लीला दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. लीला दीक्षित (४ फेब्रुवारी, १९३५:गुहागर, महाराष्ट्र - हयात) या एक बालसाहित्यकार आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केन्द्रस्थानी असतो.

वयाच्या १८ वर्षी लग्न होऊन त्यांनी पुण्यात येउन एम.ए., पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यांनी बालसाहित्याव्यतिरिक्त विविध विषयांवरही संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी दहा समाजसुधारकांची चरित्रे लिहिली असून‌, प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन या त्यांच्या पुस्तकाला राज्यसरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे.

पुस्तके[संपादन]

 • अंतरीचे धावे (आठवणी)
 • आजोबांचं घर (बालसाहित्य)
 • आनंदयोगिनी (नऊ स्त्री-संतांची चरित्रे)
 • कोकण - विविध दिशा आणि दर्शन (२४ तज्‍ज्ञांचे लेखन असलेला मासिकाच्या आकारातला पर्यटनविषयक संपादित ग्रंथ)
 • गंमत गाव (बालसाहित्य)
 • गाणारं झाड (बालकविता)
 • घर आमचं कोकणातलं (कोकणातील घरांचे प्रकार, तिथल्या चालीरीती, तिथले खाद्यपदार्थ, कोकणात पूर्वी वापरले जाणारे शब्द, वगैरेंचे वर्णन करणारे पुस्तक) (परचुरे प्रकाशन)
 • चंदनवेल (संत कान्होपात्राच्या जीवनावर आधारित कादंबरी)
 • नाच रे मोरया (बालसाहित्य)
 • पंख नवे (बालसाहित्य)
 • पोपटाचं झाड (बालसाहित्य)
 • प्रतिबंब (दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचा संग्रह (संपादिका लीला दीक्षित)
 • प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन (संशोधनपर ग्रंथ)
 • फुलांना मिळाले रंग (बालनाट्य)
 • बहाद्दर बल्लू (बालसाहित्य)
 • बालशिक्षण बालसाहित्य : विविध आयाम (ग.ह. पाटील जन्मशताब्दीनिमित्त बनलेला संपादित गौरवग्रंथ - सहसंपादिका डॉ.मंदा खांडके)
 • मुके कित्र (बालसाहित्य)
 • मैत्री मोलाची (बालसाहित्य)
 • लाखाचे बक्षीस (किशोर-कथा, १९९२)
 • शतकातील बालकविता (संपादित)
 • शुभं करोति (किशोर-कथा, १९९६)
 • सागरसूर (किशोर-कथा, १९९४)
 • स्वामी अपरान्ताचा (कादंबरी)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • बालसाहित्यातील त्यांचे कार्य लक्षात घेऊनच परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मानाने बहाल करण्यात आले होते.
 • महाराष्ट्र सरकारचा ग्रंथपुरस्कार