कैफी आझमी
Appearance
कैफी आझमी | |
---|---|
जन्म नाव | अख्तर हुसेन रिझवी |
टोपणनाव | कैफी |
जन्म |
१४ जानेवारी, इ.स. १९१९ मिझवां, उत्तर प्रदेश |
मृत्यू |
१० मे, इ.स. २००२ मुंबई |
धर्म | इस्लाम |
भाषा | उर्दू |
साहित्य प्रकार | कविता, गीते, शायरी |
संघटना | कम्युनिस्ट पार्टी |
पत्नी | शौकत कैफी |
अपत्ये | शबाना आझमी, बाबा आझमी |
पुरस्कार | पद्मश्री, साहित्य अकादमी, ज्ञानेश्वर पुरस्कार (१९९८) |
संकेतस्थळ | Kaifi Azmi |
अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी (जन्म : १४ जानेवारी १९१९; - १० मे २००२) हे एक भारतीय उर्दू-हिंदी कवी, पटकथालेखक, अभिनेते, शायर व गीतकार होते. कैफी आझमी यांचे जन्म नाव अख्तर हुसेन रिझवी होते. कैफी हे त्यांचे टोपणनाव होय.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]कैफी आझमी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मिझवां (आताच्या आझमगढ जिल्ह्यातील ) या खेड्यात झाला. कैफी यांचे कुटुंब कट्टर शियापंथी होते. त्यांचे वडील गावचे जमीनदार होते.[१]
कैफ़ी यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदरशामध्ये घातले होते. पण त्यांना ते न पटल्यामुळे त्यांनी तेथील शिक्षण सोडून दिले.
कैफ़ी आझ़मी यांची गीते असलेले हिंदी चित्रपट
[संपादन]- अनुपमा (१९६६)
- अर्थ (१९८२)
- ईद का चॉंद (१९५८)
- उसकी कहानी (१९६६)
- कागज़ के फूल (१९५९)
- कोहरा (१९६४)
- गरम हवा (१९७३)
- नसीम (अभिनय, १९९५)
- नौनिहाल (१९६७)
- परवाना (१९७१)
- परवीन (१९५७)
- पाकिझा (१९७२)
- बावर्ची (१९७२)
- बुझदिल (१९५१)
- मंथन (संवाद, १९७६)
- मिस पंजाब मेल (१९५८)
- यहूदी की बेटी (१९५६)
- रझिया सुलतान (१९८३)
- रामा (संवाद, १९७७)
- शोला और शबनम (१९७१)
- सात हिंदुस्तानी (१९६९)
- हक़ीक़त (१९६४)
- हंसते जख्म (१९७३)
- हीर रांझ़ा (१९७०)
कैफ़ी आझ़मी यांच्या गझ़लांची प्रकाशित पुस्तके
[संपादन]- आजके प्रसिद्ध शायर : कैफ़ी आझ़मी (आत्मचरित्र)
(अपूर्ण यादी)
कैफ़ी आझ़मी यांच्या जीवनावरील आणि शायरीवरील पुस्तके
[संपादन]- कैफ़ियत (ऑडियो बुक). यातील गझ़ला कैफ़ी आझ़मी यांनी गायल्या आहेत.
- कैफी आझमी - जीवन आणि शायरी (लक्ष्मीकांत देशमुख)
- कैफी आझमी २००२ मध्ये निवर्तल्यानंतर, २००४ सालात 'याद की रहगुजर' हे त्यांच्या सहप्रवाशांच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले.
- दीक्षा (माहितीपट, २०१५, दिग्दर्शक - रमणकुमार)
संदर्भ
[संपादन]- ^ पवार, जयंत. "कैफीयत: 'कैफी'यत - kaifi azmi an indian urdu poet". Maharashtra Times.