Jump to content

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/वर्गिकरण

लघुपथ: विपी:छाया, विपी:चित्र, विपी:संचिका
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा [ चित्र हवे ] प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







चित्रसंचिका वर्गीकरण

[संपादन]

नमस्कार,

माहीतगार, नरसीकर (भटक्या?) व माझ्यात याविषयी झालेला संवाद. आपले मत येथे कळवावे.

अभय नातू १९:१३, २ सप्टेंबर २००९ (UTC)

माहीतगार

[संपादन]

नमस्कार,

इतर आवश्यक वाटलेली सहाय्य पाने बनवण्यात व्यस्त होतो त्यामुळे तुमच्या शंकेचे तत्काळ उत्तर देऊ शकलो नाही, क्षमस्व.

मराठी विकिपीडियात पुरेशा संपादनबळा अभावी चित्र संचिकांची बोटांवर मोजण्या पलिकडे वर्गीकरणे झालेली नाहीत. जी काही (बोटावर मोजण्या एवढी) झाली आहेत ती वर्ग:संचिका येथे आढळतात.हि वर्गीकरणे कशी करावीत या बद्दल सदस्य:अभय नातू यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळू शकल्यास पहावे.

तुमच्या प्रमाणेच हे काम बाकी असल्याची जाणीव सध्या विकि रजेवर असलेले सदस्य:Sankalpdravid यांना झाली होती असे दिसते. त्या मुळे वर्ग:संचिका येथे संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस स्पष्ट होतो. त्यामुळे किमान आज मी या बद्दल एक प्रकल्प पान सुरू केले.

या बद्दल आपण नव्याने वर्गिकरण निती सुचवू शकता किंवा इंग्रजी विकिपीडिया आणि कॉमन्सवर सध्या वर्गिकरणे चित्र वर्गीकरणे कशी पार पाडली जातात तेसुद्धा अभ्यासू शकतात.

माहीतगार ०७:३९, २ सप्टेंबर २००९ (UTC)

नरसीकरांनी मागितलेली मदत

[संपादन]

माहीतगार यांचेशी झालेली चर्चा वर दिली आहे. या प्रकरणी त्यांनी 'आपलेकडुन मार्गदर्शन घ्यावे' असे सुचविले आहे.मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहो.

माझे उत्तर

[संपादन]
नमस्कार,
विकिपीडियावर संचिका व चित्रांचे वर्गीकरण करताना खालील नियम पाळावे.
०. फक्त मराठी विकिपीडियावर चढवलेल्या चित्रांचेच वर्गीकरण करावे. कॉमन्सवरील चित्रांचे वर्गीकरण करू नये.
१. शक्यतो सगळ्या संचिका व चित्रांचे वर्गीकरण करावे. एक चित्र अनेक वर्गांत बसत असेल तर सगळ्या वर्गांत त्याचे वर्गीकरण करावे.
२. चित्रांसाठी वर्ग तयार करताना वर्गनावास चित्रे हा प्रत्यय लावावा, उदा. पोस्टर चित्रे, क्रिकेट चित्रे, इ.
३. चित्रांना विषयानुरुप वर्गांत घालावे. उदा. भारतीय रेल्वे चित्रे. असे वर्ग नसतील तर तयार करावे. अनेक चित्रे असतील किंवा असू शकतील असेच वर्ग तयार करावे. दोन-चार चित्रे असतील असे वर्ग तयार करू नयेत. - भारतीय रेल्वे चित्रे ठीक, पण भारतीय रेल्वेची पिंपरीजवळील चित्रे उचित नाही. अर्थात, पिंपरीजवळील रेल्वेची अनेक चित्रे चढवल्यास हा ही वर्ग तयार करावा. या नियमामागे वर्गसंख्या कमी करण्याचा हेतू नसून वर्गवृक्ष सुटसुटीत ठेवणे हाच आहे.
४. प्रत्येक नवीन वर्गाला अंततः विकिपीडिया चित्रे हा मूळ वर्ग असावा - उदा. भारतीय रेल्वे चित्रे > भारत चित्रे > विकिपीडिया चित्रे. किंवा भारतीय रेल्वे चित्रे > रेल्वे चित्रे > विकिपीडिया चित्रे. एखाद्या चित्रवर्गापासून विकिपीडिया चित्रे वर्गापर्यंत अनेक मार्ग असू शकतात.
५. चित्र नसलेल्या संचिकांचे (.wmv, .ogg, .mp3) विकिपीडिया चित्रे च्या वर्गवृक्षात वर्गीकरण करू नये. अशा संचिकांना वरीलप्रमाणेच नियम लागू होतात पण त्यांचे मूळवर्ग विकिपीडिया ध्वनिसंचिका, विकिपीडिया चलचित्रसंचिका, इ. असतील.
वरील नियम सदस्यांच्या सूचनांनुसार बदलतील. बदलल्यास चावडीवर सूचना देण्यात यावी.
अधिक माहिती हवी असल्यास किंवा वरीलपैखी एखादा नियम स्पष्ट नसल्यास माझ्या चर्चापानावर संदेश ठेवालच.
अभय नातू १९:१३, २ सप्टेंबर २००९ (UTC)
Thanks Abhay for your valuable support.माहीतगार ०४:३४, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
वरील चर्चा आणि सदस्य:V.narsikar यांचे संबधीत योगदान या वरून खालील दुरूस्त्या सुचवत आहे
१. शक्यतो सगळ्या संचिका व चित्रांचे वर्गीकरण करावे. एक चित्र अनेक वर्गांत बसत असेल तर सगळ्या वर्गांत त्याचे वर्गीकरण करावे.
हे मान्य पण अधिक सोदाहरण स्पष्ट व्हावयास हवे. वीड्याचे पान चित्रास वर्ग:औषधी वनस्पती पानांची चित्रे ,वर्ग: वनस्पतींची मानवी खाद्य पानांची चित्रे असे दोन्हीही वर्ग लावावेत पण वर्ग:वनस्पती पानांची चित्रे हा वर्ग:औषधी वनस्पती पानांची चित्रे, वर्ग: वनस्पतींची मानवी खाद्य पानांची चित्रे या उप वर्गांचा वर्ग असावा वीड्याचे पान चित्रास वर्ग:वनस्पतींची पाने वर्ग वेगळा लावण्याची आवश्यकता रहाणार नाही. त्या प्रमाणेच वर्ग:वनस्पती पानांची चित्रे, वर्ग:वनस्पती फुलांची चित्रे इत्यादी मुख्य वर्ग:वनस्पती चित्रे वर्गात घ्यावे तसेच वर्ग:वनस्पती चित्रे चा मुख्य वर्ग वर्ग:विकिपीडिया चित्रे असावा. मला वाटते. याचा वर्गवृक्ष साचा कुणी बनवून दाखवल्यास समजणे सोपे जाईल.
अर्थात मी या चर्चेत पूरेसे कॉन्संट्रेट करू शकत नाही आहे(माझे लक्ष इतर कुठे लागले आहे, क्षमस्व) . त्यामुळे आपण सर्वांनी आपापसतील चर्चेने सुयोग्य निर्णय घ्यावेत.आत्ता एवढेच पुन्हा संध्याकाळी बघेन धन्यवाद माहीतगार ०८:००, ३ सप्टेंबर २००९ (UTC)