Jump to content

श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी हे श्री. प्रभाकर नुलकर लिखित पुस्तक आहे. हे श्रीअरविंद यांचे चरित्र आहे.

प्रथम या पुस्तकातील लेख लोकमत या नियतकालिकामध्ये सदररूपाने प्रकाशित झाले होते. श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी या पुस्तकाचे प्रकाशन दि. १५ ऑगस्ट १९९५ रोजी म्हणजे श्रीअरविंद जयंतीच्या दिवशी झाले.[]

श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी
लेखक प्रभाकर नुलकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्र-ग्रंथ
प्रकाशन संस्था कर्मयोगी प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९७
विषय श्रीअरविंद चरित्र
पृष्ठसंख्या २२९

अभिप्राय

[संपादन]

श्रीअरविंदांच्या चरित्राची आणि कार्याची उत्तम आणि सांगोपांग ओळख मराठी वाचकांना या पुस्तकाने होईल, असे मत ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज यांनी नोंदविले आहे.

भारतीय तत्त्वज्ञान, योगाभ्यास आणि अध्यात्म यांच्या विश्वात भर घालून गेलेल्या एका थोर व्यक्तिमत्त्वाचे हे साहित्य आणि चरित्र नव्या पिढीने वाचले पाहिजे. असे उद्गार श्री. माधव गडकरी यांनी काढले होते. []


संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b निरोदबरन. अखेरचे पर्व. सोलापूर: कर्मयोगी प्रकाशन.