चर्चा:देवयानी खोब्रागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तात्पुरती संदर्भयादी[संपादन]

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

संदर्भयादी[संपादन]

नाव[संपादन]

सर्व बातम्या, वृत्तपत्रे, ऑनलाईन इत्यादी ठिकाणी देवयानी खोब्रागडे हेच नाव वापरले जात आहे मग येथे संपूर्ण नावाचे लांबड कशाला? लेखामध्ये पूर्ण नाव mention केले आहेच, त्यामुळे शीर्षक लाहानच असावे. - अभिजीत साठे (चर्चा) १९:०२, २२ डिसेंबर २०१३ (IST)

माझ मत पुर्णत: वेगळ आहे.या संदर्भाने मी वेळोवेळी विस्तृत उहापोह केलेला आहे. विश्वकोशाची जबाबदारी वस्तुनिष्ठता जपण्याची आहेच. सोबतच माझा मुख्य उद्देश विश्वकोशात येणाऱ्या मंडळींना पुर्ण नावाच्या निमीत्ताने वस्तुनिष्ठतेचा आग्रह आणि पाठपुरावा आणि वाचक आणि लेखकांची मानसिक तयारी करणे सोपे जाते हाही आहे. देवयानी खोब्रागडे,आकाशसिंग राठोड या व्यक्तीशी विवाहीत आहेत त्या अर्थाने त्यांचे नाव देवयानी आकाशसिंग राठोड असे आहे. स्त्रीयाम्च्या बाबतीत माहेरच्या आडनावाचाही समावेश आजकाल पूर्ण नाव लेखनात केला जातो.


पुर्ण नावांमुळे नि:संदिग्धीकरणही सोपे जाते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२०, २२ डिसेंबर २०१३ (IST)
माहितगार, स्त्रीचे लग्न झाले असल्यानंतर ती पतीचे आडनाव लावेलच हा आपला आग्रह चुकीचा आहे. माझ्या माहितीमधील अनेक महिला लग्नानंतरही आधीचेच आडनाव वापरतात. तसेच उत्तर व दक्षिण भारतामध्ये व्यक्तीच्या नावात वडील किंवा नवऱ्याच्या नावाचा उल्लेख नसतो, उदा. अमूक संजीव कुमार ह्याचा मुलगा अमित कुमार होतो, अमित संजीव कुमार नव्हे. दक्षिण भारतीय नावांबाबतीत असेच आहे.
सद्य विषयाबाबत: आपणास देवायानीचे संपूर्ण नाव कोठे सापडले ह्याचा संदर्भ द्याल काय? जर हा आपला केवळ तर्क असेल तर मी वर लिहिल्याप्रमाणे तो चुकीचा आहे. मराठी नामकरण पद्दत इतर प्रांताच्या किंबहुना सर्व मराठी लोकांसाठी वापरायचा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. - अभिजीत साठे (चर्चा) १२:०४, २३ डिसेंबर २०१३ (IST)
  • मी अभिजीत साठे अभिजीत साठे यांच्या मताशी पूर्णत: सहमत आहे. साळवे रामप्रसाद १४:०९, २३ डिसेंबर २०१३ (IST)नमस्कार अभिजीत ,
>>स्त्रीचे लग्न झाले असल्यानंतर ती पतीचे आडनाव लावेलच हा आपला आग्रह चुकीचा आहे.<< प्रत्येक व्यक्तीन स्वत:च नाव काय असाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,त्यामुळे त्यांनी काय नाव लावाव त्यांचा प्रश्न आहे.


शक्यतोवर व्यक्ती स्वत: पूर्ण नाव जसे लिहिते त्यास प्राधान्य द्यावे याचा उद्देश Material Factsचे proper representation होते हा आहे.या विषीष्ट लेखाच्या संदर्भाने सांगावयाचे झाल्यास आकाशसिंग राठोड हा व्यक्ती ओळखीचा भाग देणे आणि न देणे याने लेखातून प्रसृत होणाऱ्या माहितीत material difference महत्वपूर्ण फरक पडतो किंवा पडत नाही ? माझ्या मतानुसार या विशिष्ट केसमध्ये फरक पडतो आहे.
केवळ देवयानी खोब्रागडेंचा पगार केवळ ४१५० डॉलर आहे आणि मेडला द्यावा लागणारा पगार ४५०० डॉलर हे गणित अशक्य दाखवल्या नंतर निघणारा निष्कर्ष आणि देवयानी खोब्रागडें यांची ओळख केवळ देवयानी खोब्रागडे नाही, खरी ओळख देवयानी आकाशसिंग खोब्रागडें-राठोड अशी आहे म्हटल्या नंतर पुर्ण कुटूंबाच उत्पन्न किती आणि मेडला दिला जाणारा पगार किती याचा सहसंबंध आणि निष्कर्षात फरक पडतो किंवा कसे.
"देवयानी उत्तम खोब्रागडे" हि ओळख देवयानींना आमेरीकेतील कायद्यांच्या गांभीर्याची कल्पना नव्हती हा 'बेनीफीट ऑफ डॉऊट' देते. तशी "देवयानी आकाशसिंग खोब्रागडें-राठोड" ओळख, 'बेनीफीट ऑफ डाऊट' बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करते. देवयानी खोब्रागडे यांच्या कृतीच्या योग्यायोग्येतेशी येथे देणे घेणे नाही. Material Factsचे proper representation सर्वाधिक योग्य कशातून होते याचा विचार करावा.
स्त्री नावांच्या शीर्षक लेखनाच्या बाबतीत केवळ या एका नावावरून संकेत बनवावा असाही आग्रह नाही. इतरही स्त्री नावांच्या शीर्षक लेखना बाबतीत आपण पुढच्या काळात सर्वजण चर्चा करत राहू. काळाच्या ओघात जे काही संकेत रूढ होतील ते स्विकारूयात.
आपणा सर्वांना चर्चेत आपले मत मांडण्याकरता धन्यवाद आणि आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहोही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४८, २३ डिसेंबर २०१३ (IST)
केवळ देवयानी खोब्रागडेंचा पगार केवळ ४१५० डॉलर आहे आणि मेडला द्यावा लागणारा पगार ४५०० डॉलर हे गणित अशक्य दाखवल्या नंतर निघणारा निष्कर्ष आणि देवयानी खोब्रागडें यांची ओळख केवळ देवयानी खोब्रागडे नाही, खरी ओळख देवयानी आकाशसिंग खोब्रागडें-राठोड अशी आहे म्हटल्या नंतर पुर्ण कुटूंबाच उत्पन्न किती आणि मेडला दिला जाणारा पगार किती याचा सहसंबंध आणि निष्कर्षात फरक पडतो किंवा कसे. - अजिबात नाही. आरोप फक्त देवयानीवर आहेत तिच्या पतीवर नाही. ती मॅरीड आहे की नाही ह्याचा ह्या केससोबत काहीच संबंध नाहीये. पण मूळ मुद्दा असा उरतोच की देवयानीचे संपूर्ण नाव आपण कोठे पाहिले/वाचले आहे? ह्या पानाला भेट द्या: http://www.indiacgny.org/pages.php?id=45 येथे Dr. Devyani Khobragade हेच नाव आहे. तर मग तिचे नाव मराठी विकिपीडियावर देवयानी आकाशसिंग खोब्रागडें-राठोड असे का म्हणून लिहावे?
ही सर्व चर्चा friendly वातावरणात सुरू आहे. कृपया गैरसमज नसावा. - अभिजीत साठे (चर्चा) १५:२७, २३ डिसेंबर २०१३ (IST)
>>ही सर्व चर्चा friendly वातावरणात सुरू आहे. कृपया गैरसमज नसावा.<< होय माझीही इतरांना हिच विनंती आहे.मी माझा ओरीजनल रिसर्च सदरात मोडणारी व्यक्तीगत मते आणि POV मिपा या संस्थळावर मर्यादीत ठेवली आहेत.
देवयानी खोब्रागडेंचे उत्पन्न १ डॉलर आहे का १ अब्ज डॉलर आहे हे आमेरीकेतल्या कोर्टाला काही देणे घेणे नसावे. कोर्टातल्या केसचे निष्कर्ष काय असतील याचे निकाल येत नाही तो पर्यंत ज्ञानकोशास देणे घेणे नाही.दोन्ही बाजूंनी माध्यमांना दिली जाणारी माहिती कदाचीत सलेक्टीव्हली दिली जाते आहे,आणि त्याचा उद्देश कदाचित जनमत प्रभावित करण्याचा आहे.उदाहरणार्थ देवयानी खोब्रागडेंचे प्रतिनिधित्व करण्याकरता त्यांच्या माहेरची मंडळीच दिसत होती पतींचे नाव टाळले जात होते त्याच प्रमाणे संगीता रिचर्ड बाईंच्या बाजूने या संगीता मुळच्या कोण कुठल्या याची कोणतीच माहिती पुढे येत नाही.


देवयानी खोब्रागडेंचा पगार केवळ ४१५० डॉलर आहे हि माहिती सुद्धा जनमत प्रभावित करण्याकरता दिली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मेडचा पगार भारत सरकारची नव्हे तर खोब्रागडे-राठोड कुटूंबाची होती किंवा कसे.खोब्रागडेंचे उत्पन्न न मोजताही त्यांच्या करता जे काही करावयाचे ते भारत सरकारला करावेच लागले असते. खोब्रागडे-राठोड उत्पन्न एकत्र मोजले गेले असते तर ४१५०- ४५०० या तुलनेतून मिळणारी जनमताकडून मिळणारी ॲडीशनल सहानुभूतीत फरक पडतो.ज्ञानकोशीय वाचकाने काय निश्कर्ष काढावयाचे ते काढण्यास मुक्त आहेत. पण आकाशसिंग राठोड या नावा सोबत देवयांनींचे नाव दिले किंवा नाही दिले याचा,ज ज्ञानकोशीय वाचकाकडून काढल्या जाणाऱ्या निष्कर्षात फरक पडतो.म्हणजे नाव सोबत अस्तीत्वात असूनही ज्ञानकोशाने त्याचे योग्य सादरीकरण न करणे हे ज्ञानकोशाच्या उद्दीष्टास सुसंगत ठरणार नाही. उत्पन्ना प्रमाणेच फरक बेनीफीट ऑफ डाऊटने सुद्धा पडतो आकाशसिंग आमेरीकेन नागरीक आणि प्रोफेसर (बहुधा कायद्दाचे अभ्यासक सुद्धा) असतील तर देवयानी खोब्रागडेंना तेथील कायद्यांचे पद्धतींचे गांभीर्य माहित होण्यास संपूर्ण वाव होता असा अर्थ होतो.
जसे संदर्भा करता आपण इतर माध्यमांचा शोध घेतो तसे इतर मराठी माध्यमे आणि वाचक मराठी विकिपीडियाही वाचतात त्यांना आकाशसिंग राठोड या नावा सहीत सुसंगत माहिती द्यावयाची का टाळावयाची.देवयानी खोब्रागडे त्यांचे नाव देवयानी खोब्रागडे देवयानी उत्तम खोब्रागडे किंवा अजून वेगळ्या पद्धतीने लिहित असतील.ज्ञानकोश नाव नमूदकरताना स्वत:ची जबाबदारी यथायोग्यपणे पार पाडतो आहे का हा ज्ञानकोश लेखक संपादकांपुढचा प्रश्न आहे.
अर्थात मी आधी म्हटल्या प्रमाणे स्त्री नावांचे शीर्षक लेखन असा केवळ स्त्री नावांकरता म्हणून विषय मराठी विकिपीडियावर फारसा चर्चीला गेला नाही. काळाच्या ओघात अजून विवीध लेखात चर्चा होतील तेव्हा पाहू .म्हणून माझे मत आग्रही असले तरी घाई मुळीच नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३९, २३ डिसेंबर २०१३ (IST)