Jump to content

मुक्तिगाथा महामानवाची (चरित्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुक्तिगाथा महामानवाची हे प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित योगी श्रीअरविंद यांचे चरित्र आहे.

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

याला चरित्र म्हणण्यापेक्षा चरित्रचिंतन म्हणणे उचित होईल असे लेखक म्हणतात. यामध्ये श्रीअरविंद यांच्या जीवनातील घटनांप्रमाणेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचाही विचार करण्यात आला आहे.

मुक्तिगाथा महामानवाची
लेखक डॉ.गजानन नारायण जोशी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्रचिंतन
प्रकाशन संस्था अक्षरब्रह्म प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९८, सातवी आवृत्ती २०१७
मुखपृष्ठकार दीपक पाटील
विषय योगी श्रीअरविंद यांचे चरित्र
पृष्ठसंख्या २१२

श्रीअरविंद यांच्या जन्मशाताब्दीनिमित्ताने (१९७२-७३) प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी जी व्याख्याने दिली होती त्याच्या आधारावर हे पुस्तक तयार करण्यात आले. विज्ञानयुगातील बुद्धिनिष्ठांना संभ्रमात टाकणाऱ्या पण प्रत्यक्षात घडलेल्या काही घटना या पुस्तकात ग्रथित केल्या आहेत, पण त्या करण्यापूर्वी आपण खात्री करून घेतली आहे असे लेखक नमूद करतात. []

या पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ती पुढीलप्रमाणे

  • ०१ बीज अंकुरले
  • ०२ प्राध्यापक, साधक व संपादक
  • ०३ राष्ट्रदेवो भाव
  • ०४ वेदपुरीची विचारगुंफा
  • ०५ तेथे आदिशक्ती विराजते
  • ०६ हे तो प्रचीतीचे बोलणे
  • ०७ प्रमेयांचे उद्यान
  • ०८ मी आहे जगज्वजीवनी निरंतर
  • ०९ ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
  • १० कालपटावरील पाऊलखुणा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ प्राचार्य शिवाजीराव भोसले (२०१७). मुक्तिगाथा महामानवाची (सातवी आवृत्ती ed.). पुणे: अक्षरब्रह्म प्रकाशन. ISBN 978-81-908743-7-3.