ल.म. कडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ल.म. कडू हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली. या प्रकाशन संस्थेने चाळीस वर्षांत दोनशे पुस्तके प्रकाशित केली.

ल.म. कडू यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • A Tree झाड (लहान मुलांसाठीचे द्विभाषिक पुस्तक)
  • खारीच्या वाटा (कथासंग्रह)
  • गलोलची करामत
  • चार्ली चॅप्लिन
  • छोटे दोस्त
  • जॉर्ज कार्व्हर (चरित्र)....(विशेष - वीणा गव्हाणकर यांनीही याच विषयावर 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक लिहिले आहे.)
  • पवित्र सेवा रेड क्राॅस
  • पिंटू आणि बेडूक आजोबा
  • मनीचे डोळे
  • मारिया माँटेसरी
  • मुलांचे बापू
  • राधाची स्ट्राॅबेरी
  • रावीचा मोर (बालसाहित्य)
  • शालेय स्फूर्तिगीते
  • सईची चांगली सवय
  • हवं तर रंगवा

पुरस्कार, सत्कार आणि सन्मान[संपादन]

  • साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार (२०१७) - खारीच्या वाटा या पुस्तकासाठी.[१]
  • महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार (२०१४) - खारीच्या वाटासाठी
  • मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित केलेल्या‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उदघाटनाचे कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ल.म. कडू यांचा मसापतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. (२८-६-२०१७)[२]
  • शेवगांव(अहमदनगर जिल्हा) येथे २७ ते २९ जानेवारी २०१८ या काळात होणाऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • "ल. म. कडू -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2017-06-24. 2018-08-02 रोजी पाहिले. 
  • "साधनांशिवाय साधना करायला शिका : ल. म. कडू". www.bytesofindia.com. 2018-08-02 रोजी पाहिले.