"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
* [[मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
* [[मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
||
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री '''शिवछत्रपती शिवाजीराजे''' माध्यमिक विद्यालयात ११-११-२०१७ रोजी बालकुमार साहित्य संमेलन झाले. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या. |
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री '''शिवछत्रपती शिवाजीराजे''' माध्यमिक विद्यालयात ११-११-२०१७ रोजी बालकुमार साहित्य संमेलन झाले. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या. |
||
* मुंबईतील चेंबूरमध्ये २९ नोव्हेंबर २०१७ रोजी एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक [[ल.म. कडू]] होते. |
|||
⚫ | |||
* पहिले सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन वडाळी येथे झाले. |
|||
* २रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे झाले. |
|||
* ३रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन तागडगाव येथे १७ ते १८-१-२०१७ या काळात झाले. |
|||
⚫ | |||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
११:३०, ३० जानेवारी २०१८ ची आवृत्ती
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन नावाची संस्था बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये स्थापन केली. पुढे २००० साली संस्थेच्या नावातील संमेलन हा शब्द काढून त्याजागी संस्था हा शब्द टाकण्याचाबदल संमत झाला. परंतु धर्मादाय आयुक्तांकडे पाठविलेल्या या बदलाची पूर्तता झाली आहे की नाही याची खातरजमा करून न घेतल्याने हा बदल केवळ कागदोपत्रीच राहिला, आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या अनधिकृत नावानेच संस्था काम करीत राहिली. २०१६ सालीया नावातील ’अखिल भारतीय’ हे शब्द काढून टाकण्याचेठरले आहे; संस्था त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करीत आहे.
साहित्य संमेलने
बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ असे आहे. हे संमेलन ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे. याव्यतिरिक्त ’बाल साहित्य संमेलन’ या नावाची बालकांचा सहभाग असलेली काही अन्य संमेलनेही आहेत.
२६वे मराठी बालकुमार साहित्य संंमेलन पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. कवयित्री डॉ. संगीता बर्वे अध्यक्षस्थानी होत्या.
पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
विदर्भ साहित्य संघाचे बालकुमार साहित्य संमेलन
विदर्भ साहित्य संघाने पाचवे बालकुमार साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्यनगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर २०१७ या दिवशी आयोजित केले आहे. विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा ही संमेलनाची निमंत्रक असून, प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक शंकर कर्हाडे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आजपर्यंतची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष
- भा.रा. भागवत, १९७५, पुणे
- सुमती पायगावकर, १९७७, सोलापूर
- मालती दांडेकर, १९७८, जळगाव
- अमरेंद्र गाडगीळ, १९८१, इचलकरंजी
- यदुनाथ थत्ते, १९८३, वेंगुर्ले
- राजा मंगळवेढेकर, १९८५, पुणे
- लीलावती भागवत, १९८७, कराड
- अनंत पै, १९८९ पुणे
- सुधाकर प्रभू, १९९०, कोल्हापूर
- महावीर जोंधळे, १९९२, सेलू
- दिनकर देशपांडे, १९९३, ठाणे
- शंकर सारडा, १९९४, सावंतवाडी
- प्रभाकर पुराणिक, १९९९, नागपूर
- दत्ता टोळ, २०००, अहमदनगर
- रत्नाकर मतकरी, २००१, पुणे
- पु.ग. वैद्य, २००२, सातारा
- डॉ. न.म. जोशी, २००३, निगडी, पुणे
- गिरिजा कीर, २००४, कऱ्हाड
- लीला दीक्षित, २००५, परभणी
- विजया जहागिरदार, २००६, सोलापूर
- डॉ. विजया वाड, २००७, सांगली
- मंगेश पाडगांवकर, २०१०, संगमनेर
- गोविंद गोडबोले, २०१२, आजरा
- मदन हजेरी, २०१२, ओणी (राजापूर)
- राजीव तांबे, २०१३, पुणे
- कवयित्री डॉ. संगीता बर्वे, १४-१५ फेब्रुवारी २०१५ (मारुंजी - मुळशी तालुका)
- चित्रकार ल.म. कडू, २०१८, (शेवगाव - अहमदनगर जिल्हा)
अन्य बालकुमार साहित्य संमेलने
- उचगाव येथील मळेकरणी सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन दि.१९-१२-२०१३ रोजी झाले. संमेलनापूर्वी मळेकरणी देवीची पूजा करून तिच्या आमराईत इंजिनियर आर. एम. चौगुले आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्ष मळेकरणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जवाहर देसाई होते.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने पिकुळे (ता. दोडामार्ग) येथे ७ जानेवारी २०१४ला एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. हे जिल्हास्तरीय संमेलन होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यकार सुभाष कवडे होते. एक हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, कोकणातील बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग होता. संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम झाले. हे संमेलन दर वर्षी होते.
- वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्थेच्या विद्यमाने शुक्रवार १४ डिसेंबर रोजी वनमाळी विद्यासंकुलातील जी.जे. वर्तक विद्यालय येथे 'पाचवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या मराठी साहित्य संमेलनास वसई - विरार शहर महापालिकेने ७५ हजार इतके अनुदान दिले होते.
- वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्था व वसई-विरार शहर पालिकेच्या वतीने सहावे एकदिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन २० डिसेंबर २०१३ रोजी वसई रोड (पश्चिम) येथील वर्तक विद्यालयात झाले. नगरपालिकेने या संमेलनास एक लाखाचे अनुदान दिले होते.
संमेलनात, तालुक्यातील मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
- लोणावळा गावात मनःशक्ती प्रयोग आणि मसाप यांच्यातर्फे २० सप्टेंबर २०१७ रोजी एक तथाकथित पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरले होते. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
- मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. मधुसूदन घाणेकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात ११-११-२०१७ रोजी बालकुमार साहित्य संमेलन झाले. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या.
- मुंबईतील चेंबूरमध्ये २९ नोव्हेंबर २०१७ रोजी एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक ल.म. कडू होते.
- पहिले सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन वडाळी येथे झाले.
- २रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे झाले.
- ३रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन तागडगाव येथे १७ ते १८-१-२०१७ या काळात झाले.
- ४थे : सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत १७ ते १८ जानेवारी २०१८ या काळात झाले. हे तेथे भरणारे चौथे संमेलन असून डॉ. सतीश साळुंके हे त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
बाह्य दुवे
पहा :
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |