Jump to content

मंगळयान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगलयान या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Mars Orbiter Mission 3 - India - ArtistsConcept.jpg
मंगळयान

मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.[][][] यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. []

मंगळाभोवती कक्षा

[संपादन]

मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.[ संदर्भ हवा ]

माहिती देवाण-घेवाण

[संपादन]

या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क व संपदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.

उपकरणे

[संपादन]

या अभियानात १५ किलोचे पाच प्रयोगात्मक पेलोडस् पाठवण्यात आली. []

  • मिथेन सेन्सर - मंगळयानासाठी जो मिथेन सेन्सॉर पाठवण्यात येईल त्याचे वजन ३.५९ किलो असेल. हे सेंसर पूर्ण मंगळाला सहा मिनिटांच्या आत स्कॅन करण्यात सक्षम आहे.
  • थर्मल इंफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर हे दुसरे उपकरण आहे. त्याचे वजन चार किलो आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्याचे काम ते करेल.
  • मार्स कलर कॅमेरा हे आणखी एक उपकरण असून त्याचे वजन १.४ किलो आहे.
  • लॅमेन अल्फा फोटोमीटरचे वजन १.५ किलो आहे. मंगळाच्या वातावरणातील आण्विक हायड्रोजनचा शोध घेण्याचे काम हे उपकरण करेल.

प्रक्षेपण

[संपादन]

मंगळयान पीएसएलव्ही सी-२५ हे लॉंचिंग व्हेईकलच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपीत केले गेले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ वॉल्टन, झॅक. "India Announces Mars Mission One Week After Landing". Web Pro News (इंग्लिश भाषेत). 2017-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०९-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Staff. "Manmohan Singh formally announces India's Mars mission" (इंग्लिश भाषेत). २०१२-०८-३१31 August 2012 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ बल, हरतोष सिंग. "BRICS in Space" (इंग्लिश भाषेत). २०१२-०८-३१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "भारताने इतिहास रचला". २०१४-०९-२४ रोजी पाहिले.
  5. ^ "इसरो संकेतस्थळावरील माहिती" (PDF). 2013-10-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.