लघुपथ: विपी:छाया, विपी:चित्र, विपी:संचिका

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चलचित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुयोग्य चित्र वापरा [ चित्र हवे ] प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)चित्रे व चलचित्र फीत[संपादन]

नमस्कार, मी बरीच चित्र संचिका चढवल्या आहेत. त्या योग्य-अयोग्य आहेत/नाहीत हे नक्की कळवा. लेखात वगैरे वापरू शकलात तर फारच उत्तम. शिवाय चलचित्र कसे चढवायचे याचे काही मार्गदर्शन मिळेल का? आपला निनाद निनाद ११:५६, २ जानेवारी २००९ (UTC)

तुम्ही चढवलेली छायाचित्रे तुम्हीच काढली आहेत का? नसली तर ती प्रताधिकारमुक्त आहेत का?
अभय नातू १६:४८, २ जानेवारी २००९ (UTC)
हो सर्व प्रकाशचित्रे मीच काढलेली आहेत, आणि मी इथे असे घोषित करतो की ती प्रताधिकार मुक्त आहेत. आणि मह्नूनच मी ती येथे चढवीत आहे.
निनाद ०५:५८, ३ जानेवारी २००९ (UTC)
चलचित्र कसे चढवायचे याचे काही मार्गदर्शन...?
निनाद ०५:५९, ३ जानेवारी २००९ (UTC)
निनाद, चलचित्र चढविण्यासाठी माहिती इथे दिली आहे.
तसेच चित्र:जुने टेलिफोन एक्स्चेंज.JPG हे चित्र फिरवून (rotate) परत टाकावे.
आणि आपण छायाचित्रे स्वतः कॅमेर्‍याने काढली आहेत का? जवळपास सर्व छायाचित्रांमध्ये उजव्या कोपर्‍यात छायाचित्र काढल्याचा दिनांक आहे. तो चित्राचा दर्जा (quality) थोडी कमी करतो (असे मला वाटते.) आपली परवानगी असल्यास मी ते काढण्याचा प्रयत्न करू शकतो.
क्षितिज पाडळकर ०१:११, ४ जानेवारी २००९ (UTC)

चित्रात बदल[संपादन]

प्रतिसाद -जुने टेलिफोन एक्स्चेंजचे चित्र फिरवून (rotate) परत टाकतो. हे एक्स्चेंज मेलबर्न जवळच्या एका संरक्षित बेटावर (फ्रेंच आयलंड येथे) 'डिस्प्ले' म्हणून शोभा वाढवायला लावलेले सापडले. मग मोह आवरलाच नाही आणि चित्रे काढली - (पण आता रिनोव्हेशन साठी हे एक्स्चेंज भंगार मध्ये टाकणार आहेत.) खरे तर मी त्याचे इतरही चित्रण केले आहे. म्हणजे लेख लिहिणे सोपे व्हावे असे. पण लिहायला वेळच मिळाला नाहीये. विकि डोक्यात आल्यावर इतर होडी वगैरे चित्रे पण अशीच काढत सुटलो. पण विकिवर चढवायला फार वेळ लागतो हो चित्र!

चित्रातला दिनांक[संपादन]

मला वाटते की छायाचित्रात दिनांक असणे चांगले आहे. उदा. मी नाशिकच्या महात्मा गांधी रस्त्याचे काढलेले चित्र हे २००४ चे आहे हे स्पष्ट होते. व आता कदाचित हा परिसर बदलला असेल याची जाणीव राहते. म्हणून काहीवेळा दिनांक महत्त्वाचा ठरतो असे वाटते. दिनांक दिसण्याने दर्जा कमी जास्त होतो का याविषयी मी विचार केला नाहीये. सर्वानुमते मला सांगा, मग मी पुढची चित्रे दिनांक विरहीत काढीन. क्षितिजला दिनांक काढायचा असल्यास माझी ना नाही - बिंधास्तपणे सुयोग्य असलेले हवे ते बदल कर! मी माझा अधिकार सोडलाच आहे. (सोडायचाही प्रश्न नाही, कारण मी ही चित्रे विकिसाठीच काढली आहेत.) चलचित्राच्या दुव्या बाबत धन्यवाद!

प्रकाश चित्रण प्रताधिकारमुक्तीची पुनःघोषणा[संपादन]

मराठी विकिवर चढवलेली सर्व चित्रे, मी, निनाद ने, स्वखर्चाने विकत घेतलेल्या कॅनन ९७० आय. एस. या कॅमेर्‍याने (त्याची पावती आहे आणि कॅननकडे हा कॅमेरा नोंदणीकृत आहे!) माझा स्वतःचा प्रवास तसेच वेळ खर्च करून माझ्या हाताने माझ्या मालकीच्या कॅमेर्‍याचा स्वीच मी स्वतःच माझ्या बोटाने दाबून काढली आहेत. या सर्व चित्रांची मुळ प्रत माझ्या कडे सुरक्षित आहे. हवी असल्यास माझी ती प्रिंट करून पाठवण्याची तयारीही आहे. (आशा आहे ही पुनःघोषणा हलके घ्याल! ;)) )

आपला - प्रताधिकाराची पुर्ण जाणीव असलेला

निनाद २३:३९, ४ जानेवारी २००९ (UTC)

हे प्रत्येक चित्रावर लिहायला हवे आणि तेथे क्रियेटीव्ह कॉमन्स किंवा जीपीएल परवान्याखाली टाकल्यास सर्वोत्तम. - 122.172.48.34 १४:१२, ६ जानेवारी २००९ (UTC)
क्रियेटीव्ह कॉमन्स किंवा जीपीएल परवान्याखाली चित्र कसे टाकायचे? टप्पेदार मार्गदर्शन मिळेल काय? निनाद २३:३०, ६ जानेवारी २००९ (UTC)

कॉमन्सवर चित्रे[संपादन]

कृपया कॉमन्सवर चित्रे चढवा, तेथील चित्रे कुठलाही विकिप्रकल्प (मराठी, इंग्लिश, नेपाळी, विकीबुक्स, विकिस्रोत वगैरे) थेट वापरू शकतो. तेथे या परवान्यांची माहितीही आहे. --- कोल्हापुरी ०४:३९, ७ जानेवारी २००९ (UTC)

कॉमन्सवर चित्रे चढवायला गेलो पण तेथे मराठी मध्ये शोध आणि कळफलक नाहीये :( शिवाय मला चित्राचे नाव देवनागरी/मराठी भाषेत द्यायचे आहे. त्यामुळे तेथे चित्र चढवायला आवडले असते तरी, मला इकडे तिकडे टंक करून चिकटवण्याचा सोस करायचा नसल्याने, मी ही चित्रे 'मराठी विकिलाच' द्यायचे ठरवले आहे.

यावर काही मत/पर्याय असल्यास कळवा, मी विचार करेन. निनाद ००:५०, १० जानेवारी २००९ (UTC)