प्रभाकर नुलकर
प्रभाकर नुलकर हे सोलापूर येथील पत्रकार होते. (जन्म: १९२०)
शिक्षण
[संपादन]एम.ए. (पुणे विद्यापीठ)
जे.कृष्णमूर्ती यांच्या शिकवणुकीचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला होता.[१] तसेच श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या शिकवणुकीने ते विशेष प्रभावित झाले होते. ५० हून अधिक वर्षे ते श्रीअरविंद विचाराच्या संपर्कात होते.[१] १९६५ साली प्रगत पत्रकारितेसाठी शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथे गेले.[१]
कारकीर्द
[संपादन]- नुलकर यांनी १९५० मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली. ते मराठी हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत लेखन करत असत.
- प्रारंभीच्या काळात त्यांना (कै.) बाबूराव जक्कल, कमलाकर पिंपरकर, रंगाअण्णा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या सोलापूर समाचार या जिल्हा वृत्तपत्राला प्रादेशिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी राजकीय, सामाजिक टिप्पणीबरोबरच त्यांनी साहित्य, नाटक, चित्रपट समीक्षेतही रस घेतला.
- 'विश्व समाचार'चे कार्यकारी संपादकपद त्यांनी सांभाळले. ‘संचार’साठी ते अग्रलेख लिहित. ‘लोकमत’मध्येही त्यांनी स्तंभलेखन केले.
- मराठीबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.
- त्यांनी कपालीशास्त्रींचे चरित्र लिहिले.[२]
प्रकाशन व्यवसाय
[संपादन]कर्मयोगी प्रकाशन हे त्यांच्या प्रकाशन संस्थेचे नाव आहे.
योगी श्रीअरविंद व माताजी यांच्या जीवनावर त्यांनी सातत्याने लिखाण केले. १९९५ या एकाच वर्षात कर्मयोगी प्रकाशनातर्फे श्रीअरविंद सावित्री, अखेरचे पर्व आणि श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र) ही तीन पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
- श्रीअरविंद सावित्री - अनुवादक नृसिहाग्रज
- अखेरचे पर्व - अनुवादक सुनीती देशपांडे
- श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी - ले. प्रभाकर नुलकर
लेखन
[संपादन]- श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी
- माताजींचा हात सोडू नकोस - (Take Mother with you - या पुस्तकाचे मराठी भाषांतर)
पुरस्कार व सन्मान
[संपादन]त्यांना अंत्रोळीकर स्मृती संस्थेतर्फे ‘कर्मयोगी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. [२]
त्यांना थोमसन फौंडेशन शिष्यवृत्ती प्राप्त झालेली होती. [३]