रेखांश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पृथ्वीचा नकाशा
रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.

पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश या प्रमाणाने मोजले जाते. छायाचित्र घेतांना जिओटॅगिंग (अक्षांश - रेखांश) घेणे बंधनकारक आहे रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तरदक्षिण धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय.

अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला मुख्य रेखावृत्त म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०) आहे. रेखांशाचे मुल्य ० ते +१८० पुर्व व ० ते -१८०पश्चिम असू शकते.

भौगोलिकदृष्ट्या +१८० पूर्व व -१८०पश्चिम रेखांश हे एकच रेखावृत्त आहे ज्यास 'आंतरराष्ट्रीय वार रेषा' म्हटले जाते.

रेखांश lambda, λ या ग्रीक अक्षराने दर्शवले जातात.

एखाद्या ठिकाणचे गुणक (अक्षांश, रेखांश) माहीत असल्यास त्या ठिकाणाचे पृथ्वीच्या गोलावरचे स्थान पुर्णपणे निश्चित करता येते. उ.दा. पुणे शहराचे गुणक (१८° ३१' २२.४५" उत्तर, ७३° ५२' ३२.६९" पुर्व) आहेत .

रेखांश आणि वेळ[संपादन]