवली होती. या पद्धतीचा ’क्र’ दिसेनासा झाल्याने तो टाईप करून दाखवता येत नाही. तो http://hindiurdu.net/content/conjuncts इथे पहावा. क्र लिहिण्याची ही माझ्या मते आदर्श पद्धत आहे. मी हाताने लिहिताना अगदी नकळत आणि सहजगत्या तसला क्र अजूनही वापरतो. विकीवरतीही या ’क्र’ची सोय व्हावी....J (चर्चा) १३:३३, २५ सप्टेंबर २०१३ (IST)
गीतारहस्याचे दोन भाग
[संपादन]गीतारहस्याचे दोन भाग आहेत, खंड नव्हेत. पहिल्या भाग म्हणजेच गीतारहस्य. त्यात श्रीमद्भभगवद्गीतेवरचे टिळकांनी केलेले तात्त्विक विवेचन आहे. हा ग्रंथ खूप जाड आहे, (पृष्ठाच्या आकारमानाप्रमाणे) ५०० ते १००० पाने भरावीत.
दुसरा भाग अतिशय छोटा आहे. एकूण ३९८ पाने. त्याचे १ले पान आतील मुखपृष्ठ, पृष्ठ ३-४-५ वर प्रस्तावना, नंतरची १५ पृष्ठे अनुक्रमणिका; नंतर गीतेचे श्लोक, अर्थ आणि अर्थाचे निरूपण(३४५पाने) आणि शेवटची ३४पानी श्लोकारंभाच्या ओळींची सूची. २रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे.
गीतारहस्याचा पहिला भाग खालील दुव्यावरून उतरवून घ्यावा लागेल.
दुसरा म्हणजेच शेवटचा भाग खालील दुव्यावर नीट वाचता येईल.
....J (चर्चा) १४:३२, २५ सप्टेंबर २०१३ (IST)
बरोबर
[संपादन]तुमचे म्हणणे खरे आहे. गीतारहस्याच्या मराठी-इंग्रजी या दोनही दुव्यांवर टिचकी मारली की फक्त दुसरा भाग येतो. तो वाचून अनेकांनी गीतारहस्य वाचल्याचा आनंद आपापल्या प्रतिसादांत व्यक्त केला आहे. पृष्ठे १५-१६ ही पाने नसल्याची तक्रारही एकाने केली आहे. ती पाने दोन उपविभागांची सीमा म्हणून मुळातच कोरी सोडली असल्याचे त्यांच्या ध्यानात आलेले दिसत नाही.
हिंदी गीतारहस्य मात्र पूर्ण आहे. एकूण ९४२ पाने, त्यांतली ६४८मध्ये पहिला भाग आणि २९४ पानांचा दुसरा भाग. संपूर्ण मराठी गीता रहस्य शोधावे लागेल....J (चर्चा) १७:०९, २५ सप्टेंबर २०१३ (IST)
आपला विचार काय आहे?
[संपादन]चर्चा पानावर भाषांतर करीत आहे. एवढ्या खतरनाक उताऱ्याचे भाषांतर करता करता ब्रेन हॅमरेज न होवो म्हणजे मिळविली.:-)) तसे झाले तर तुम्हाला विकिसुटी द्यावी लागणार.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:३९, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
झाले बाबा एकदाचे! --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:५८, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
आम्ही जळगावकर हे पान हटवल्या बद्दल
[संपादन]तुम्हाला जर त्यातील काही विशिष्ट मजकुराविषयी अडचन असेल तर नक्की तो मजकूर हटवा. परंतु पूर्ण लेख का हटवला ?
माहितीगार तुमच्या चाळणीत चुक आहे
[संपादन]तुम्हाला नको असलेला मजकुर तुम्ही गहाळ केलात व चाळण्या लावुन पुन्हा येणार नाही अशी योजना देखिल केलीत.
विकिपीडिया:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था
तुमचे साथीदार इतरांना सांगत्तात जाती पाती काढण्याचा खोडसाळपणा करू नका .. दुसरी कडे तुमचे साथीदार दुसऱ्या जातीं बद्दल विद्वेशी लिखान करतात. आणि तुम्ही चाळण्या वापरून तुम्हाला नको असलेला मजकुर गाळता ....
Anti delete (चर्चा) ००:१३, १२ ऑक्टोबर २०१३ (IST)
दिनविशेष
[संपादन]एखाद्या व्यक्तीचा जन्म समजा १ मे रोजी झाला असेल तर ती घटना, १ मे च्या जन्म या दिन विशेष दैनंदिनी सदरात आपोआप का येत नाही. ती घटना तेथे सुद्धा संपादित का करावी लागते.त्या साठी १ मे चे जन्म ,१ मे च्या घटना किंवा २४ ऑक्टोबर चे मृत्यू असे वर्ग साचे तयार करावे लागतील का कसे ? या साठी काय करता येईल.साळवे रामप्रसाद २२:२९, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)
- @सदस्य:Salveramprasad,
- नमस्कार,विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष हा संबंधीत प्रकल्प आहे आणि विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा येथे संबंधीत काही जुनी चर्चा अंशत: संकलीत आहे (ती अद्ययावत नाही पण नवीन सदस्यांना कदाचित सुरवातीच्या माहितीस साहाय्यभूत होऊ शकेल असे वाटते.
- दिनविशेष पद्धती समजून घेणे आणि त्यात भर टाकणे एकुण क्लिष्ट आहेच,त्याही पेक्षा प्रथम दर्शनी दिसत त्या पेक्षा खूप अधिक वेळ आणि श्रमही खर्ची पडतात (दिनविशेष प्रकाराचा प्रत्यक्ष व्याप (परिघ) खूप मोठा आहे आणि क्लिष्टतेस मिडियाविकि सॉफ्टवेअरच्या च्या काही मर्यादाही अंशत: कारणीभूत आहेत),हे सांगण्याचा उद्देश आपणास डिसकरेज करण्याचा नाही तर,उपरोक्त कारणांनी मी दिनविशेष सदरात सहसा सहभाग टाळत असल्यामुळे माझ्या माहितीस अद्ययावत नसण्याच्या मर्यादा आहेत.दिनविशेष सदरात इतर सदस्यांच काम अधिक भरीव आहे तेव्हा मी @सदस्य:अभय नातू यांना आपणास उपयूक्त मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.
Warning while saving
[संपादन]मला इतक्यात लेख "जतन" करताना कही warning येतात. त्या मजकुरातून नेमकी warning काय आहे हे मला कधीच कळत नाही. त्यामुळे मी त्याच्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करतो. सांगण्याच मुद्दा हा, कि इतर नवे व जुने संपादकही त्याकडे दुर्लक्ष करत असणार. अशा परिस्थितीत याची खरचं गरज आहे का? - प्रबोध (चर्चा) ०९:०१, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
- संवादा करता धन्यवाद.हातात घेतलेले काम झाल्या नंतर उत्तर देतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१३, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
- ok... - प्रबोध (चर्चा) ०९:१९, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
- १) आपण निर्देशकेलेली विशेष सजगता संदेश गाळणी मुळ अभिप्रेत उद्दीष्टांना ठरवून दिल्या प्रमाणे काम करत असली तरी गैरसमज टाळण्याच्या दृष्टीने 'तात्पुरती' अकार्यान्वित केली आहे.
- २) आपणास कल्पना आहेच कि मी संकेत विषयक सजगता संदेश हा शब्द प्रयोग वापरतो, वॉर्नींग हा शब्द वापरणे अधिकतम टाळतो.
- लेखन चालू
टेस्टींग
[संपादन]टेस्टींग
परिक्षण
[संपादन]परिक्षण सारथी सांगकाम्या (चर्चा) १२:०२, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
परिक्षण २
[संपादन]माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१३, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
परिक्षण ३
[संपादन]@ @V.narsikar: साचा:साद चे हा परिक्षण करत आहे संदेश मिळाल्यास कन्फर्म करणे. धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४६, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
संदेश मिळाला.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २०:०९, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
- दुसरे असे कि मी येथे अधिसूचनांबाबतच्या
संदेशांचे भाषांतर केले आहे. कृपया त्यांना रिव्ह्यू करावे म्हणजे त्या येथे मराठीत दिसतील.तसेच मिडियाविकिवर हा व तत्त्संबंधी इतर लेखही सवड मिळाल्यास नजरेखालून घालावेत ही पण विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २३:०३, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)
- व्यक्तीगत कामात व्यस्त असल्याने प्रतिसाद देण्यास विलंब होत आहे. पुढाकाराबद्दल धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५५, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)
भाषांतर
[संपादन]@V.narsikar:, @Mahitgar:, भाषांतर accept करण्यासाठी आपण एखादा नियम निश्चित कराव क? उदा. प्रत्येक भाषांतरावर किमान ५ reviews आले, तर ते मान्य करावे?
माझ्या मते कधी कधी काही इंग्रजी शब्दाचे भाषांतर करताना, मराठीतील अवजड, समजण्यास अवघड शब्दांचा प्रयोग होतो. भाषांतर सरळ व समजण्यास सोपे असावे असे वाटते. या करिता, जर जस्ती लोकांनी या मध्ये सहभाग घेतला तर भाषांतर काहीसे सोपे व सर्वांना समजेल असे होईल. - प्रबोध (चर्चा) ०१:५९, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)
- होय सहमत आहे.कालानुरूप भाषेतील आणि शब्दसंग्रहातील बदल स्विकारावयास हवेत. नवीन पिढीस समजतील असे भाषिक बदल नवीन पिढी अधिक चांगले करू शकेल.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५०, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)
हे आपणास माहीत आहे का? नामनिर्देश
[संपादन]Did You Know Nominations साठी एखादे पान तयार करवे क? Admins महिन्यातून एकदा येथील Nominations तपासून आपणास हे आपणास माहीत आहे का? हा विभाग update करतील. आपणास काय वाटते? - प्रबोध (चर्चा) ०१:४१, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)
- मला वाटते सर्वसाधारण पणे जाणत्या अनुभवी सदस्यांना मोकळेच असावे, प्रचालकांची गरज आहे का ? गरज भासल्यास अंशत: संपादन गाळणीतून सुरक्षा देता येईल. बऱ्याच दिवसात तिकडे टच नाही,जाणत्या सदस्यांकरता संबंधीत पानांचा सुरक्षास्तर कमी करून देता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५४, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)
व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
[संपादन]"व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा." या संपादन गाळणीने आतापर्यंत ८०६ धडका मारल्याचे दिसले. या धडकांचा आधार घेऊन गाळणी व्यवस्थापकांनी, प्रचालकांनी, सदस्यांनी किती धडकांना नंतर संदर्भ नोंदवले हे मला कोठे पाहता येईल? सध्यातरी तसे होत नसेल तर आणि ही गाळणी सटिकपणे काम करते की नाही याचे परिक्षण झाले असेल तर बदल सूचीवर ती अकार्यान्वित करावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:२९, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST) (या विषयावरील माझे लेखन समाप्त)
- संतोषजी धन्यवाद.आपण म्हणता तर गाळणी अलिकडील बदल सूचीवर अकार्यान्वित करतो. विशेषण आणि प्रथमपुरूष द्वितीय पुरूष उपयोजीत लेखन बाबतीतल्या गाळण्यांबाबतही माझे पाऊल मी मागे घेतले आहे.तसे सर्वच संदर्भ विषयक गाळण्यांबाबतही करता येईल.(सध्या मीही जरासा व्यस्त असल्यामुळे विनंती नाकारण्या पेक्षा स्विकारली जाण्याची शक्यता अधिक आहे)
- प्रथमत: मीही प्रत्येकवेळी सर्वत्र संदर्भ देतच लेखन करतो आहे,नाही असे नाही हे प्रांजळपणे नमुद करतो.तेच इतरांकडूनही होते आहे.फक्त मराठी विकिपीडियातच नव्हे तर इंग्रजी विकिपीडियावरही एकुणच भारतीय संपादकांच्या लेखनात संदर्भांचा अभाव आहे किंवा कसे.यूरोप आणि आमेरीकेत प्रत्येक घरात ज्ञानकोश असतोच अशी संस्कृती आहे (होती) तशी भारतात नसण्यातून ज्ञानकोशीय संकेतांबद्दल भारतीय संपादकांना सजगता आणि सवय कमी असावी किंवा इतरही काही कारणे आहेत किंवा कसे. संदर्भ विषयक गाळण्यांचा उद्देश १) संदर्भ द्यावयाचा राहीला आहे त्याची नोंद घेणे २)त्याचा अभ्यास करून अहवाल बनवणे आणि मराठी विकिपीडिया सदस्यांनी त्याची चर्चा करून काही चांगले मार्ग पायंडे शोधणे
- ३) गाळण्यातल्या अलिकडीलबदल मध्ये नोंदवल्या जाणाऱ्या खूणपताकेचा उद्देश अ) आपण विषय चर्चेस आणला तसा तो चर्चेस यावा आ)दीर्घ काळात का होईना संदर्भ देण्याची सवय लागण्या बद्दल दबाव सावकाशीने वाढत जावा इ) खूणपताकांची नोंद केवळ अलिकडील बदल मध्येच दिसत नाही तर संबधीत लेखाच्या इतिहासातही नोंदवली जाते त्यामुळे लगेच नसले तरी काळाच्या ओघात सवडी नुसार स्वत:ची संपादने परत शोधून संदर्भ देणे अथवा इतर सुधारणा करणे सोपे जाते असा खूण पताकेचा उद्देश आहे. तरीपण सध्या आपल्या विनंतीस अनुसरून खूणपताका अकार्यान्वित करत आहे.
- गाळण्या सटीक करण्याचे काम तसे अविरत करत न्यावे लागते पण सध्याच्या गाळण्या येत्या वर्षाभरात मला स्वत:स अपेक्षीत स्तरास पोहोचू शकतील अशी आशा आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३७, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)
३ वर्षे अधिक २,००० संपादने
[संपादन]निकष ठीक वाटतो परंतु एक छोटा बदल सुचवतो.
सांगकाम्या न वापरता केलेली २,००० संपादने प्राथमिक निकष ठेवून त्यानंतर ३ वर्षांचा निकष लावावा. सध्या असे अनेक सदस्य आहेत ज्यांनी ३ वर्षांपूर्वी खाते उघडले परंतु ३-५-१०-१०० संपादनांनंतर येथे फिरकलेले नाहीत. त्यांना अर्धसुरक्षित पानांवर आपोआप मुभा मिळू नये. तसेच भराभर २,००० संपादनांची वेठ वाळणाऱ्या सदस्यांनाही ही मुभा आपोआप मिळू नये. वाटल्यास ३ वर्षांऐवजी दोन किंवा एक वर्षे थांबण्याचा निकष लावावा.
अभय नातू (चर्चा) ००:०७, १ नोव्हेंबर २०१३ (IST)
आमाआका आकार
[संपादन]आमाआका विभाग मुखपृष्ठावरील उजव्या स्तंभात येतो. या पूर्ण स्तंभाची उंची दिनविशेष तसेच उदयोन्मुख लेख या सदरांवरही आधारित आहे. उदयोन्मुख लेख सारखा बदलत नसला तरी दिनविशेष सदराची उंची अनप्रेडिक्टेबल असते असे असता आमाआकाचा नेमका आकार ठरवणे कठीणच आहे. तरीही ढोबळमानाने यात कमीतकमी पाच आणि अधिकाधिक १० एंट्र्या असाव्यात. बदल केल्यावर मुखपृष्ठ एकदा नजरेखालून घालणे केव्हाही हितावहच.
अभय नातू (चर्चा) ००:१९, १ नोव्हेंबर २०१३ (IST)
दिवाळीचा फराळ
[संपादन]काय लोकं आहेत हो या विकिवर. येवढी दिवाळी उलटून गेली पण कोणीही(माझ्यासह) कोणास विकिफराळास बोलविले नाही.येणे न येणे हा भाग सोडा ! निदान निमंत्रण तर द्यायचे ! भावनिक बंध लोपून रुक्षता वाढत चालली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. असो. सहज गंमत म्हणून हा प्रपंच.
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:१६, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)
धन्यवाद !
[संपादन]विकिफराळ मिळाला पण तो मी उद्या सेवन करील.आज प्रबोधिनी एकादशी(मोठी एकादशी)चा उपवास आहे म्हणून.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १९:२१, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)
- :)उद्यातर कराच पण दिवाळी उपवासाचे पदार्थांची सुद्धा व्यवस्था केली.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१०, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)
हे सिरीयसली सांगतोय!चर्चापानाव्यतिरीक्त ईतरत्र कुठे लावल्यास, साद साचा काम करीत नाही असे वाटते. निदान मलातरी निमंत्रण मिळाले नाही. मी अलीकडील बदल मधून आपले निमंत्रण बघितले.इतरांशी संपर्क करून बघा व हे तपासा ही विनंती.It works on any talk page or Wikipedia namespace page.असे साच्यात तर दिले आहे. असो.
- @Prabodh1987 आणि अभय नातू: नमस्कार, विकिपीडिया:समाज_मुखपृष्ठ/चहा#दिवाळीचा विकिफराळ २०१३ इथे साद साचाचा उपयोग केला.पण साचा नरसिकर म्हणतात तसे साचा अपेक्षेप्रमाणे काम करत नसावा.सवडीनुसार साचा तपासण्यास वेळ देता आल्यास अभारी असेन. धन्यवाद.
संदर्भ
[संपादन]विकिपीडिया:संदर्भ द्या आणि विकिपीडिया:संदर्भीकरण या लेखांतील मजकूर एकच वाटतो काय? --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:०९, १४ नोव्हेंबर २०१३ (IST)
- होय मलाही तसच वाटतय केवळ इंग्रजी विकिपीडियातन वेगवेगळ्यावेळी उतरवला गेला असण्याची शक्यता वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०१, १५ नोव्हेंबर २०१३ (IST) यातील विकिपीडिया:संदर्भ द्या हा हटवावा कारण त्यात कमी भाषांतर झाले आहे. --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:२९, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)
- दोन्ही दुवे बघितलेत व वाचलेत. त्यापैकी दुसरा थोडा 'मार्केटिंग कडे कलला आहे असे वाटते. असो. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:१४, २० नोव्हेंबर २०१३ (IST)
विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता
[संपादन]@V.narsikar, अभय नातू, आणि संतोष दहिवळ:
- नवा विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता माहिती/सजगता साचा बनवला आहे. आपल्या सवडीनुसार पाहून काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्यात ही नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, २६ नोव्हेंबर २०१३ (IST)
कृपया मेल बघा.
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:१६, २६ नोव्हेंबर २०१३ (IST)
नमस्कार
[संपादन]माझे संगणकावर तर सर्व व्यवस्थित सुरू आहे.(गूगल क्रोम न्याहाळक)
--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १२:२५, १ डिसेंबर २०१३ (IST)
@V.narsikar: आपण किती वाजता ट्राय केले ? मी १२.२२ वाजता पुन्हा (सदस्य निनाद यांच्या विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न प्रतिसादास अनुसरून) गॅजेट्स पुन्हा वगळली. आपल्या न्याहाळकाची सय cache मुळेही आपल्याला सर्व ठिक दिसले असे असेही संभवते.
काही वेळा काही संगणकाच्या ऑपरेटींग सिस्टीम्स/आवृत्तीचेही पुरते मर्यादीत प्रॉब्लेम असू शकतात.कि ज्यामुळे विशीष्ट न्याहाळकाची विशीष्ट आवृत्ती अथवा ऑपरेटींग सिस्टीम्सची विशीष्ट आवृत्ती यांनाचा प्रॉब्लेम भेडसावून वापरकर्त्यांच्या काही गटांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही संबंधीत काही वापरकर्त्या गटांना प्रॉब्लेम येईल असेही क्वचित होऊ शकते.
असे प्रॉब्लेम लक्षात येणे आणि सॉर्ट आऊट होणे वेळ खाऊ असू शकते.WMF लॅंग्वेज टिमचे प्रॉडक्ट मॅनेजर सुचवतात त्या प्रमाणे सर्व गॅजेट्स एकदम चालू करण्याचा अट्टाहास बाजूला ठेऊन एका वेळी एक गॅजेट चालू करून काही दिवस (आठवडा ते पंधरा दिवस) सर्वांकरता सर्व सुरळीत चालू आहे पहात पुढे जाणे अधिक चांगले किंवा कसे या बद्दल विचार करावा असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५०, १ डिसेंबर २०१३ (IST)
- आपणावर विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.पण, मी लिहिले ते पण सत्य आहे यावरपण शंका नसावी.याचदरम्यान श्री अभय नातूंनीपण अनेक संपादने केलेली आहेत. कदाचित वेगवेगळ्या ऑप. सिस्टीम मुळे असेल. मी त्यातील तज्ज्ञ नाही. मला यातील किमान अनुभवपण नाही.तरीपण,मराठी विकिवर सर्वांना ते गॅजेट्स उपलब्ध व्हावे हा त्या कृतीमागील अंतःस्थ हेतू होता. मी एकटा माझ्यासाठी ते कधीही उपलब्ध करू शकतो.किमान तेवढा अनुभव नक्कीच कमाविला आहे.असो.असे शक्य आहे कि कावळा बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडली.किंवा तसे नसेलही कदाचित.कोण जाणे.गाठ कॅन्सरची कि नुसता मार लागून रक्त साकळल्याची हा उहापोह न करता ती काढून टाकणेच योग्य ठरते.
- आजवर आपल्या कोणत्याच कृतीबद्दल माझ्या मनात किंतू/परंतु नाही. आणि मुख्य म्हणजे एवढेच काम एखाद्या लेखावर केले तर तो चांगला वाढेल मी या मताचा आहे. असो.
- ही जर माझ्यातर्फे झालेली चूक असेल तर मी याद्वारे, पोळलेल्या सर्वांची मनःपूर्वक क्षमा मागतो.आपणास व सदस्य निनाद यांना झालेल्या त्रासाबद्द्ल मी खरोखरीच दिलगीर आहे.श्री संतोष दहिवळ यांनीही त्यात, माझे विचारण्यावरून,रस घेतला याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक अभार मानतो.
आपला हिंदू धर्म असे सांगतो कि केलेल्या चूकीबद्दल प्रायश्चित्त घेतल्यास त्याचा दोष लागत नाही.त्यापोटी, आपण सर्वांनी मला दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य आहे.अगदी 'प्रचालकपद' काढण्याचीसुद्धा. मी ती खुलेपणाने स्वीकारील. 'निम हकीम,खतरे जान'. अर्धशिक्षितपणा काय कामाचा?
याने दोन फायदे होतील. एकतर आपल्या सर्वांच्या मागची कटकट/नसती उठाठेव जाईल,घालमोडेपणा निस्तरेल व माझे घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे बंद होईल.हे दोन्ही मोठे फायदे आहेत असे मी समजतो.
- झालेली घटना ही एक इष्टापत्तीच आहे असे मी मानतो. दरम्यान ,मी जावाचा अभ्यास सुरू केला आहे. तो पूर्ण झाल्यावर मी पुन्हा मैदानात येईल.ईतर विकिंवर काम करण्याचा 'विकिहक्क' मी अर्थातच राखून ठेवतो.
येथील सर्व विकिसदस्यांचा विचार/निर्णय मला जरूर ई-मेलने कळवावा जेणेकरून मला मान्यवर प्रशासकांना माझे प्रचालकपद काढण्याची विनंती करता येईल.
धन्यवाद!
[संपादन]हो! हे गॅझेट्स मराठी विकिवर आणण्याचे काम आता होऊनच जाउ द्या! :) निनाद ०९:००, २ डिसेंबर २०१३ (IST)
वा!
[संपादन]मी नरसिकरजींची गॅजेट्स पुर्ववत करत आहे. +१ नरसिकरजी फार चांगले काम करत आहेत. ते येथे असणे हा मराठी विकिला फार मोठा आधार आहे. निनाद १०:५२, २ डिसेंबर २०१३ (IST)
वैदिक सामस्वर
[संपादन]आपण विचारलेली माहिती वैदिक सामस्वरासंबंधी आहे, समस्वरासंबंधी नाही. वेदविद्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून सुयोग्य उत्तर मिळवीत आहे....J (चर्चा) १४:४३, ३ डिसेंबर २०१३ (IST)
सामवेदातील ऋचा लिहिताना अक्षराच्या शेजारी किंवा डोक्यावर ज्या खुणा लिहाव्या लागतात, त्यांपैकी ’वैदिक सामस्वर र’ ही एक खूण असावी. http://www.sanskritweb.net/samaveda/gg-dev.pdf या पत्त्यावर देवनागरीत छापलेला सामवेद आहे. त्यातील भर्गो देवस्य धीमाही या ओळीत ’र्गो’, ’दे’ आणि ’धी’ या अक्षरांच्या डोक्यांवर हा वैदिक सामस्वर र काढलेला दिसतो आहे....J (चर्चा) १५:०१, ३ डिसेंबर २०१३ (IST)
वैदिक सामस्वर र
[संपादन]http://www.unicode.org/L2/L2007/07397-vaidika-evidence.pdf हे पान उघडून त्यावर ’ VAIDIKA SAAMASVARA RA ’ किंवा पान 62 of 79 शोधावे. त्या पानावर काही संदर्भ आहेत, ते मिळवून वाचता आले तर हा ’र’ केव्हा वापरतात ते कदाचित कळेल.....J (चर्चा) १७:०६, ३ डिसेंबर २०१३ (IST)
गाळणी १३६
[संपादन]यात इमेल,इ-मेल,भ्रमणध्वनी,मो. या शब्दांसाठीही जमत असेल तर रोध टाकावा असे माझे मत आहे.
बदल, पुनर्लेखन वगैरे
[संपादन]’बदल’ परत टाकला आहे, तो अनवधानाने गाळला गेला होता. पण तेथे बदल ऐवजी निर्मूलन शब्द टाकला असता तरी चालले असते. कारण ज्या लेखात दौंड तालुक्यासंबंधी एका नकाशाखेरीज काहीही नाही, तेथे बदल करून करून किती करणार?
अर्जुनवाडकरांवरील लेख, मला वाटते, योग्य शब्दांत लिहिला गेला आहे; त्याच्या पुनर्लेखनाची आवश्यकता आहे?...J (चर्चा) २२:००, १० डिसेंबर २०१३ (IST)
अर्जुनवाडकरांवरच्या लेखाचे पुनर्लेखन
[संपादन]पटले. पुनर्लेखनाची गरज आहे.
परंतु ’अर्जुनवाडकरांच्या मताच्या केलेला प्रतिवादाचा,संबधीत विभागातील उल्लेख अप्रस्तुत व्यक्तीगत मत म्हणून अनुल्लेखनीय ठरतो.’ हे पटले नाही. चर्चापानावर जर स्व्त:ची मते मांडायची नाहीत, तर अन्य कुठे?...J (चर्चा) १९:३३, १२ डिसेंबर २०१३ (IST)
- विषयाची सरमिसळ होते आहे. चर्चापानावर जर स्वत:ची मते मांडण्या बद्दल काहीच आक्षेप नाही. चर्चापानावर आपण अर्जुनवाडकरांच्या मताचा प्रतिवाद करता आहात आणि त्याचा सरळ लेखात उल्लेख येतो आहे.गल्लत कुठे होते आहे, हे मी थोड्या वेळात अधिक स्पष्ट करतो.
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कुठे फारशा नोंदवल्या न गेलेल्या एका लेखनविषयक प्रयोगाबद्दल ही टीप आहे.संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे.- मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला आहे. या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
- कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात;मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला.[१]
- ^ गीतार्थदर्शन (ले.कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) ग्रंथाच्या अनुक्रमाणिकेतील उल्लेख "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
- किंवा वाक्य कदाचित काहीस असं लिहिता येईल. १९६२च्या शुद्धलेखन नियमान्वये पदान्तीचा दीर्घ अकार टिंबांद्वारे दाखविणे बाद केले गेले तरीही,कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात;मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला.[१]
- ^ गीतार्थदर्शन (ले.कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) ग्रंथाच्या अनुक्रमाणिकेतील उल्लेख "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
- या कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या या कृतीचा कुणी प्रतिवाद इतर स्रोतात केला तर १९६२च्या शुद्धलेखन नियमान्वये पदान्तीचा दीर्घ अकार टिंबांद्वारे दाखविणे बाद केले गेले तरीही,कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात;मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला.[१] त्यांच्या या कृतीचा लेखक हळक्षज्ञ यांनी ......... असा प्रतिवाद केला <ref>(संदर्भ:....)</ref>
- ^ गीतार्थदर्शन (ले.कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) ग्रंथाच्या अनुक्रमाणिकेतील उल्लेख "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
- मराठी विकिपीडियाचा संपादक तटस्थ आहे,इतरांनी केलेल्या प्रतिवादाचा दाखला देईल,पण कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कोणत्याही कृतीचा प्रतिवाद तो मराठी विकिपीडियावर स्वत: करणार नाही.कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कोणत्याही कृतीचा (लेख विषयाचा प्रतिवाद) करावयाचा झाल्यास मी मराठी विकिपीडिया शिवाय तिसरा स्रोत निवडेन.आणि त्याचा संदर्भ मी स्वत: देणार नाही इतर संपादकांना माझ्या इतरत्रच्या म्हणण्याचा संदर्भ द्यावयाचा झाल्यास ते तसा देतील किंवा देणारही नाहीत.
- "संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे." हे वाक्य अ या लेखात ==पदान्तीचा दीर्घ अकार== असा विभाग करून जावयास हवे.
सपशेल मान्य
[संपादन]अर्जुनवाडकर हे विकिपीडियावर लिहीत नसल्याने त्यांच्या मताचा प्रतिवाद चर्चापानावर करता कामा नये, हे म्हणणे पटले. तशी नोंद चर्चापानावर करीत आहे....J (चर्चा) २२:०३, १२ डिसेंबर २०१३ (IST)
आणखी एक
[संपादन]"१९६२च्या शुद्धलेखन नियमान्वये पदान्तीचा दीर्घ अकार टिंबांद्वारे दाखविणे बाद केले गेले तरीही,..." हे बरोबर नाही. शुद्ध लेखनाच्या १९६२सालच्या नियमांनी नपुंसकलिंगी शब्दांच्या अन्त्य एकारावरच्या अनुस्वारांना, ते अनुस्वारित आहेत असे समजून बाद केले आहे. बोली भाषेतल्या केलं, गेलं या शब्दांतल्या अनुस्वारांना बाद केलेले नाही.(नियम क्र. १३ असे लिहिण्याला परवानगी देतो.) त्यासंबंधी काही संकेत पाळावे असे त्या नियमांच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा सांगण्यात आले.
केलं, गेलं सारखी रूपे संवादांतले प्रत्यक्ष उच्चार लिहून दाखवितानाच वापरावीत, किंवा संपूर्ण लेखच बोली भाषेत असेल तर वापरावीत.. लेखातील काही शब्द प्रमाण भाषेत आणि काही बोली भाषेत असे लिहू नये. वैचारिक विषयांवरचे लिखाण जगातील मराठी जाणणारे सर्वजण वाचत असल्याने, त्यांत प्रादेशिक बोली भाषेतील केलं, गेलं असले शब्द अजिबात असू नयेत. अर्वाचीन आणि प्रचलित मराठीबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्या शब्दांचा अर्थ न समजण्याची शक्यता आहे....J (चर्चा) २३:४३, १२ डिसेंबर २०१३ (IST)
उत्तम
[संपादन]ऋषिकेश यांच्या पानावर इतक्या चांगल्या रीतीने संवाद साधल्या बद्दल धन्यवाद. मला खात्री आहे की ऋषिकेश हे मराठी विकि चे मोठे ॲसेट बनतील... निनाद १७:४३, १४ डिसेंबर २०१३ (IST)
नवे पान
[संपादन]मिडियाविकीतील संदेश(सर्व प्रणाली संदेश येथे) recentchanges-label-newpage आणि recentchanges-legend-newpage यातील योग्य मजकूर आपल्या येथे स्वीकारल्या न गेल्याने 'अलिकडील बदलात' -> नवे पान. $1 - नवे पान <- असे दिसत आहे. मुळात मजकूर -> न या संपादनाने नवीन पान तयार झाले (नविन पानांची यादी हेही पाहा) <- असा काहीसा दिसावयास हवा.(ट्रांसलेटविकि बघा).आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे.माहितीस्तव. --वि. नरसीकर १२:४०, १५ डिसेंबर २०१३ (IST)
काम योग्य रितीने झाले. --वि. नरसीकर १२:४४, १५ डिसेंबर २०१३ (IST)
मिडियाविकी:मराठी वापरा
[संपादन]या पानावर सरमिसळ झाली आहे असे वाटते.कृपया पहावे ही विनंती.--वि. नरसीकर १०:४५, १६ डिसेंबर २०१३ (IST)
विकिरजा
[संपादन]बाहेरगावी असल्यामुळे व कार्यबाहुल्यामुळे विकिवर सध्या येणे कठीण आहे.कृ.मे.ब.--वि. नरसीकर १०:२६, २४ डिसेंबर २०१३ (IST)--वि. नरसीकर १०:२६, २४ डिसेंबर २०१३ (IST)
मला सोडवा!
[संपादन](खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ?, संदर्भ हवा) या गाळणीतून कृपया मला सोडवणार का? :) निनाद ०९:२५, ८ जानेवारी २०१४ (IST)
- संदर्भ हवा असल्याबद्दल स्मरण अलिकडील बदल मध्ये दिसून अल्पसा मानसिक दबाव निर्माण करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे.संदर्भ हवा असे स्मरण एका गाळणीतले अकार्यान्वित केले होते आता अजून एका गाळणीतले अकार्यान्वित करतो आहे.पण अकार्यान्वित करताना सहमत नाही.हे नको असेल तर संदर्भ देण्याची सवय इनकल्केट करण्या करता अजून काही मार्ग सुचवावेत असे वाटते.
- धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५२, ८ जानेवारी २०१४ (IST)
- तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मानसिक दबाव निर्माण होतो खरा. पण काही काळातच मी त्याकडे दुर्लक्ष्य करू लागलो हे ही तितकेच खरे! ;) अजून मार्गांचा विचार करतो आहे. सुचल्यावर तसे कळवेनच! त्वरित सोडवणूकीबद्दल अनेक आभार! :) निनाद १०:५०, ८ जानेवारी २०१४ (IST)
- खूप दुर्लक्ष केलेत पण पूर्ण दुर्लक्ष करता आले नाही, आणि किमान चर्चे करता पोहोचण्या एवढा मानसिक दबाव निर्माण झाला हो कि नाही ? :) हाच मार्ग असे नाही पण मार्गाची नितांत गरज आहे. सवडी नुसार सुचवा घाई नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१०, ८ जानेवारी २०१४ (IST)
संदर्भयादी
[संपादन]कसे काय आहात
[संपादन]कृ.मे.ब.
गाळणी
[संपादन]कण्हेरगडलेखातील पहिल्या ओळीनंतर 'चित्र हवे' साचा लावल्यावर अलीकडील बदल मध्ये -> (खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)) <- असा निकाल दिसला.कृपया संबंधित गाळणी तपासावी ही विनंती.पहिल्या ओळीत जन्म/ मृत्यु,स्थापना,अश्यांचेच आकडे हवेत काय? कृ खुलासा करावा ही विनंती.--वि. नरसीकर १२:४९, ९ जानेवारी २०१४ (IST)
- तसेच Legend: चे 'विवरण:' केले व तेथील +- 123 चे १२३ केले.
- नोंद घेतली. तपासून सुधारणा करतो.
- माहिती करता धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३५, ९ जानेवारी २०१४ (IST)
- स्वामी विवेकानंद या लेखातील मी टाकलेला मजकूर कृपया बघावा. असे चालेल काय?--वि. नरसीकर १४:५२, १२ जानेवारी २०१४ (IST)
- मूळ बंगाली उतारा देवनागरी आणि मग अनुवाद आहे. अनुवाद चांगला विशेष या करता की मराठी अनुवाद होताना त्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाची छटा जपली गेली आहे.ज्ञानकोशीय लेखात जरूर तेथे दोन तीन अवतरणे कडवी असावयास हरकत नाही.
- पण तत्त्वविचार आणि शिकवण या विभागातील बाकी लेखन कुणी केले आहे माहित नाही पण ते स्टार किंवा क्रमांक देऊन नव्हे तर परिच्छेद लेखन स्वरूपाचे व्हावयास हवे.स्टार /बिंदी देऊन दिलेली त्यांची बाकी वाक्ये आपण अनुवाद दाखवला त्याच स्वरूपात पण विकिक्वोट प्रकल्पात जावयास हवीत.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०१, १२ जानेवारी २०१४ (IST)
सांगकाम्या, उत्पात
[संपादन]माहितगार,
संतोष दहिवळांनी मृत दुवे शोधून लेखांत तसे नोंदविल्यावर सांगकाम्याने ते मृत दुवे बाह्य दुवे या विभागातून काढून टाकल.े
सांगकाम्याने केलेले हे बदल उत्पात म्हणून टॅग केले गेले आहेत. यामागचे कारण काय असावे?
अभय नातू (चर्चा) १०:५५, १२ जानेवारी २०१४ (IST)
- बघतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५८, १२ जानेवारी २०१४ (IST)
- @अभय नातू आणि Mahitgar:
- सांगकाम्या यांना या विकिवर Bot Flag आहे. फ्लॅगधारक असल्याने त्यांची संपादने default अलीकडील बदल पानावरुन लपविली जातात. पण या सदस्य:सांगकाम्या यांचे आवश्यक असलेले सदस्यपान नाही. त्यांचा चालक/मालक कोण यांचा पत्ता नाही. सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठी global stewardना (स्थानिक प्रशासकांनाही) आवश्यक असलेली आपत्कालीन कळही यांच्या पानावर नाही.
- चालक/मालकाचा पत्ता (चालक/मालकाचे सदस्यनाव) नसलेल्या कोणत्याही फ्लॅगधारक सांगकाम्याची संपादने उत्पात या सदरात मोडतात. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:५२, १२ जानेवारी २०१४ (IST)
- माहिती/निर्देशाबद्दल धन्यवाद. सदस्य:अभय नातू सवडीनुसार सुयोग्य बदल/सुधारणा करतील अशी विनंती.
- @अभय नातू: सदस्य:सांगकाम्या हे खाते आपलेच आहे ना ?विकि इतिहास लेखनाच्या नोंदीच्या दृष्टीने, हा सर्वात जुना मराठी सांगकाम्या आहे का ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१०, १२ जानेवारी २०१४ (IST)
बरोबर, सांगकाम्या हा सांगकाम्या-सदस्य मराठी विकिपीडियावर हे नियम/संकेत येण्याआधी अनेक महिने (वर्षे?) कार्यरत आहे. हा सांगकाम्या सहसा under-supervisionच चालवला जातो तरी सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठीची कळ अत्यावश्यक आहेच असे नाही.
तरीही वरील सूचनेची दखल घेतलेली आहे आणि योग्य ते बदल लवकरच करेन.
अभय नातू (चर्चा) २१:४०, १२ जानेवारी २०१४ (IST)
मृतदुवे काढणे जरा सांभाळूनच
[संपादन]आपल्या संदेशातील युक्तिवाद बराचसा पटला. परंतु असे मृत दुवे अनेक महिने/वर्षे मराठी विकिपीडियावर बाळगून ठेवणे हे सुद्धा विचित्रच वाटते.
अभय नातू (चर्चा) २१:४५, १२ जानेवारी २०१४ (IST)
- हो आपण म्हणता तसे त्यावर काम व्हावयास हवे अथवा मार्ग काढावयास हवा. आपण सांगकाम्या अर्ध स्वयंचलीत स्वरूपात वापरता आहात तेव्हा ठिक आहे.इतर लेखात तेवढी काळजी नाही, मुख्य म्हणजे 'घोटाळा' वाल्या लेखात अधिक काळजी घ्यावी असे वाटते.सदस्य:संतोष दहिवळांनी विपी:मृत दुवे असा काही लेख बनवला आहे.
- जीथे मृत दुवे काढले आहेत त्यांची नोंद गाळणी माध्यमातून घेऊ का ? टॅग सूचना इत्यादी लावणार नाही. त्याचा किती उपयोग होईल या बद्दल आता मीही विचार केलेला नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२६, १२ जानेवारी २०१४ (IST)
बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
[संपादन]डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्या बाबत आपण केलेल्या मार्गदर्शन व सूचनांचे मी आवश्य पालन करील. धन्यवाद सर साळवे रामप्रसाद १८:१८, १५ जानेवारी २०१४ (IST)
प्रचालक
[संपादन]नमस्कार माहितगार, मागील काळात कार्यबाहुल्यामुळे मला प्रचालक होण्यात रस नव्हता. परंतु आता परिस्थिती बदलल्याने वेळ आहे. आता मला प्रचालक व्हायला आवडेल. आपला निनाद ०६:५३, २० जानेवारी २०१४ (IST)
- @Katyare:
- निनाद क्षमा असावी इतरत्र व्यस्त राहील्याने मराठी विकिपीडियावर येणे झाले नव्हते.आपण प्रचालक होण्यात पुढाकार घेऊ इच्छिता याचे स्वागतच आहे.सविस्तर दोन तीन दिवसांनी लिहीनच
- @अभय नातू:
- निनादची विनंती आली आहे. आपले मत काय आहे ते कळवावे.
- धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३६, २६ जानेवारी २०१४ (IST)
- @अभय नातू:
- @माहितगार:
- काय झाले? काही प्रतिसाद आला नाही? तुम्ही थांबल्याने मी ही थांबलो आहे. :) निनाद ०३:३९, १३ फेब्रुवारी २०१४ (IST)
- @Katyare:
नमस्कार,
एखाद्या सदस्याच्या प्रचालकपदाच्या उमेदवारी कालखंडात मी शक्यतो स्वतःचे मत मांडण्याचे टाळतो. मागील दोन-तीन वेळचा अनुभव पाहता आपण उमेदवाराच्या बाजूने किंवा विरुद्ध अधिक चर्चा न करणे हेच सुज्ञपणाचे हे मी जाणले आहे :-)
तरीही आपण मला साद दिल्याने उत्तर देतो --
तुमच्या प्रचालकपदाच्या उमेदवारीस माझा विरोध नाही, किंबहुना एखादा सदस्य या कामासाठी तयार होत आहे हे पाहून आनंदच होत आहे. यासाठी लागणारे कौल, इ.ची जबाबदारीही मी घेण्यास तयार आहे.
आपण प्रचालक का होऊ इच्छिता व प्रचालकपद घेतल्यावर आपण काय अधिक काम कराल/करू शकाल याबद्दल थोडेसे विवरण चावडीवर घालावे. त्यानंतर या प्रक्रियेस चालना देता येईल.
अभय
- निनाद स्मरणात आहे आणि समर्थनही आपण अभय म्हणतात तशी सुरवात करण्यास हरकत नाही. २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिना कडे लक्ष असल्याने काही अनुवाद कार्यांमध्ये अंशत: व्यस्त असल्यानेही वेळ देणे झालेले नाही. पण हे आपण निश्चितपणे करूच.
- स्मरण देण्या बद्दल धन्यवाद.
मराठी अक्षरे
[संपादन]कालपर्यंत (२१ जानेवारी २०१४पर्यंत) विकीवर ॲ (’अ’वर चंद्र), आणि ऱ्य, ऱ्ह (चंद्रकोरीसारख्या अर्ध्या ’र’ला जोडलेले ’य’ किंवा ’ह’) ही अक्षरे टंकित करता येत होती. आज ती करता येत नाहीत, किंवा कुणी तसे टंकित केले असले तरी ते ’तसे’ माझ्या संगणकावर दिसत नाहीत. कालच्या रात्रीत काहीतरी गडबड झाली आहे. अभय नातूंनी स्थानांतरित केलेल्या ऍक्टिनियम यालेखाचा नाव मला चौकोनात 972क्टिनियम असे दिसते आहे....J (चर्चा) ११:४५, २२ जानेवारी २०१४ (IST).
- @J: क्षमा असावी व्यस्त आहे लक्ष घालण्यास अजून दोन चार दिवस जातील असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३७, २६ जानेवारी २०१४ (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
[संपादन]भारतीय अंतराळ संशोधन संस्था या लेखात बरेच तांत्रिक शब्द आहेत.त्याचे मराठी प्रतिशब्द हे फारसे प्रचलित नसल्यामुळे, त्यावरुन सामान्य वाचकांना किंवा कोणालाही(लेखकाशिवाय) चटकन अर्थबोध होणे दुरापास्त वाटते.बरे!त्यांची यादी लेखाचे सुरुवातीस/ खाली दिली तर त्या लेखातून शेवटी किंवा सुरुवातीस जाऊन त्यातील सारणी पाहून नेमका हवा असलेला शब्द हुडकणे जिकरीचे व कंटाळवाणे काम होते.एकदोन शब्द असतील तर ठिक. येथे तर शेकड्यांनी आहे. म्हणून प्रत्येक शब्द व पर्यायाने ते वाक्य समजण्यास सोपे जावे म्हणून मनात एक कल्पना आली आहे.त्याचा तात्पुरता प्रयोग केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था#७ कृपया बघावे.त्यातील 'ग्रहीय विज्ञान व अवकाशविज्ञान (Planetary Sciences and Astronomy)' या विभागात संदर्भ क्र. १९,२०,२१,२२ हे टिचकून बघावेत.त्याचा इंग्रजीतील मूळ शब्द खाली 'नोंदी'त दिसेल.संदर्भाच्या मजकूराच्या आधी असलेला वरच्या दिशा दाखविणारा बाण टिचकल्यावर आपण पूर्ववत मूळ मजकूरावर पोहोचु.त्याने वाचन व आकलन सोपे होईल. यात एक बाब अशी आहे कि संदर्भ वाढतील. पण लेख संपादन/भाषांतर करीत असतांना/वाचतांना ते बरेच सोपे होते. आपल्या सर्वांची मंजूरी असल्यास पुढे जातो अन्यथा ही कल्पना टाकून देतो.बघा.सर्वांनी सांगोपांग विचार करून कळवा ही विनंती.--वि. नरसीकर २१:३४, २२ जानेवारी २०१४ (IST)
- क्षमा असावी व्यस्त आहे लक्ष घालण्यास अजून दोन चार दिवस जातील असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३८, २६ जानेवारी २०१४ (IST)
नक्की
[संपादन]फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते हा लेख चांगलाच आहे. उपयोग करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल :)
i agree
[संपादन]dear sir thanks for information i have not added such as spam links any where i have only added usefll links or content on wikipedia which will be helpful for readers but i found many dead links which is irratating wiki readeers so i removed them with valid reason like web error 404. also i found many domains are deleted, expired, parked on another sites so i have removed such links with a reason. and i am sorry and agree for that i am connected with many links which are shared on wiki by me but still i want to tell that i have not added any promotion . i am also holding thousands of domains/ websites but i didn't spam here.
once again thanks for information got useful article from your message
thanks
चर्चा धागा
[संपादन]- चर्चा धाग्यापेक्षा 'चर्चा सूत्र' हा शब्द 'मला' अधिक योग्य वाटतो.बघा, आपणास जमतो काय?
- दुसरे असे कि 'भिन्न रुचि: इह लोके' (या जगात वेगवेगळ्या रुची आहेत) एकाच वाक्याचे अनेकांनी केलेले भाषांतर वेगवेगळे असेल.कारण विचार करण्याची पद्धत व शब्दभंडार वेगवेगळे असते. वाक्यरचनापण वेगवेगळी असण्याचा संभव असतो. भाषांतर करतांना मूळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते कि मूळ लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे? त्या अर्थाप्रती,किंवा भाषांतर करीत असलेल्या भाषेत, नेमका शब्द उपलब्ध नसल्यास,त्या अर्थाच्या जवळपास पोचायचे असते.
स्वैर भाषांतरात, रंजकता,वाचनियता,करमणूक आणण्यासाठी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध असतात.असे भाषांतर अर्थापासून थोडे दूर गेले तरी चालते.कारण त्यात भाषांतरकार आपले स्वैर विचार/वृत्ती/साहित्यभंडार वापरून ते वाचनिय करीत असतो.अ.
अर्थातच,हे माझे वैयक्तिक विचार आहेत. --वि. नरसीकर (चर्चा) २२:०४, ११ फेब्रुवारी २०१४ (IST)
@V.narsikar: इंग्रजीत डिस्कशन थ्रेड शब्दाचे धागा हे भाषांतर वापरले जात आहे. चर्चा धागा एवजी 'चर्चा सूत्र' पण चांगला आहे. आपल्या पिढीतील आणि नवीन पिढीतील शब्द संग्रहात जरासा फरक पडतो त्यांना त्यांच्या संग्रहातले शब्द नसतील तर नको वाटतात. म्हणुन मी बऱ्याचदा मिंग्लिश वापरण्यास आणि पळाला एवजी रनला म्हणण्यास तयार असल्याचेही गमतीने म्हणत असतो. चर्चा धागा हा शब्द काही मराठी चर्चा संकेतस्थळांवर वापरात असल्याने कळत नकळत माझ्याही शब्द संग्रहाचा भाग झाला असावा पण धागासूत्र वापरण्यासही माझी सहमती असेल असो.
दुसरा मुद्दा विकिस्र्तोतवर एकाच शब्दास वेगवेगळे शब्द संग्रह वापरून एक पेक्षा अधिक कितीही अनुवाद पर्याय उपलब्ध करता येतात त्यास हरकत नाही. मूळ लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे? त्या अर्थाप्रती,किंवा भाषांतर करीत असलेल्या भाषेत, नेमका शब्द उपलब्ध नसल्यास,त्या अर्थाच्या जवळपास पोचायचे असते. या बाबीशी सहमतच आहे. अर्थात मूळ लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे? या बद्दल तुमचा माझा आणि आणखी इतर व्यक्तीचा निष्कर्ष वेगळा असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि ते लक्षात घेऊनही एका पेक्षा अधिक अनुवाद पर्याय आपण उपलब्ध करू शकतो नाही असे नाही. अर्थात विकिस्रोत प्रकल्पाच्या परिघात स्वैर भाषांतरात, रंजकता,वाचनियता,करमणूक इत्यादीस अंशत: मर्यादा आहेत. आपण म्हणल्या प्रमाणे पहिल प्राधान्य लेखकाला काय म्हणायच आहे दुसर अर्थातच वाचकास आकलन झाल पाहिजे. भारतीय संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद करताना चिनी लोकांनी अनुवाद या विषयावर बराच उहापोह केला आणि ज्याचा आजच्या काळातही संदर्भ दिला जातो. त्यातील एक चिनी तज्ञ Zhou Zuoren assigned weightings, 50% of translation is fidelity, 30% is clarity, and 20% elegance. अस सूत्र सांगतो संदर्भ (en:Chinese_translation_theory). अर्थात विवीध अनुवाद थेअरींचा अभ्यास करून विकिस्रोत:धूळपाटी वर विकिस्रोतास उपयूक्त अनुवाद पद्धती कशी असावी या बद्दलही येत्या काळात लेखनाचा प्रयत्न असेल आणि शेवटी आपण हे सर्व अनुभवातूनच शिकतो म्हणुनच पहिला अनुवादाचा प्रयत्न करून पाहीला आहे काही सुधारणा वाटल्यास अशाच मनमोकळे पणाने सुचवाव्यात.
लोकमान्यांचाच लेख अनुवादा करता निवडण्याच एक कारण असही कि गीतारहस्याच्या लेखना वेळी अनुवादा करता टिळकांनी स्वत: वापरलेले निकषही वैशीष्ट्यपूर्ण आणि मननीय आहेतच आणि विकिस्रोताचे निकष ठरवताना विचारात घेता येतील असे वाटते म्हणून s:अनुक्रमणिका:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf याचाही भाग टंकून हवा आहे. परत परत मराठी विकिपीडियाच्या सदस्यांना भरीस पाडण्यापेक्षा बाहेरच्या मराठी संकेतस्थळावरून कुणी मिलते का अथवा टायपींग स्पर्धेच्या निमीत्तानी कुणी जोडता येते का पहात होतो अद्यापतरी हाती यश नाही. आणि कदाचित त्याकरताही पुन्हा तुमच्या कडेच यावे लागेल किंवा काय माहित नाही. पण २७ तारखे पर्यंत आपला पहिला अनुवाद मराठी संकेतस्थळावर चिटकवून कुणी व्हॉलूंटीअर मिळवण्याचा प्रयत्न करून पाहतो असा बेत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०६, १३ फेब्रुवारी २०१४ (IST)
Aai Nadi
[संपादन]Please see my replies in my talk page in aswiki as well as Aai river talk page for more info on the river and Goalpara Dist.
We also have a facebook group here. You can also join there. The group is more dynamic.
Psneog (चर्चा) ०९:४५, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)
Wikimedians Speak
[संपादन]
|
I am writing as Community Communications Consultant at CIS-A2K. I would like to interview you. It will be a great pleasure to interview you and to capture your experiences of being a wikipedian. You can reach me at rahim@cis-india.org or call me on +91-7795949838 if you would like to coordinate this offline. We would very much like to showcase your work to the rest of the world. Some of the previous interviews can be seen here.
Thank you! --రహ్మానుద్దీన్ (चर्चा) २३:५०, ९ एप्रिल २०१४ (IST)
मदत हवी
[संपादन]सिंक्रोनाईझ किंवा सिंक्रोनायझेशन साठी शब्द सूचवू शकाल काय?(synchronise)
--वि. नरसीकर (चर्चा) १४:००, २४ एप्रिल २०१४ (IST)
- संस्कृत शब्द कोशात समकालीक, मराठी शासकीय कोशात याचीच संधी करून 'संकालीक' असा पारिभाषिक शब्द देतो. पण यात 'कार्य'/कृती'वाली अध्याहृत अर्थछटा येत नाही असे वाटते. एकाच वेळी होणे असे सरळ शब्द किंवा सिंक्रोनाईझ हा शब्द अर्थटिप देऊन वापरण्यास हरकत नसावी. कृतीची अर्थ छटा द्यावयाची झाल्यास सहसंकालीक कृती असे काही केल्यास क्लिष्ट होईल असे वाटते. अधिक नैसर्गिक शब्द सुचण्याची गरज आहे कधी सुचला तर कळवतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२९, २४ एप्रिल २०१४ (IST)
- एकसमयावच्छेदेकरुन हा शब्द सूचला.पण तो बराच मोठा व बोजड वाटतो.आपले काय मत आहे?
--वि. नरसीकर (चर्चा) ०९:३५, २६ एप्रिल २०१४ (IST)
- एकसमयावच्छेदेकरुन साहित्यिक लेखात वगैरे कदाचित ठिक असेल तांत्रिक परिभाषेकरता बोजड आणि नव्या पिढीला न झेपणारा वाटतो
- तालकदमच किंवा त्या धर्तीवर एकातालात वगैरे सारखा शब्द सूचावयास हवा असे वाटते. लोकभाषेवर शब्द बेतता आल्यास बरे पडते.
- मोल्सवर्थची एंट्री
- एकदम (p. 110) [ ēkadama ] ad Without stopping, hesitating, or taking breath; at one stretch of effort. 2 At one time; at one act; at once.
- एका दमानें With one breath or sustained effort.
अजून काही सूचले तर कळवतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५२, २६ एप्रिल २०१४ (IST)
सदस्य:Manjiri यांचा उद्देश काय असावा?
[संपादन]@Manjiri:
सदस्य:Manjiri यांनी या संपादनाद्वारे मुख्य नामविश्वातील एकलव्य या पानावर साचा {{copyright?}} आणि साचा {{पुनर्लेखन}} टाकल्याचे दिसले.
पुनर्लेखन साच्याचे जाऊ द्या पण एकलव्य हा जातीने निषाद तर द्रोणाचार्य जातीने (वर्णाने) ब्राम्हण. हा मजकूर वगळण्याचे आणि {{copyright?}} साचा या पानावर टाकण्याचे सदस्य:Manjiri यांचे कारण काय असावे याविषयी तुम्हाला काही सांगता येणे शक्य आहे काय? -- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३९, ३० जून २०१४ (IST)
- {{copyright?}} साचाचाखालील मजकुराखालील एक ओळ गूगल केली तर प्रथम दर्शनी केवळ मराठी विकिपीडियाचाच रिझल्ट आला म्हणून गूगल सर्च पानावरील you can repeat the search with the omitted results included. हे टिचकवे (जे सहसा आपण उघडत नाही) मूळ लेखन फेसबुकवरील Bhill samaj sanghatana नावच्या ग्रूपातून आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही (अर्थात मी तो ग्रूप वगैरे उघडण्याच्या भानगडीत पडलो नाही.) लेख पानातील लेखन चर्चेतील लेखन बहुधा सदस्य:Amarpawar5 यांच्या योगदानाने आले असावे. फेसबुकवरील लेखनही Amarpawar5 यांचे आहे का माहित नाही. पण नैसर्गीक लेखन क्षमतेच्या पेक्षा अधिक वेगाने टाकले गेले त्या अर्थाने कॉपीराईट बद्दल सदस्य:Manjiri यांचा उद्देश स्वाभाविक असू शकतो. पण त्यांचे संपादन Amarpawar5 यांच्या पाठोपाठ झालेले नाही म्हणजे अलिकडील बदल वरून जाण्याची शक्यता कमी अविशीष्ट लेख किंवा गूगलवरून एखादी गोष्ट शोधत गेल्या असू शकतात गूगलवर फेसबूक आणि मराठी विकिपीडिया दोन्ही कडे उल्लेख दिसल्याने संपादीत करावयास घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अविशीष्ट लेखवरून गेलेली व्यक्ती खूप जुना मजकुराच्या विशीष्ट ओळी कॉपीराईट साठी गूगलवरून शोधेल अशी शक्यता कमी असली पाहिजे.
- सदस्य:Manjiri यांना त्यांच्या दृष्टीणे चुकीचे वाटलेले उल्लेख वगळावयाचे असू शकतात आणि बाकी पान संपादन करण्याची इच्छा झाली असू असेल पण अविश्वकोशीय शैलीतील बराच मजकुर असेल तर विश्वकोशीय शैलीत आणणे बरेच कठीण असू शकते म्हणून त्यांनी पुर्नलेखन आणि कॉपीराईट इत्यादी साचे लावले असू शकतात. खरेतर copyright? हा साचा लेख नाम विश्वासाठी नाही तो सदस्यचर्चा नामविश्वासाठी आहे कॉपीपेस्ट हा साचा लेख नामविश्वासाठी आहे अनवधानाने/अथवा माहित नसल्यामुळे कॉपीपेस्ट एवजी copyright? साचा लावला गेला असेल अशा शक्यता वाटतात. पण एकुण मजकुराच्या आशयाशी असहमतीतून संपादन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- इति माझे विश्लेषण, आपण म्हणालात आणि मी माझ्या परीने खीस पाडला, सहसा अशी संपादने याना त्या वैचारिक बाजूकडून होत रहातात, आपण या लेखातील संपादनांची विशेषत्वाने दखल का घेतली ते फारसे उमगले नाही. लेखातील सध्याचा मजकुर नक्कीच अविश्वकोशीय शैलीतील आहे. आणि संदर्भासहीत विश्वकोशीय शैलीतील लेखन करण्यास लेखात अद्यापही वाव आहे असे वाटते.
- जरा वेगळा विषय ज्या बद्दल आपल्याशी चर्चा करावयाची होती.
- एनीवे खरे म्हणजे चर्चा:गौतमीपुत्र सातकर्णि येथील चर्चेत आपला काही प्रतिसाद येईल म्हणून प्रतिक्षेत होतो. शिवाय गौतमीपुत्र सातकर्णि आणि शककर्ता शालिवाहन असे दोन लेख झाले आहेत. हल आणि हाल सातवाहन असेही दोन लेख झाले आहेत. यातील लेख शीर्षकांचे नि:सदिग्धीकरण आणि कोणती शीर्षके ठेवायची कोणते लेख कोणत्या लेखात मर्ज करावयाचे या बाबत आपल्या साहाय्याची गरज आहे असे वाटते. मुख्य म्हणजे गाहा सत्तसई या लेखाशी दुवे द्यावयाचे आहेत पण नि:सदिग्धीकरण पूर्ण न झाल्याने माझे जरासे कन्फ्युजन होते आहे.
- गाहा सत्तसई मध्येच संक्षीप्त शब्दसूची हा एक साचा वापरला आहे पण वर्क का होत नाही ते समजले नाही जमल्यास सवडीने त्यातही साहाय्य द्यावे ही नम्र विनंती.
- आपल्या आवडीचे लेखन वाचन होत राहो ही शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३९, ३० जून २०१४ (IST)
धन्यवाद आणि एक शंका
[संपादन]आपणांस धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण Pruthwi किंवा Krushna हे शब्द कसे लिहावेत हे अजुनही कळत नाहिये.
- pRthvee/pRthvee पृथ्वी kRShNa कृष्ण
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५३, ५ जुलै २०१४ (IST)
An important message about renaming users
[संपादन]Dear Mahitgar, My aplogies for writing in English. Please translate or have this translated for you if it will help. I am cross-posting this message to many places to make sure everyone who is a Wikimedia Foundation project bureaucrat receives a copy. If you are a bureaucrat on more than one wiki, you will receive this message on each wiki where you are a bureaucrat.
As you may have seen, work to perform the Wikimedia cluster-wide single-user login finalisation (SUL finalisation) is taking place. This may potentially effect your work as a local bureaucrat, so please read this message carefully.
Why is this happening? As currently stated at the global rename policy, a global account is a name linked to a single user across all Wikimedia wikis, with local accounts unified into a global collection. Previously, the only way to rename a unified user was to individually rename every local account. This was an extremely difficult and time-consuming task, both for stewards and for the users who had to initiate discussions with local bureaucrats (who perform local renames to date) on every wiki with available bureaucrats. The process took a very long time, since it's difficult to coordinate crosswiki renames among the projects and bureaucrats involved in individual projects.
The SUL finalisation will be taking place in stages, and one of the first stages will be to turn off Special:RenameUser locally. This needs to be done as soon as possible, on advice and input from Stewards and engineers for the project, so that no more accounts that are unified globally are broken by a local rename to usurp the global account name. Once this is done, the process of global name unification can begin. The date that has been chosen to turn off local renaming and shift over to entirely global renaming is 15 September 2014, or three weeks time from now. In place of local renames is a new tool, hosted on Meta, that allows for global renames on all wikis where the name is not registered will be deployed.
Your help is greatly needed during this process and going forward in the future if, as a bureaucrat, renaming users is something that you do or have an interest in participating in. The Wikimedia Stewards have set up, and are in charge of, a new community usergroup on Meta in order to share knowledge and work together on renaming accounts globally, called Global renamers. Stewards are in the process of creating documentation to help global renamers to get used to and learn more about global accounts and tools and Meta in general as well as the application format. As transparency is a valuable thing in our movement, the Stewards would like to have at least a brief public application period. If you are an experienced renamer as a local bureaucrat, the process of becoming a part of this group could take as little as 24 hours to complete. You, as a bureaucrat, should be able to apply for the global renamer right on Meta by the requests for global permissions page on 1 September, a week from now.
In the meantime please update your local page where users request renames to reflect this move to global renaming, and if there is a rename request and the user has edited more than one wiki with the name, please send them to the request page for a global rename.
Stewards greatly appreciate the trust local communities have in you and want to make this transition as easy as possible so that the two groups can start working together to ensure everyone has a unique login identity across Wikimedia projects. Completing this project will allow for long-desired universal tools like a global watchlist, global notifications and many, many more features to make work easier.
If you have any questions, comments or concerns about the SUL finalisation, read over the Help:Unified login page on Meta and leave a note on the talk page there, or on the talk page for global renamers. You can also contact me on my talk page on meta if you would like. I'm working as a bridge between Wikimedia Foundation Engineering and Product Development, Wikimedia Stewards, and you to assure that SUL finalisation goes as smoothly as possible; this is a community-driven process and I encourage you to work with the Stewards for our communities.
Thank you for your time. -- Keegan (WMF) talk २३:५४, २५ ऑगस्ट २०१४ (IST)
--This message was sent using MassMessage. Was there an error? Report it!
नमस्कार, माझं सदस्यनाम असं आहे यातलं डॉ. असं हवं आहे. म्हणजे पूर्ण सदस्यनाम प्रा.डॉ.दिलीप बिरुटे असं करुन हवं आहे, विनंती करतो की माझं सदस्यनाम बदलून मिळावे. |प्रा.डॊ.दिलीप बिरुटे = प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १०:३५, ८ सप्टेंबर २०१४ (IST)}}
अॅ
[संपादन]नमस्कार,
मी आत्तापर्यंत दोन-तीन साधनांद्वारे मराठी टंकन करीत आलो आहे. माझे ८५-९०% लेखन संगणकावरील इंडिक स्क्रिप्ट व कळपट वापरून इन्स्क्रिप्ट प्रणालीने होते. यात अॅ लिहिण्यासाठी D@ असे लिहिले असता अॅ उमटते. याशिवाय ! असे टंकले असता ऍ उमटते. सध्या मी विन७ प्रोफेशनल संगणकप्रणाली वापरीत आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:४२, ९ सप्टेंबर २०१४ (IST)
- खाली सिडॅकचा अद्ययावत एनहान्स्ड मराठी इन्स्क्रिप्ट कळफलकाचे छायाचित्र संदर्भा साठी देत आहे. मला वाटते ! ते ॲ देण्या बद्दल चा संभ्रम आता दूर होण्यास हरकत नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२८, १० सप्टेंबर २०१४ (IST)
- मी हा कळफलक वापरुन मोबाईल संपादने केली आहेत अॅचा prolem भेडसावतोच येथे type केलेला अॅ ही याच कळफलकाने केला आहे संभव असल्यात crosstexting करुन पाहावे माझ्या कळफलकाचा screenshot देता येईल पण दोनचार दिवस शक्य होईल असे वाटत नाही. अॅ चा विषय गंभीर आहे घाई टाळावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) ११:१०, १० सप्टेंबर २०१४ (IST)
- होय विषयाचे विवीध पैलु जाणतोय. अभयशी चालू चर्चेचा संदर्भ त्यांच्या चर्चा पानावर मागे त्यांच्या आणि आशिष गायकवाड यांच्या चर्चेस अनुसरून आहे. मी एकुण प्रश्न पूर्ण सॉर्ट आऊट होण्यासाठी इ.स.२०२० पर्यंतचा टाईम टेबल धरून चाललो आहे अर्थात अशा गोष्टी एकेक मुद्दा क्लिअर करत पुढे जावे लागेल अगदीच हातावर हात धरून बसल्यास इ.स.२०२० मध्येही क्लिअर होणार नाही.
- एनीवे तुम्ही या प्रतिसादात टंकलेला ॲ हा ०९७२ वाला एकसंघ ॲ नाही. तुम्ही टंकलेल्या ॲ एकसंघ नसल्यामुळे अ+ॅ ची अभयनातू करतात तसे D@ ने आलेला असण्याची प्राथमीक शक्यता वाटते.
- ॲ एकसंघ नसेल तर ॲ च्या पाठीमागून बॅकस्पेस दिल्यास +ॅ चंद्रकोर वगळली जाते आणि फक्त अ शिल्लक राहतो. ०९७२ वाला एकसंघ ॲ ला बॅकस्पेस दिल्यास पूर्ण ॲ वगळला जातो. मराठी भाषेसाठी सुरवातीच्या काळात एकसंघ ॲ उपलब्ध नसल्यामुळे अ+ॅ करणे हा तात्पुरता दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होता आणि आहे. मी अभय नातूंना वर एकसंघ ०९७२ ॲ च्या अधिकृततेचा पुरावा तेवढा उपलब्ध केला.
- मी वरच्या कळफलकाच चित्र http://coe.maharashtra.gov.in/index.php?lang=mr या मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र या संस्थळावर सिडॅकने उपलब्ध केलेल्या कळफलकाचे घेतले आहे. तेथे ! वाचक चिन्हाच्या ठिकाणून ०९७२ वाला एकसंघ ॲ टंकला जातो.
- आता प्रश्न शिल्लक राहतो की विवीध फाँट संचात ऑपरेटींग सिस्टीम्स आणि ब्राऊजर ने ०९७२ वाला एकसंघ ॲ ला सपोर्ट करण्याचा प्रश्न उरतो याच्या करता अधिक वेळ निश्चित पणे लागणार प्रत्येकस्तरावर हे समजावून बग फाईल करून दुरुस्त्या करून इ.स. २०२० सहज उजाडले तर नवल नाही.
- इनस्क्रिप्ट कळफकलात ! चिन्हाच्या जागी सध्या टंकला जाणारा ऍ तसाही मराठी लोकांनी नाकारलेला आहे. हिंदी लोक तो वापरतात म्हणून तो अद्याप तिथे होता कारण इन्स्क्रिप्ट कळफलक आत्तापर्यंत देवनागरी लिपीला रिप्रेझेंट करत होता. आता बदललेल्या निर्णया नुसार भाषावार स्वतंत्र इन्सक्रिप्ट बोर्ड उपलब्ध होण्याचे निश्चीत झाले आणि अमलात येऊ लागले आहे. तो बदल http://coe.maharashtra.gov.in/index.php?lang=mr सिडॅकने इनस्क्रिप्टाकरता केला. बराहानेही मराठी इन्स्क्रीप्ट बोर्ड यानुसार बदललेला आहे. आणि विकिवरील ULS मराठी इन्स्क्रिप्ट सुविधेत सध्याची ऍ ची जागा मराठी ०९७२ वाला एकसंघ ॲ ला द्यावयाची हा प्रमाणीकरणाचा मुद्दा आहे.
- इनस्क्रिप्टात अ+ॅ ट्ंकण्यासाठी दोन कळा दाबाव्या लागतात (दुसरे व्याकरण शास्त्रींसाठी ॲ हा स्वर आहे जोडाक्षर नव्हे अ+ॅ चे टंकन जोडाक्षराप्रमाणे होते म्हणूनही एकसंघ ॲची मागणी असावी) ॲ ०९७२ वाला एकसंघ ॲ एकदाच टंकल्याने वेळ वाचतो आणि इन्स्क्रीप्टातील ॲ करताची ! चिन्हाची जागा वेळ वाचवण्यासाठी मोजून मापून तयार करून ठेवलेली आहे. अ+ॅ ने जोडलेला आणि एक संघ ॲ अनंत काळ सोबतही वावरू शकणार नाहीत एकसंघ ॲ ला त्याची हक्काची जागा कधीन कधी द्यावीच लागेल हा एक भाग झाला. मुख्य म्हणजे अ+ॅ ने जोडलेला आणि एक संघ ॲ युनिकोड तंत्राच्या दृष्टीने स्वतंत्र असल्यामुळे शोध यंत्रातून एकमेकांचे सर्व शोध येत नाहीत म्हणूनही एकसंघ ॲ च्या प्रमाणीकरणाची गरज आहे.
- ! चिन्हाच्या जागी एकसंघ ॲ उपलब्ध केला तरी अ+ॅ काँबीनेशन चा वापर बंद करणे वापरण्याचे, एकसंघ ॲ कंपल्शन इ.स. २०२० पर्यंत करणे टाळलेले बरे कारण (ग्रामीण आणि सरकारी महाराष्ट्रातील) जुन्या प्रणाली /संगणक बदलून नवे येई पर्यंत साधारणत: तेवढा वेळ जाईल असे वाटते. एकसंघ ॲ च्या दिशेने एकेक पाऊल टाकणे गरजेचे आहे मात्र घाई निश्चीतच नाही.
लेखामध्ये अनुक्रमणिका का दिसत नसावी ?
[संपादन]मी 'बोरची अणूची प्रतिकृती' या लेखावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या लेखामध्ये सध्या मी दोन विभाग तयार केले आहेत. परंतू मला लेखामध्ये ते विभाग अनुक्रमणिकेच्या स्वरूपात दिसत नाहीत. याचे काय कारण असावे? धन्यवाद
स्नेहल शेकटकर (चर्चा) २३:२२, १५ सप्टेंबर २०१४ (IST)
- अनुक्रमणिका आपोआप तयार होण्यासाठी लेखात किमान चार ==विभाग == असावे लागतात. सध्या १ उगम २ इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा कक्षा ३ संदर्भ हे तीनच विभाग असल्यामुळे अनुक्रमणिका दिसत नव्हती. आपणास हे उत्तर देण्यापुर्वी मी चौथा विभाग प्रायोगिक म्हणून जोडून पाहीला तेव्हा अनुक्रमणिका उपलब्ध झाली. अर्थात ते माझे संपादन मी मागे पलटवले. चारपेक्षा कमी विभाग असतील आणि तुम्हाला अनुक्रमणिका हवीच असेल तर लेखाच्या मथळ्यात __अनुक्रमणिकाहवीच__ हे जादुई शब्द वापरावेत सध्या लेखात मी __अनुक्रमणिकाहवीच__ हे वापरून दाखविले आहे त्यामुळे ३ विभाग असतानाही अनुक्रमणिका दिसते आहे. अशाच इतर जादुई शब्दांची माहिती विपी:जादुई शब्द येथे पहावी.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३५, १६ सप्टेंबर २०१४ (IST)
अडचण
[संपादन]आपण मला 'मी लिहीलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?' हे सांगितले होते पण मला हे स्पष्टपणे कळले नाही. कृपया पुन्हा एकदा सविस्तरपणे सांगावे. सोबतच 'एखाद्या पानाचे विलीनिकरण कसे करावे?' हे सुद्धा सांगावे.
Pushkar Pande (चर्चा) १९:५०, २७ सप्टेंबर २०१४ (IST)
शीर्षक
[संपादन]माहितगार, येथील व्यक्तींवरील लेखांच्या शीर्षकांमध्ये संपूर्ण नावे वापरण्याचा तुमचा अट्टाहास पूर्णपणे चुकीचा आहे. शीर्षके रोजच्या वापरातील नावांचीच असावीत. संपूर्ण नावाचा लेखामध्ये जरूर उल्लेख करा. उदा. शरद पवार ह्यांचा उल्लेख पेपर, बातम्या इत्यादी ठिकाणी शरद पवार असाच होतो, शरद गोविंदराव पवार असा नव्हे. तुम्ही स्वत:चे नाव लिहिताना प्रत्येक वेळी संपूर्ण नावच लिहिता का? इंग्लिश विकीपीडियावर बराक हुसेन ओबामा नावाचा लेख नाहीये पण बराक ओबामाचे संपूर्ण नाव लेखाच्या सुरूवातीलाच दिले आहे.
ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही प्रत्येक लेखाचे शीर्षक उगाच लांबडे करण्याचा अट्टाहास धरू नये ही विनंती. मी देवेंद्र फडणवीस लेखाचे शीर्षक पुन्हा बदलत आहे. त्यास आपला आक्षेप नाही असे गृहीत धरतो. - अभिजीत साठे (चर्चा) ११:१२, ३० सप्टेंबर २०१४ (IST)
- माहितगार, उगाच हा खेळ खेळत बसण्याऐवजी तुम्ही तुमची भूमिका का मांडत नाही? येथे पहा: [२] Wikipedia policies clearly state that common names should be used in titles.- अभिजीत साठे (चर्चा) ११:३६, ३० सप्टेंबर २०१४ (IST)
- अभिजित साठे यांचे जे म्हणणे आहे, तेच माझे पहिल्यापासूनचे आहे. पण विकिपीडियाच्या पॉलिसीच्या धाकाने वाचकाला अनोळखी असलेले ’व्यक्तीचे संपूर्ण नाव’ लिहावे लागते. पण यावरचा उपाय मी कधीच शोधून काढला आहे. रोजच्या वापरातल्या नावाने किंवा नावांनी पान/पाने उघडायची आणि त्या पानाचे/पानांचे नामांतर करून ते/ती बिनवापरातल्या नावावर स्थानांतरित करायची. हा माझा उद्योग गेली कित्येक महिने चालू आहे.
- कधीकधी मात्र एकच नावाने लोकप्रिय असणार्या एकाहून अधिक व्यक्ती असतात. त्यांना ओळखण्यात घोटाळा होऊ नये म्हणून संपूर्ण नावाचा आसरा घ्यावा लागतो, किंवा कंसात व्यक्तिवैशिष्ट्य लिहावे लागते. पण असे प्रसंग क्वचित येतात. पण तसे टाळण्यासाठी निःसंदिग्धीकरण हा शेवटचा उपाय असतोच !... J (चर्चा) २१:२५, ३० सप्टेंबर २०१४ (IST)
- >>रोजच्या वापरातल्या नावाने किंवा नावांनी पान/पाने उघडायची आणि त्या पानाचे/पानांचे नामांतर करून ते/ती संपूर्णनावावर स्थानांतरित करायची.<< 'जे' एका पेक्षा अधिक नावे असतातच आणि त्या पानाचे/पानांचे नामांतर करून ते/ती संपूर्णनावावर स्थानांतरित करायची हीच मराठी विकिपीडियाची अधिकृत निती आहे. सुयोग्य स्थानांतरणे उपलब्ध असल्यास वाचकाला कोणतीही अडचण येण्याचा प्रश्नच येत नाही आणि सहसा बहुतांश केसेस मध्ये मराठी विकिपीडियावर अशी स्थानांतरणे उपलब्ध आहेत. हवे तर नि:संग्धीकरण पानांची संख्या अजून वाढवूयात.
- संपूर्ण नाव लिहिण्यासाठीच्या आग्रहा मागची भूमीका मी वेळोवेळी मांडलेली आहे (सवडीनुसार एखादा निबंधही लिहून देईन).आंतरजालावरील लोकप्रिय व्यक्तींचे विषयांचे लेख लिहिणे हाच ज्ञान कोशांचा उद्देश आहे का ? की त्या पलिकडे जाऊन काही उद्देश आहे ? आंतरजालवर अथवा इतरत्र पेक्षा ज्ञानकोश म्हणून ज्ञानकोशाने वस्तुनिष्ठता जपण्या बद्दल अधिक सजग असणे गरजेचे आहे, लोकप्रीयतेवर अवलंबून निर्णय हा ज्ञानकोशांतील निर्णयांचा निकष असूच शकत नाही. ज्ञानकोशातील लेखन साक्षेपी असावयास हवे पण ज्ञानकोश वापरण्याची पुरेशी सवय नसलेल्या आणि सहसा व्यक्तीपुजेने/विभूतीपुजेने प्रभावित असलेल्या समाजातून आपला बहुसंख्य वाचक आणि लेखक वर्ग येतो तेव्हा, विकिपीडियातील साक्षेपी लेखनाची ज्ञानकोशीय संस्कृती व्य्वस्थीतपणे जपण्यासाठी लेखाच्या शीर्षका पाशीच ज्ञानकोशाचा निकष लोकप्रीयता आधारीत नाही हे व्यवस्थीत ठसवले अत्यंत गरजेचे आहे. ज्ञानकोशीय वस्तुनिष्ठतेचे आणि उल्लेखनीयतेचे निकष पार पाडल्यास लेख मजकुरातील एखादा भाग/टिका मला पटो अथवा न पटो त्या लेखात असणारच आहे ह्या ज्ञानकोशीय संस्कृतीची आणि सवय वाचक आणि लेखकांना शीर्षकापासूनच करून दिली जाणे मराठी पार्श्वभूमी वर मराठी विकिपीडियासाठी विशेष गरजेचे आहे.
- मराठी विकिपीडीया ज्ञानकोशातून माहिती घेऊन बाहेर जाणारा वाचक जेव्हा वस्तुनिष्ठ आणि अधिक पूर्ण माहिती घेऊन बाहेरच्या जगात वावरेल तेव्हा त्याच्या वाढीव माहितीचा ज्ञानाचा आणि प्रगल्भतेचा त्या वाचकाला खरा फायदा पोहचत असतो हाच ज्ञानकोशाचा वाचकाला होणारा खरा लाभ आहे. त्या मुळे जी माहिती त्याला आहेच किंवा आंतरजालावर इतरत्रही आहे ती आणि तेवढीच त्याला मिळणार असेल विकिपीडिया लेखांचा ज्ञानकोशीय विकास होतो आहे असे म्हणता येणार नाही. वस्तुनिष्ठ आणि अधिक माहिती मिळण्यासाठी सध्याची माहिती पुरेशी नाही ह्याचीही सर्वसामान्य वाचकाला कल्पना नसते; लेखांमध्ये केवळ अलंकृततता वर्णनात्मकता भरलेली असल्यास माहितीतील गॅप्स आणि कमतरता , वस्तुनिष्ठतेचा अभाव या गोष्टी सर्वसामान्य वाचकाला लक्षातही येत नाहीत सर्वसामान्य वाचक मग साक्षेपी माहिती वस्तुनिष्ठ असलीतरीही विरोध करावयास लागतो ज्ञानकोशाचा ज्ञानकोश म्हणून अभिप्रेत दर्जाही घसरावयास लागतो. भारतातील प्रथमस्तरीय स्रोत पुस्तके आणि वृत्तपत्रातूनही बऱ्याचदा पुरेशा नोंदी घेतल्या जात नाहीत. मग माहितीच्या अभावाच कमतरतेच वस्तुनिष्ठतेच्या अभावाच चक्र कायम चालू राहत. लेख शीर्षक पूर्ण नसेल तर ज्ञानकोशीय लेखकाला लगेच अंदाजा येतो की माहिती साठी आणि वस्तुनिष्ठतेसाठी अजून खोद(शोध)काम बाकी आहे. आणि हे शोधकाम होऊन लेखन झालेतरच ज्ञानकोशीय दर्जा सुधारत राहण्याची शक्यता आहे. हा एक ज्ञानकोशीय संस्कृती विकिसीत करण्याचा आणि जोपासण्यासा भाग आहे.
- "जे' म्हणतात त्या प्रमाणे एकाच नावाच्या एकाहून अधिक व्यक्ती असतात. त्यांना ओळखण्यात घोटाळा होऊ नये म्हणूनसुद्धा संपूर्ण नावाचाच आसरा घ्यावा लागतो. अक ज्ञानकोशीय लेखक म्हणून एकाच नावाची तुम्हाला सध्या एकच व्यक्ती परिचीत असेल आणि बाहेरच्या जगात एका पेक्षा अधिक त्याच नावाच्या व्यक्ती वावरत असू शकतात की ज्याची आपल्याला कल्पनाही असणार नाही आणि त्यातील कोणत्याही व्यक्तीस केव्हा ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्राप्त होईल आणि बाहेरच्या माहितीस्रोतातून माहिती मिळवणाऱ्या लेखकाचे त्याच्याही नकळत केव्हा घोटाळे होऊ लागतील हे सांगता येत नही. उदाहरणार्थ प्रकाश इनामदार यांच्या नावावर शोध घेता घेता मी एकदा व्यक्तीमत्व विकासाचे पुस्तक नोंदवणार होतो पण ते वस्तुत: त्याच नावाच्या जास्त प्रसिद्धी झोतात नसलेल्या दुसऱ्याच कुणा प्रकाश इनामदाराम्चे होते पण मी अधिक जागरूक असल्यामुळे नोंद करण्या पुर्वी खात्री केली. अशी असंख्य उदाहरणे आहेत. इतर लेखकांना सवय लावल्या शिवाय ते खात्री करणार नाहीत माहिती कॉपीपेस्ट करत राहतील. शीर्षकापासून संपूर्ण नावाचा उद्देश शीर्षकापासूनच माहितीचा शोध घेणाऱ्या ज्ञानकोशीय लेखकास सतत जागृत ठेवणे असाही आहे.
- अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे नाव लांब असूनही माझ्या डोळ्यांना खुपत नाही कारण त्याची मला सवय झालेली असते. हा पहातानाच्या सवयीचा भाग आहे. पूर्ण नाव दोनचारदा वाचले की हळू हळू आपोआपच सवय व्हावयास लागते म्हणून तो काही मुद्दा नाही.
- काही लेखक मंडळी केवळ इंग्रजी विकिपीडियाते मराठी विकिपीडिया अनुवाद करत असतात शोध घेऊन लिहिण्याच प्रमाण कमी असत त्यामुळेही माहिती मिळवण्यातील लेखांतर्गत दुवे देण्याच्या अशा वेळी होणाऱ्या घोटाळ्यांशी त्यांचा परिचय कमी झाला असण्याची संभावना असते. इतर नवागत लेखकांना ज्ञानकोशीय संस्कृतीचा परिचय करून देण्याची सवय कमी असते त्यामुले त्यांचेही काही गैरसमज दुर्दैवाने टिकुन असतात असे दिसते. एकतर लोकसंख्या अधिक असल्यामुळे असेल मागच्या पिढीतील ज्ञानकोशीय तत्वे जपणारी मंडळी काहीशी मागे पडतात असेही होत असेल पण इंग्रजी विकिपीडियाचेही लोकशाहीकरण होऊन ज्ञानकोशीय तत्वे बऱ्याचदा बाजूलाही पडलेली आढळतात त्यामुळे इंग्रजी विकिपीडियावर आहे ते सर्वच आदर्श आहे ही भूमीका रास्त असू शकत नाही मराठी विकिपीडिया एक स्वतंत्र विकिपीडिया आहे आपला विकिपीडिया मजकुराच्या बाबतीत विकसीत अन्सेल पण ज्ञानकोशीय तत्वांबद्दल फिलॉसॉफी बद्दल आपण अधिक जागरूक आणि सजग आहोत याचा आपणास अभिमान असावयास खरे तर हरकत नसावी आणि असा अभिमानच मराठी विकिपीडियाचा दर्जा उच्चस्तरीय ठेवण्यास मदत करणारा असेल.
- इतरही कारणांनी मराठी विकिपीडियातील संकेत धोरणे आपण स्वतंत्रपणे विकसीत करत असतो. मराठी लोकांनी स्वत:चे वैचारीक स्वातंत्र्य जपले पाहीजे. केवळ इंग्रजीचे अनुवाद करता करता आपण आपले वैचारीक स्वातंत्र्य केव्हा हरवून जाऊ त्याचा अन्यथा पत्ताही लागणार नाही. त्यामुळे इंग्रजी विकिपीडियाची आंधळी कॉपी करणे कदापि स्विकार्ह असणार नाही.
- मी उपरोक्त विषयावर इतरही सदस्यांशी चर्चा करताना बऱ्याचदा भूमीकेची मांडणी केली आहे सवडीने भूमीके मागच्या सर्व कारणांचा स्प्ष्टीकरणांचा मिळून सविस्तर निबंधही लिहून देईन.
- आपल्या भूमीका समजून घेण्यातील सहकार्यासाठी धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३६, १ ऑक्टोबर २०१४ (IST)
- माहितगार, तुमच्या एवढ्या मोठ्या रिप्लायवरून फक्त एवढेच कळले की हा तुमचा वैयक्तिक प्रेफरन्स आहे. तुम्हाला मी विकिपीडिया पॉलिसी दाखवली आहे. पॉलिसीमध्ये स्पष्ट लिहिले आहे की लेखाचे शीर्षक रोजच्या वापरातील नावाचेच असावे. येथे प्रत्येकाने आपल्या मनानुसार बदल करायचे ठरवल्यास नियमांची काय आवश्यकता? तुम्हाला काय वाटते त्याचा येथे आग्रह धरू नये. J ह्यांनी देखील माझ्या म्हणण्याला दुजोरा व्यक्त केला आहे. आपण जसे येथील वरिष्ठ सदस्य आहात तसे इतर जण देखील अनेक वर्षे येथे काम करीत आहेत. त्या सगळ्यांचे म्हणणे धुडकावून लावून स्वत:चेच घोडे पुढे दामटवू नका ही नम्र विनंती. [व्यक्तिलक्ष्य तर्कदोष]
- P.S.: नरेंद्र मोदी ह्या लेखावरील आंतरविकि दुवे पहा [३] आणि सांगा की इतर किती विकिपीडियावर शीर्षक नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे? उत्तर आहे: ० (शून्य)
- अभिजीत साठे (चर्चा) १३:१०, ७ ऑक्टोबर २०१४ (IST)
- साहेब, प्रथमदर्शनी आपल्या लेखनात व्यक्तिलक्ष्य तर्कदोष असल्याचे जाणवते आहे व्यक्तीगत आरोपांनी सुरवात करणे सकृतदर्शनी revisit करावे, तरीही मनमोकळ्या संवादासाठी धन्यवाद. मराठी विकिपीडियास स्वतंत्र स्वत:चे शीर्षक लेखना संकेत आहेत. मराठी विकिपीडियाचे शीर्षक लेखन संकेतांची इतरांनी काही वर्षे चर्चा केल्या नंतर मी संकलन केले त्यानंतर काही वर्षांनी अंमलबजावणी करतो आहे. या विषयाबाबत अनेक सदस्यांशी मी संवाद साधला आहे आणि तर्कसुसंगत भूमीकेस सर्व साधारण पणे सहमती आहे. केवळ एका लेखास एक निती आणि दुसऱ्या लेखास दुसरी निती लावण्याबद्दलही आक्षेप घेतले जाऊ शकतात (असतातच) , मराठी लोकांच्या भावना संवेदनशील होऊ शकतात, अधिक विवाद होऊ नयेत म्हणून भेदभाव विरहीत नितीस प्राधान्य देत आहे.
- अब कड व्यक्तीबद्दल अमूक या अथवा इतक्या विकिपीडिया लेखात असं लिहिल आहे आणि मग मराठी विकिपीडियानेही असेच लिहिले पाहीजे अशा पद्धतीचे तर्क ज्ञानकोशाच्या वस्तुनिष्ठतेस पायदळी तुडवतात. आपण टाकता आहात त्या पेक्षा कितीतरी कठोर पद्धतीने दबाव ज्ञानकोशावर आत्मियतेने बद्ध लोक टाकू इच्छितील. स्वातंत्र्य संस्कृती सिद्ध असत ते सातत्यानी चेतवायचं असतं किमान पक्षी अशी भूमीका ज्ञानकोशीय समुदायाकडून अभिप्रेत असावी असे वाटते.
- माझी स्वत:ची भूमीकाही वाचकांच्याही अडी अडचणी आजीबात लक्षात घेत नाही असे नाही, लेखक वाचकांसाठी साहाय्य विषयक सर्वाधिक अभ्यास मेहनत आणि वेळ मी खर्ची घालत असतो हे आपण जाणताच. सर्व स्थानांतरणे सुव्यव्स्थीत पुर्ननिर्देशनांनतरच केली जाताहेत. या नितीच्या अंमलबजावणीच्या सुरवाती पासूनच लेखांच्या पूर्णनाव स्थानांतरणानंतरही वाचक संख्येत कोणतीही घट येत नाही या कडेही माझे वारंवार सखोल लक्ष असते. त्या शिवाय आपण आणि जे यांच्या दृष्टिकोणाचाही आदर ठेऊन अधिक नि:संदिग्धीकरण पाने बनवण्याचे आश्वासन येथेच वर दिले आहे आणि कृतीची सुरवात म्हणून सुधीर या नावाचे नि:संदिग्धीकरण पान बनवले. या शिवाय माझा नि:संदिग्धीकरणार्थ शोध घेऊन मागेही निर्माण केलेली पाने आपण पाहू शकताच. मी मराठीतून माहिती शोधतो मराठीतून ज्ञानकोशीय लेखन करतो मराठीतून माहिती शोधताना आंतर्गत दुवे देताना होणाऱ्या घोटाळ्यांची मला व्यवस्थीत अनुभव असणे हे ही माझ्या मराठी विकिपीडियावरील शीर्षक लेखन संकेताच्या आग्रहाचे कारण आहे. (मराठीतून माहिती शोधून लेखन करून दुवे देणे हि अनुभवण्याचीच गोष्ट आणि या संबंधीचे निर्णय करताना विचारात घ्यावयाची गोष्ट आहे.
- आणि म्हणूनच आपला दृष्टीकोण सकारात्मक प्द्धतीने लक्षात घेऊनही माझ्या पद्धतीतही काही सुधारणा करूनही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.
- चर्चांमध्ये इतर विकिपीडियांचे संदर्भ निश्चितपणे लक्षात घेईन पण पण मराठी विकिपीडियाची कोणतीही निती स्थानिक स्वरूपाचीच असेल. माझ्याशी कुणी व्यक्तीगत अपमानास्पद वागले समजून घेऊ शकतो, मराठी भाषा आणि भारताच्या एकात्मतेस आवश्यक असलेले स्वातंत्र्य कदापीही डावावर लावले जाणार नाही; जिथ पर्यंत मराठी विकिपीडियाच्या निती स्वातंत्र्याची गोष्ट आहे त्या बाबत कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तडजोड अगदी वादविवादाच्या स्तरावर जाऊन सुद्धा स्विकार्ह असणार नाही हे पुन्हा एकदा सुस्प्ष्ट करू इच्छितो. आणि म्हणून इंग्रजी विकिपीडियावर अमूक निती आहे अरेबीक विकिपीडियावर अमूक निती आहे ती जशीच्या तशी लादूयात ह्या वृत्तीकडे नकारात्मक गांभीर्यानेच पाहीले जाईल त्यामुळे शक्यतो अशी भाषा भविष्यात टाळली गेल्यास आभारी असेन.
- आपल्या मन मोकळ्या संवादा साठी आणि सहकार्या साठी पुनश्च धन्यवाद. आणि आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
- अहो, पण तुमचीच निती बरोबर कशावरून? ह्यापूर्वी चर्चा किंवा poll घेतला होता का? पॉलिसी तुम्हीच ठरवली का? मराठी विकिपीडिया is a project, not an isolated website. तेव्हा इतर विकिपीडियांनी वापरलेले नियम येथे पण लागू व्हायलाच हवेत, तुमचे नियम नव्हे. तुमच्या authoritarian पद्धतीवर ह्यापूर्वी देखील प्रश्न विचारले गेले आहेत. [व्यक्तिलक्ष्य तर्कदोष] तुम्ही म्हणता अनेक सदस्यांशी संवाद साधला आहे, कोठे आहे तो संवाद. लिंक दाखवा जरा. - अभिजीत साठे (चर्चा) १५:४९, ७ ऑक्टोबर २०१४ (IST)
- आपण एक सक्रीय सदस्य आहात आणि मराठी विकिपीडियावरील साहाय्य पाने आणि चर्चा पानांचा शोध कसा घेतात ते मी आपणास वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी.
- >>पॉलिसी तुम्हीच ठरवली का?<< "मराठी विकिपीडियाचे शीर्षक लेखन संकेतांची इतरांनी काही वर्षे चर्चा केल्या नंतर मी संकलन केले" हे वर सुस्प्ष्ट नमूद केले आहे पुन्हा एकदा नमूद करत आहे लागल्यास अजून काही वेळा नमूद करेन.
- >>अहो, पण तुमचीच निती बरोबर कशावरून? ह्यापूर्वी चर्चा किंवा poll घेतला होता का? << आपण सक्रीय असूनही मराठी विकिपीडिया आणि ज्ञानकोशीय संकेतांबद्दल अद्याप पुरेसे अभ्यस्त होऊ शकला नाहीत याचा खेद वाटतो. निती माझी नाही मराठी विकिपीडियाची इतरांनी चर्चा करून बनवलेली निती आहे. आणि ती ज्ञानकोशास तर्क सुसंगत आहे, म्हणून बरोबर आहे मी म्हणतो म्हणून बरोबर आहे असे नव्हे. विकिपीडिया हि लोकशाही नव्हे केवळ तर्कसुसंगतता मह्त्वाची त्यामूळे प्रत्येक गोष्टीत कौल अनिवार्य नसतात. तर्कसुसंगततेच्या आग्रहाला कुणी सर्व तर्कसुद्धता नाकारत authoritarian वगैरे म्हणाले तरूईही माझ्यातापराधीत्वाची भावना येण्याचे कारण नाही कारण पुन्हा एकदा विकिपीडिया लोकशाही नाही.
- निर्णय तर्कसुसंगत असावेत हा माझा आग्रह आहे आणि तो तसाच राहील.
- अनेक वर्षे केलेल्या चर्चा आहेत तरी कोठे? दाखवा ना जरा. तुमचा आग्रह रहायला तुम्ही विकिपीडियाचे CEO आणि आम्ही employees आहोत की काय? जर आठवण नसेल तर सांगतो, संतोष दहिवळ ह्या अत्यंत कार्यशील सदस्यास येथून पळवून लावण्यास सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. इतरही अनेक असतील. बाकी मला वाटते येथील इतर सदस्यांनी ह्या चर्चेत सहभागी होऊन आपले मत स्पष्ट करावे. - अभिजीत साठे (चर्चा) १७:५०, ७ ऑक्टोबर २०१४ (IST)
- अभिजितने लिहिल्याप्रमाणे माझे मत येथे देत आहे. चर्चा बरीच मोठी दिसते आहे आणि मुद्दे अनेक आहेत, त्यातील एक-दोनांवरचे माझे मत --
- १. कोणत्याही शीर्षकसंकेतात प्रमाणीकरण (consistency) असावी.
- २. प्रमाणाबाहेर शीर्षक असल्यास तसे ठेवण्याच्या कारणासह इतरांकडून मते चर्चा पानावर मागावीत. मते आल्यास साधक-बाधक चर्चा व्हावी, त्यानंतर बहुमताने तर्कसंगत शीर्षक ठरवावे. मते न आल्यास काही काळाने (२ दिवस?) प्रस्तावित शीर्षक करावे.
- माहितगार, दोन स्पष्ट पण नम्र सूचना कराव्याशा वाटतात --
- अ. इतर ठिकाणी चर्चा झाली असल्यास त्याची आठवण करण्यास हरकत नाही परंतु आपण केलेल्या आर्ग्युमेंट किंवा अॅसर्शनचा पुरावा आपणचे देणे हा कोणत्याही चर्चेचा बेसिक नियम आहे. नाहीतर चर्चेला अर्थच उरणार नाही.
- ब. व्यक्तिशः आरोप किंवा खोचक लिहिणे चांगले नाहीच. आपण अभिजितला याची आठवण करून दिलीत. (साहेब, प्रथमदर्शनी आपल्या लेखनात व्यक्तिलक्ष्य तर्कदोष असल्याचे जाणवते आहे व्यक्तीगत आरोपांनी सुरवात करणे सकृतदर्शनी revisit करावे) असे असता मग आपण सक्रीय असूनही मराठी विकिपीडिया आणि ज्ञानकोशीय संकेतांबद्दल अद्याप पुरेसे अभ्यस्त होऊ शकला नाहीत याचा खेद वाटतो. हे वाक्य कशाला? कडवटपणा अशानेच वाढतो. मी हे आपणास एक सुज्ञ व अनुभवी विकिपीडियन समजून लिहीत आहे. यात अभिजितची कड घेण्याचा उद्देश नाही.
- असो, शीर्षकलेखनाचे संकेत लिहिण्यास सुरुवात करावी ही सगळ्यांनाच (पुन्हा एकदा) नम्र विनंती.
- अभय नातू (चर्चा) १५:५६, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
- अभय, माझी भूमिका अत्यंत सरळ आहे. शीर्षकासाठी विकिपीडियाने काही संकेत आखून दिले आहेत. त्यामधील पहिला संकेत म्हणजे रोजच्या वापरातील नावेच शीर्षकासाठी वापरावीत हा आहे. जर एकाच नावाच्या दोन व्यक्ती असतील तर पूर्ण नाव लिहावे. शिवाय जेव्हा खुद्द पंतप्रधानांच्या वेबसाईटवर त्यांचे नाव नरेंद्र मोदी असे लिहिले आहे: [४] तर आपण उगाच नरेंद्र दामोदरदास मोदी असे का लिहावे? लेखाच्या सुरुवातीस पूर्ण नाव देण्यात काहीच हरकत नाही. महाराष्ट्रीय व्यक्ती वगळता इतर प्रांतीयांमध्ये वडिलांचे नाव लावण्याची पद्धत नाही. हे मी ह्या पूर्वी देखील माहितगारांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे: चर्चा:देवयानी खोब्रागडे. ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लेखाचे शीर्षक ओढून ताणून लांब करण्याच्या व इतरांचे मत धुडकावून लावण्याच्या माहितगारांच्या शैलीला authoritarian म्हटले तर काय चुकले? - अभिजीत साठे (चर्चा) १६:१४, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
- माहितगारांच्या मनमानीचे अजून एक उदाहरण. पृथ्वीराज चव्हाण ह्यांचे पृथ्वीराज आनंदराव चव्हाण हे संपूर्ण नाव माहितगारांनी कोठून शोधून काढले? ह्या प्रतिज्ञापत्रावर त्यांचे नाव पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण असे दिले आहे. तसेच शिवसेनेच्या संकेतस्थळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कोठेही सापडत नाही तरी माहितगार त्याच नावाचे शीर्षक लिहिण्याचा अट्टाहास का करतात? अजून शेकडो उदाहरणे सापडतील. Where is the so-called तर्कसुसंगता in all this? - अभिजीत साठे (चर्चा) १७:२३, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
- अभय, काही गोष्टींबद्दल सहमत नसलो तरी सुद्धा, आपण चर्चेत मनमोकळा अभिप्राय दिलात या बद्दल धन्यवाद. कडवट पणा कशाने वाटतो या बद्दल आपण मला सांगण्याचा प्रयत्न केलात त्या बद्दल मला काहीच म्हणावयाचे नाही.अभिजीत यांची भाषा मी मनावर घ्यावयाचे टाळले म्हणजे ती सुयोग्य ठरते असे नव्हे. माझ्या दृष्टीने अभिजीत यांनी चर्चेचीच सुरवात पूर्वर्वग्रहांनी केली जी त्यांच्या त्यांच्या भाषेतून व्यक्त होते. त्यातील काही भाग त्यांच्या बाजूने कडवटपणा निर्माण करणारा असूनही मी त्याची चिरफाड करण्याचे शक्य तेवढे टाळले. शब्दास शब्द लागावयास नको म्हणून उत्तर 'जे' यांनाच उद्देशून दिले. आणि आत्ताही आपणास उद्देशून लिहित आहे.
- त्याही पेक्षा पहीले आणि सर्वात महत्वाचे मराठी विकिपीडियाच्या निती मराठी विकिपीडियाकरेल या बाबत कोणतीही तडजोड होणार नाही. आणि मराठी विकिपीडिया बाह्य नियमांना मराठी विकिपीडियाचे नियम जाणीव पुर्वक म्हणण्याची वृत्ती आगीत तेल घालण्यास कारणी भूत होते. ह्याची स्वत:च पेटवलेल्या आगीची झळ कुणाला स्वत:ला लागत असेल तर मी मुळीच जबाबदार नाही.
- अभयजी, मी कोणत्याही व्यक्तीस सविस्तर उत्तरे देतो याची आपणास कल्पना आहेच. मराठी विकिपीडियाचे स्थानिक नियम काही असलेच तर ते मी मानणार नाही या वृत्तीने चर्चेस अभिजीत यांनी सुरवात केल्याने मी त्यांच्या अरेरावीची दखल घेतली नाही. जर त्यांना इतर विकिपीडीयावर जाऊन तेथले नियम शोधता येतात तर मराठी विकिपीडियाच्या सर्च इंजीन मध्ये जाऊन "शीर्षक" या शब्दावर शोध देतायेत नाही काय. मी किमान दोन वेळा स्पष्ट केले की सर्व जुन्या चर्चा मी स्वत: केलेल्या नाहीत केवळ संकलन केले आहे ( आणि तरी सुद्धा अभिजीत यांनी बेछूट आरोप बाजी केलेली आपणास वर आढळेलच) तर मी त्या सर्व चर्चांचे दुवे कसे देऊ शकेन. असंख्य शीर्षक लेखन संकेत चर्चांमध्ये आपण स्वत: संकल्प इतर जुने प्रचालक आणि सदस्य सुद्धा असत. ह्या जुन्या चर्चा त्यांना शोध यंत्राचा आधार घेऊनच शोधाव्या लागतील.
- विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत या साहाय्य पान किमान हजार भर पानांवरून जोडले आहे. त्या शिवाय संपादन गाळणी सूचनांमधून हे पान जोडलेले आहे. इथे माझी आणि पांडे यांची साधी चर्चा तुमच्या डोळ्यातून निसटत नाही. शीर्षक लेखनाच्या संदर्भात एवढी वर्षे झालेल्या चर्चा अभिजीत यांना दिसल्या नसाव्यात अशी शक्यता अत्यंत कमी आहे. परंतु ज्या चर्चांमध्ये स्वत:च्या दृष्टीकोनाचे समर्थन होत नाही ते मला दिसलेच नाही ते मी वाचलेच नाही याला काय म्हणावे. तरीही त्यांनी संवाद सौजन्य पुर्वक साधला असता तर मी हजार नवख्या सदस्यांना दुवे आणि माहिती देत असतो अभिजीत यांना दिली नसती काय ?
- बरे वर मी एवढे मोठे एक्सप्लनेशन दिले त्यानां लांब रिडींग वाचणे जिवावर येते म्हणे इंग्रजी विकिपीडियावरची लांब पाने वाचलेली चालतात आपल्या सहयोगी सदस्याचे एक्सप्लनेशन जाचत असेल तर जाचू द्यात. माझ्या एक्सप्लनेशन मधील केवळ सुरवातीचे चार तर्कांचा तर्क पुर्वक प्रतिवाद केला असता तरीही चालले असते. व्यक्तीगत हल्ल्याच्या स्तराची भाषा करण्यात त्यांनी त्यांचा आणि माझाही वेळ दवडला एवढेच. काही नावांचे पूर्ण लेखन केले तर आकांड तांडव करावे एवढे आभाळ निश्चितपणे कोसळत नसावे.
- अभिजीत आणि इतरही काही सदस्य सक्रीय असूनही मराठी विकिपीडिया आणि ज्ञानकोशीय संकेतांबद्दल अद्याप पुरेसे अभ्यस्त होऊ शकला नाहीत याचा खेद वाटतो. हि वस्तुस्थिती आहे आणि खेद त्यांच्या वर कॉमेंट करण्या पेक्षा विकिपीडिया आणि ज्ञानकोश चळवळ कुठेतरी कमी पडते आहे या बद्दल आहे हे आपण लक्षात घ्याल.
- अभिजीत यांच्या आकांड तांडवामुळे किंवा त्यांची कुणी कड घेतल्यामुळे माझी मते बदलणार नाहीत ती केवळ तर्क सुसंगत चर्चातूनच बदलली जाऊ शकतात आणि स्वत:ची मते बदलण्यासाठीचा खूलेपणा माझ्यात मी ठेवतो तेव्हा तोच मनाचा खूलेपणा इतरांनीही ठेवावा अशी अपेक्षा ठेवतोच.
- तुर्तास शीर्षक लेखन संबंधाने माझी मते ठामच आहेत. अभिजीत किंवा इतर कुणी संदर्भासहीत त्रुटी शीर्षक लेखनात दाखवल्यास ती शीर्षके मी निश्चीतपणे बदलेन. पूर्ण लेखनाचे शीर्षक हा मराठी विकिपीडियाचा डिफॉल्ट संकेत आहे ज्यांना अपवाद हवेत त्यांनी त्या साठी संबधीत प्रत्येक लेखाच्या चर्चा पानावर स्वतंत्र चर्चा लावावी निर्णय लोकशाहीने नव्हे तर्कसुसंगत पणानेच होतील एवढे लिहून माझा तुर्तास या चर्चेस पूर्ण विराम.
शिर्षक चर्चा भाग २
[संपादन]आनंदराव चव्हाण यांचे ऑन रेकॉर्ड नाव दाजीसाहेब चव्हाण आहे हे उपलब्ध संदर्भा नुसार दिसते आणि तसा शीर्षक बदल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या विलवरील नाव बाळ केशव ठाकरे असेच आहे. आणि हा संदर्भ http://www.indiankanoon.org/docfragment/22987534/?formInput=Uddhav%20Thackeray
संदर्भ उपलब्ध होईपर्यंत विकिपीडियावर किंवा अन्य उपलब्ध स्रोतातून जी पूर्ण नावे आहेत ती वापरली जातील धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५८, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
- जाऊ द्या माहितगार. एकतर तुम्हाला माझा मुद्दा समजत नाहीये किंवा समजून घेण्यात तुमचा अहंकार आड येतोय. असो. मी सूज्ञपणा दाखवून माघार घेतो. आणि आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा. - अभिजीत साठे (चर्चा) २३:३५, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
धन्यवाद
तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३७, ८ ऑक्टोबर २०१४ (IST)
- शीर्षकलेखन संकेत येथे आहेत. त्यानुसार प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.
- यात अपवाद हवा असल्यास लेखाच्या चर्चापानावर साद घालून मते मागवावी. मते मिळाल्यास बहुमताने ठरवावे. साद घातल्याच्या चार दिवसांत मते न मिळाल्यास प्रस्तावित बदल करावा. हे नमूद करावे असा माझा प्रस्ताव आहे. तो मी ध्येयधोरणे चावडीवर लवकरच घालीत आहे. तेथे कृपया आपले मत द्यावे. असे केल्याने हा वाद थांबेल व मराठी विकिपीडियावरील संकेत/नियम घट्ट होण्यास मदत होईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:०२, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
- येथे प्रस्ताव मांडलेला आहे. कृपया यावर आपले मत मांडावे.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) ०२:०९, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
प्रश्न
[संपादन]विकिपीडिया वरील मासिक सदर व उदयोन्मुख लेख किती दिवसांनी बदलले जातात?
Pushkar Pande (चर्चा) १९:२०, ०६ आॅक्टोबर, २०१४ (IST)
- मुखपृष्ठावरील लेख सहसा ज्ञानकोशीय दृष्ट्या दर्जेदार असणे अभिप्रेत असते, आणि ज्ञानकोशीय दृष्ट्या अशा दर्जेदार लेखांचा तुटवडा ही एक मुख्य समस्या आहे. दर्जेदार लेखांची पुरेशी उपलब्धता असल्यास दर महिन्याला, दर आठवड्याला किंवा दर दिवशी बदलण्यासही हरकत नसावी.
- आहे त्या मनुष्यबळा निशी उत्साहात एखाद वेळेस एखादा लेख होऊन जातो पण आंगी बळ एकवटून कामकरून उपलब्ध मनुष्यबळ कोणत्यातरी पाँइंटवर थकते. मराठी विकिपीडियावर सहसा संपादकांची एक फळी येते काम करते नंतर दिसेनाशी होते नंतर नवीन फळी येते काम करते आणि जाते. कारण एकूण मनुष्यबळाचा तुटवडा हा तुटवडा असण्याचीही बरीच कारणे अभ्यासली आहेत त्या बद्दल सावकाश काही ना काही उपाय योजना चालू असते नाही असे नाही.
- काही विशीष्ट साहाय्य हवे असल्यास जरूर सांगावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३६, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)
अडचण
[संपादन]मराठी विकिपीडियावर अर्धा 'र्' कसा लिहावा?
Pushkar Pande (चर्चा) १९:४४, ०७ आॅक्टोबर, २०१४ (IST)
मी मराठी विकिपीडियावर लिहीताना मराठी इनस्क्रिप्ट या लेखनपद्धतीचा वापर करतो. तेव्हा मराठी इनस्क्रिप्ट पद्धतीत अर्धा 'र्' कसा लिहावा? हे कृपया सांगावे.
Pushkar Pande (चर्चा) २०:२०, १० आॅक्टोबर, २०१४ (IST)
आपण मला जे मार्गदर्शन केले त्यानुसार अर्धा र् न येता य वर रफार येतो आहे.
Pushkar Pande (चर्चा) १९:३५, ११ आॅक्टोबर, २०१४ (IST)
Please subscribe to the global renamers mailing list
[संपादन]धन्यवाद
[संपादन]आपल्य उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
Pushkar Pande (चर्चा) २१:१६, ११ आॅक्टोबर, २०१४ (IST)
विलीनीकरण
[संपादन]एखाद्या पानाचे दुसऱ्या पानात विलीनीकरण कसे करावे?
Pushkar Pande (चर्चा) १९:४४, १३ आॅक्टोबर, २०१४ (IST)
Dear global renamer,
You have not yet subscribed to the global renamers mailing list. Considering the diverse background of all renamers, and with the intention to create an efficient platform for direct internal assistance and discussion, we strongly encourage you to do so. Please subscribe here and send me or Trijnstel an email to confirm it is you requesting it. Should you have any questions or comments, please let us know.
Thank you, Savhñ ०४:३४, ३ ऑक्टोबर २०१४ (IST)
- Hi. Can you please look at your inbox? I've send you an email. We received a subscription, but would like to have it confirmed whether it came from you or not. Trijnstel (चर्चा) १५:०४, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)
समर्थ रामदास स्वामी
[संपादन]समर्थ रामदास स्वामी हे पान नारायण सूर्याजी ठोसरकडे स्थानांतरीत करताना अनेक गाळण्यांचा अडथळा आल्याने स्थानांतरण होऊ शकले नाही तरी समर्थ रामदास स्वामी या पानाची ही आवृत्ती पुर्नस्थापित करुन नारायण सूर्याजी ठोसर हे पूर्वीचे पान वगळून त्याकडे स्थानांतरीत करावी जेणेकरुन संपादन इतिहास सांभाळला जाईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:३१, २२ ऑक्टोबर २०१४ (IST)
- संदेश वाचला. या क्षणी जरासा व्यस्त आहे, तरीही अभ्यासून लौकरात लौकर करण्याचा प्रयत्न करतो.
- धन्यवाद आणि दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४२, २२ ऑक्टोबर २०१४ (IST)
help for Sanskrit Wikipedia
[संपादन]Hi ! I am NehalDaveND a user of Sanskrit Wikipedia. Since long period I am going through a trouble. See here...
https://commons.wikimedia.org/wiki/User_talk:NehalDaveND#Copyright_violations
Please help to gain information and guide me for Image uploading.
I am a contributor of Sanskrit Wikipedia. But no one helps me in the editing. I have wrote so many articles but so many articles have not templates, infobox, images, language links etc... You defiantly know that how to work in wikipedia. Please guide me to improve my article's reliability. here..
I was finding solution of my problems regarding templates, infobox etc. than I found your [५] page. So I ask you for help.
Please help me..... NehalDaveND (चर्चा) १३:०१, २६ डिसेंबर २०१४ (IST)
विकिमीडिया कॉमन्समध्ये आपण कायकाय टाकू शकता?
[संपादन]- केवळ तुमची स्वतःचीच निर्मिती असलेले काम तुम्ही चढवू (अपलोडू) शकता. मात्र आपले असे साहित्य आपणास पूर्वसूचित न करताही नकलवण्याची, बदलण्याची तसेच विक्रीचीही सर्वांना मुभा असेल, हे ध्यानात असू द्यावे.
- अशा साहित्यांत खालील प्रकारच्या छायाचिचित्रांचा आणि चित्रफितींचा अंंतर्भाव करता येईल :
- निसर्गचित्रे, प्राण्यांची किंवा वनस्पतींची नैसर्गिक छायाचित्रे
- लोकांची किंवा खास व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी काढलेली छायाचित्रे
- कलात्मक नसलेल्या पण उपयोगी वस्तूंची चित्रे
- अस्सल आलेख, नकाशे, आकृत्या ध्वनिमुदिते साहित्य
लक्षात घ्या, तुमचे स्वतःचे नसलेले किंवा दुसर्या कुणाच्या तरी कामाची भ्रष्ट नक्कल असलेले साहित्य आम्ही स्वीकारत नाही. अशा साहित्यामध्ये
- बोधचिन्हे
- सीडी/डीव्हीडी यांच्या मुखपृष्ठावरील छापील साहित्य
- प्रसिद्धी मिळवण्यासाठी काढलेली छायाचित्रे
- दूरचित्रवाणी, चित्रपट, आदींच्या कार्यक्रमांचे स्क्रीनशॉट किंवा त्यांचे सॉफ्टवेअर
- दूरचित्रवाणीवर वा चित्रपटांत दिसणार्या पात्रांची किंवा कॉमिक्समधील पात्रांची चित्रे, अगदी तुम्ही स्वत: काढली असली तरी.
- आंतरजालावरून उतरवलेली बहुतांशी चित्रे, यांचा समावेश असेल.
मात्र,
- जर मूळ कलावंतानेे त्याची कृती नकलवण्याची, त्यात फेरबदल करण्याची अथवा त्या साहित्याची विक्रीची खुली लिखित अनुमती दिली असल्यास असे साहित्य तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता. आणि,
- साधारणपणे दीडशे वर्षांहूनही जुन्या कलाकृती, पुतळे, आणि वास्तू यांची तुम्ही स्वतः काढलेली चित्रे किंवा छायाचित्रेही तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता.
थोडक्यात काय तर तुमची स्वतःचीच निर्मिती असलेल्या कृती किंवा
त्या साहित्यावर ज्याचा हक्क आहे अशा संबंधित व्यक्तीची सुस्पष्ट लिखित परवानगी असलेल्या कृतीच आही स्वीकारतो.
अजूनही साशंक असल्यास मदतकेंद्रावर आपली शंका जरूर विचारावी.
....J (चर्चा) २३:२४, ७ मार्च २०१५ (IST)
Invitation
[संपादन]Hello, Mahitgar,
The Editing team is asking for your help with VisualEditor. I am contacting you because you posted to a feedback page for VisualEditor. Please tell them what they need to change to make VisualEditor work well for you. The team has a list of top-priority problems, but they also want to hear about small problems. These problems may make editing less fun, take too much of your time, or be as annoying as a paper cut. The Editing team wants to hear about and try to fix these small things, too.
You can share your thoughts by clicking this link. You may respond to this quick, simple, anonymous survey in your own language. If you take the survey, then you agree your responses may be used in accordance with these terms. This survey is powered by Qualtrics and their use of your information is governed by their privacy policy.
More information (including a translateable list of the questions) is posted on wiki at mw:VisualEditor/Survey 2015. If you have questions, or prefer to respond on-wiki, then please leave a message on the survey's talk page.
Thank you, Whatamidoing (WMF) (talk) २१:२६, २६ मार्च २०१५ (IST)
नमस्कार
[संपादन]मला, जुन २०१४ मध्ये झालेल्या एका घरघुती अपघातामुळे, माझा उजवा हात जायबंदी झाला होता. तो अद्याप पूर्वपदावर आला नाही.सबब,टंकलेखन करणे शक्य नसल्यामूळे, माझे येथे येणे शक्य झाले नाही. पुर्वीसारखा येथे वेळ देता येणार नाही याची खूप खंत वाटत आहे.बाकी क्षेम. मी प्रचालकपदावर रहावे काय कारण पूर्वीसारखा त्या पदाला न्याय देणे जमणार नाही.आपले याबद्दलचे विचार कृपया कळवावेत ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १२:११, २९ मार्च २०१५ (IST)
विषय : "दिनपत्रिका" शब्दाचा खरं अर्थ काय?
[संपादन]माहितगार साहेब, सप्रेम नमस्कार.
एका विषयावर मला तुमची मदत हवी.
सध्या अंतर्जालमध्ये शोधताना "दिनपत्रिका" हे एक शब्द मला पाहायला आलं. ह्यावर मला आठवलं, मराठीत "कॅलेंडर" ह्या वस्तूला "दिनदर्शिका" असं म्हटला जातो.
तसंच मला असा वाटलं, "दिनपत्रिका" शब्दाचा अर्थ कदाचित "डायरी" असू शकतात. पण मला या बद्दल नीट माहिती नाहीये. हे नुसतं एक अनुमान आहे.
म्हणून मी जाणू इच्छितात "दिनपत्रिका" ह्या शब्दाचा खरं अर्थ काय? मला अनुमानप्रमाणे त्या "डायरी"च आहे, कि त्याचं काही वेगळंच अर्थ आहे?
तुमच्या उत्तराची वाट पाहतोय.
।। आभार ।। Souwrit.ray (चर्चा) २०:२५, १ एप्रिल २०१५ (IST)
- मराठीत "कॅलेंडर" ह्या वस्तूला "दिनदर्शिका" असं म्हटला जातो = :.
- दिनपत्रिका शब्द मराठीत फारसा वापरात नाही.
- मराठीत "डायरी" = रोजनिशी किंवा अनुदिनी (आजकाल ब्लॉग्ससाठी अनुदिनी शब्द वापरतात, ज्या लोकांना डायरीसाठी अनुदिनी शब्द माहित नाही ते डायरी शब्दच वापरताना दिसतात)
- दिन-पत्र हिंदी शब्द = तिथि-पत्र/ (कैलेंडर) संदर्भ http://pustak.org/home.php?mean=29788
- दिनपत्रिका संस्कृत शब्द = . daily newspaper संदर्भ स्पोकन संस्कृत डिक्शनरी
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०१, १ एप्रिल २०१५ (IST)
लायसन्सींग ट्यूटोरीयल काम सुरु आहे
[संपादन]लायसन्सींग ट्यूटोरीयल अद्ययावत स्वरूपात उपलब्ध केले आहे तरी आपण, स्वतः शुद्धलेखन तपासणी करावी. संतोष शिनगारे ११:०९, ७ एप्रिल २०१५ (IST) चित्र:Licensing tutorial mr.svg
- आपल्याला संदेश दिल्यानंतर मध्यंतरात सदस्य:J यांचे साहाय्य उपलब्ध झाल्याने शुद्धलेखन तपासणी पूर्ण झालेली होती, तरीही मजकुर पुन्हा एकदा ढोबळ पणे तपासला आणि तो ठिक आहे.
- कॉमन्सवरील अपलोड विझार्डमध्ये चित्राचा साईज मोठा वापरला जात असल्याने सध्याचेही चित्र कॉमन्सच्या दृष्टीने पुरेसे ठरावे असे वाटते.
- * छोट्या अक्षरांचा फाँट साईज एखाद पाँईटने जास्त ठेवणे सहजपणे शक्य आल्यास साध्या डोळ्यांनी वाचणे (मला चष्मा असल्यामुळे :) ) अधीक सोपे जाईल असे वाटते. काही अक्षरे एकमेकांना चिटकत आहेत असे भासते आहे, हा कदाचित फाँटफेस किंवा रेंडरींगचा इश्यू शकेल का. commons:File:Licensing tutorial hi.svg (कॉमन्सवर हिंदीचे काम commons:User:Guillom यांनी केले असे दिसते)हि कॉमन्सवरील हिंदी फाईल पाहिली असता एक तर अक्षरे जरा मोकळी वाचण्यास सोपी वाटताहेत. समस्येचे मूळ कदाचित माझ्या लेखनाची सहसा लांबी अधीक असते हा माझ्या लेखनाचा दोषातही असू शकेल. कदाचित मजकुराचे अधिक संक्षिप्तीकरण झाले तरी हा मुद्दा कदाचित हलका होईल, पण हे काळाच्या ओघातच शक्य होईल) .
- तुर्तास शक्य असलेली सुधारणा करून विकिमिडीया कॉमन्सवर चढवावे अशी विनंती आहे उर्वरीत सुधारणा आपल्या सवडीनुसार काळाच्या ओघात होत राहतील.
- आपण आठवणीने हे काम मनावर घेउन तडीस नेल्या बद्दल मन:पुर्वक धन्यवाद.
- आपल्या आवडीचे लेखन वाचन घडत राहो हि शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२४, ७ एप्रिल २०१५ (IST)
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा
[संपादन]नमस्कार,
मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १९:५८, ९ एप्रिल २०१५ (IST)
इतरभाषिक गाळणी
[संपादन]नमस्कार,
गाळणी टाकण्यास हरकत नाही परंतु सरसकट गाळणी घातल्याने हवे असलेले शब्दांमुळे संपादने अडण्याची शक्यता आहे (उदा: चिनी नावे.) तरी गाळणीत तरतूद करावी.
अभय नातू (चर्चा) २२:३७, १९ एप्रिल २०१५ (IST)
- या विषयावर चिंता नसावी, सर्वसाधारणपणे काळजी घेतोय. (सध्या छायाचित्र कॉपीराईट बद्दल शोध आणि लेखनात व्यस्त आहे, त्या नंतर सवडीने आपणास गाळण्यांबद्दल अधिक माहिती अवश्य कळवेन)