श्रीमाताजींची उत्तरे (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमाताजींची उत्तरे - भाग पहिला या पुस्तकातील संवाद मुळात फ्रेंच भाषेतील आहेत.[१] त्याचा मराठी अनुवाद श्रीमती विमल भिडे यांनी केला आहे.

श्रीमाताजींची उत्तरे
लेखक श्रीमाताजी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Some Answers from the Mother
अनुवादक विमल भिडे
भाषा फ्रेंच - मराठी
देश भारत
साहित्य प्रकार पत्रलेखन
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती १९८४
मालिका श्रीमातृ-जन्म-शताब्दी ग्रंथमाला, पुष्प पाचवे
पृष्ठसंख्या ९९

पुस्तकाचा आशय[संपादन]

श्रीअरविंद आश्रमाची स्थापना झाल्यानंतर श्रीअरविंद यांनी साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी श्रीमाताजींवर सोपविली होती. त्यामुळे साधक व विद्यार्थी त्यांना वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारत असत. आणि त्याची श्रीमाताजी उत्तरे देत असत. अशा उत्तरांचे इंग्रजीमध्ये १७ खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यातील निवडक उत्तरांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

या पुस्तकात एकूण ०५ भाग आहेत.

०१) पहिल्या भागात एका साधकाशी झालेला पत्रव्यवहार आहे. १९६६ ते १९६९ या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे.

०२) दुसऱ्या भागात 'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने विचारलेले प्रश्न आहेत. १९६९ ते १९७० या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे.

०३) तिसऱ्या भागात 'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने विचारलेले प्रश्न आहेत. १९६९ ते १९७० या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे.

०४) चौथ्या भागात एका साधकाशी झालेला पत्रव्यवहार आहे. १९७१ ते १९७२ या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार आहे.

०५) एका साधकाने १९३२ साली श्रीअरविंद व श्रीमाताजींना पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हा तो १३ वर्षांचा होता. तो चित्रकला आणि संगीत शिकत असे. यामध्ये श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या दोघांनी दिलेल्या उत्तरांचा समावेश आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ The Mother (2004). Some Answers from the Mother. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 16 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.