पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[२][३]

इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [४] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[५]

कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[६] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली.

इंग्लंड[संपादन]

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१६
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख ३ जुलै – ७ सप्टेंबर २०१६
संघनायक अलास्टेर कुक (कसोटी) मिसबाह-उल-हक (कसोटी)
अझहर अली (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा ज्यो रूट (५१२) युनिस खान (१९)
सर्वाधिक बळी ख्रिस वोक्स (२६) यासिर शाह (१९)
मालिकावीर ख्रिस वोक्स (इं) आणि मिसबाह-उल-हक (पा)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (२७४) सरफराज अहमद (३००)
सर्वाधिक बळी ख्रिस वोक्स (९) हसन अली (८)
मालिकावीर ज्यो रूट (इं)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलेक्स हेल्स (३७) खालिद लतीफ (५९)
सर्वाधिक बळी आदिल रशीद (१) वहाब रियाझ (३)
सुपर सिरीज गुण
इंग्लंड १६, पाकिस्तान १२

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[७] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[८] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[९] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१०] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[११] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१२]

दौरा सामने[संपादन]

प्रथम श्रेणी: सॉमरसेट वि पाकिस्तानी[संपादन]

३-५ जुलै
धावफलक
वि
३५९/८घो (१०० षटके)
यूनिस खान १०४ (१७७)
पॉल वान मीकेरेन ३/७८ (२६ षटके)
१२८ (३४.१ षटके)
जेम्स हिल्ड्रेथ ४७*(६८)
सोहेल खान ३/२६ (१० षटके)
२३६/४ (५९.४ षटके)
अझर अली १०१*(१६८)
जॅक लिच २/६१ (१८ षटके)
२५८/८घो (७३ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १०६ (१११)
यासिर शाह ४/१०७ (३२ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: टॉम लंगले (इं) आणि बिली टेलर (इं)


प्रथम श्रेणी: ससेक्स वि पाकिस्तानी[संपादन]

८-१० जुलै
धावफलक
वि
३६३/५घो (९९ षटके)
अझहर अली १४५ (२६६)
जोफ्रा आर्चर ४/४९ (२२ षटके)
२९१/५घो (६३.५ षटके)
हॅरी फिंच १०३ (१४०)
इम्रान खान २/६० (१३ षटके)
७१/१ (२४ षटके)
शान मसुद ३८* (४२)
जोफ्रा आर्चर १/२४ (९ षटके)
  • नाणेफेक: ससेक्स, गोलंदाजी
  • पावसामुळे ३ऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • प्रथम श्रेणी पदार्पण: जोफ्रा आर्चर आणि फिलीप सॉल्ट (ससेक्स)


२-दिवसीयः वूस्टरशायर वि पाकिस्तानी[संपादन]

२९-३० जूलै
धावफलक
वि
२६१/३घो (८० षटके)
अझहर अली ८१ (१४०)
एड बर्नार्ड १/३० (१५ षटके)
२६०/६ (७६ षटके)
टॉम कोहलर - कॅडमोर ७३ (११३)
राहत अली २/२९ (११ षटके)
  • नाणेफेक: वूस्टरशायर, गोलंदाजी


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१४-१८ जूलै
११:००
धावफलक
वि
३३९ (९९.१ षटके)
मिसबाह-उल-हक ११४ (१९९)
क्रिस वोक्स ६/७० (२४ षटके)
२७२ (७९.१ षटके)
अलास्टेर कुक ८१ (१२४)
यासिर शाह ६/७२ (२९ षटके)
२१५ (७९.१ षटके)
असद शफिक ४९ (९६)
क्रिस वोक्स ५/३२ (१८ षटके)
२०७ (७५.५ षटके)
जॉनी बेरस्टो ४८ (१४७)
यासिर शाह ४/६९ (३१ षटके)
पाकिस्तान ७५ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: यासिर शाह (पा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: जेक बॉल (इं)
  • कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा मिसबाह-उल-हक (पा) हा वयाने सर्वात मोठा कर्णधार.[१३]
  • लॉर्डस् वरील कसोटी सामन्यात १० बळी घेणारा यासिर शाह हा पहिलाच आशियाई क्रिकेट खेळाडू.[१४]
  • स्टुअर्ट ब्रॉडचे (इं) ३५० कसोटी बळी पूर्ण.[१५]
  • इंग्लंडविरूद्ध लॉर्डसवर पाकिस्तानचा हा २० वर्षांत पहिलाच विजय, तसेच त्यांचा एकूण चौथा विजय आणि कोणत्याही आशियाई संघातर्फे एक विक्रम.[१६][१७]
  • आयसीसी गोलंदाजी कसोटी क्रमवारीत यासिर शाह पहिल्या स्थानावर पोहोचला.[१८]
  • गुण: पाकिस्तान - ४, इंग्लंड - ०


२री कसोटी[संपादन]

२२-२६ जुलै
११:००
धावफलक
वि
५८९/८घो (१५२.२ षटके)
ज्यो रूट २५४ (४०६)
वहाब रियाझ ३/१०६ (२६.२ षटके)
१९८ (६३.४ षटके)
मिसबाह-उल-हक ५२ (११४)
ख्रिस वोक्स ४/६७ (१६ षटके)
१७३/१घो (३० षटके)
अलास्टेर कुक ७६* (७८)
मोहम्मद आमीर १/४३ (११ षटके)
२३४ (७०.३ षटके)
मोहम्मद हफीझ ४२ (७२)
ख्रिस वोक्स ३/४१ (१५.३ षटके)
इंग्लंड ३३० धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • अलास्टेर कुकची (इं) कर्णधार म्हणून ५० वी कसोटी.
  • गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०


३री कसोटी[संपादन]

३-७ ऑगस्ट २०१६
११:००
धावफलक
वि
२९७ (८६ षटके)
गॅरी बॉलन्स ७० (१५०)
सोहेल खान ५/९६ (२३ षटके)
४०० (१३६ षटके)
अझर अली १३९ (२९३)
ख्रिस वोग्स ३/७९ (३० षटके)
४४५/६घो (१२९ षटके)
मोईन अली ८६* (९६)
मोहम्मद आमीर २/७५ (३१ षटके)
२०१ (७०.५ षटके)
सामी अस्लम ७० (१६७)
स्टूअर्ट ब्रॉड २/२४ (१५ षटके)
इंग्लंड १४१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • इंग्लंडची मायदेशातील ५००वी कसोटी.
  • गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०.


४थी कसोटी[संपादन]

११-१५ ऑगस्ट २०१६
११:००
धावफलक
वि
३२८ (७६.४ षटके)
मोईन अली १०८ (१५२)
सोहेल खान ५/६८ (२०.४ षटके)
५४२ (१४६ षटके)
युनिस खान २१८ (३०८)
ख्रिस वोक्स ३/८२ (३० षटके)
२५३ (७९.२ षटके)
जॉनी बेरस्टो ८१ (१२७)
यासिर शाह ५/७१ (२९)
४२/० (१३.१ षटके)
अझहर अली ३०* (२८)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: युनिस खान (पा)


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२४ ऑगस्ट
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६०/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४/३ (३४.३ षटके)
अझर अली ८२ (११०)
ज्यो रूट १/२६ (४ षटके)
जासन रॉय ६५ (५६)
मोहम्मद नवाझ १/३१ (६.३ षटके)
इंग्लंड ४४ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
रोज बाऊल, साऊथहॅंप्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: जासन रॉय (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • इंग्लंडच्या डावा दरम्यान ३४ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंड समोर विजयासाठी ४८ षटकांमध्ये २५२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • त्यानंतर ३४.३ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी इंग्लंडने १५० धावा करणे गरजेचे होते.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


२रा सामना[संपादन]

२७ ऑगस्ट
१०:४५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५१ (४९.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५५/६ (४७.३ षटके)
सरफराज अहमद १०५ (१३०)
ख्रिस वोक्स ३/४२ (९.५ षटके)
ज्यो रूट ८९ (१०८)
इमाद वसिम २/३८ (७ षटके)
इंग्लंप ४ गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • पाकिस्तानतर्फे लॉर्डस् वर एकदिवसीय सामन्यात शतक करणारा सरफराज अहमद हा पहिलाच फंलदाज.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


३रा सामना[संपादन]

३० ऑगस्ट
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
४४४/३ (५० षटके)
वि
ॲलेक्स हेल्स १७१ (१२२)
हसन अली २/७४ (१० षटके)
मोहम्मद अली ५८ (२८)
ख्रिस वोक्स ४/४१ (५.४ षटके)
इंग्लंड १६९ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • इंग्लंडचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम.
  • ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडतर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विक्रम.
  • जोस बटलरचा इंग्लंडतर्फे सर्वात जलद ५० धावांचा विक्रम.
  • वहाब रियाजचे गोलंदाजी पृथ्थकरण ०/११० हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात खराब प्रदर्शन.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


४था सामना[संपादन]

१ सप्टेंबर
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४७/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५२/६ (४८ षटके)
अझर अली ८० (१०४)
आदिल रशीद ३/४७ (१० षटके)
बेन स्टोक्स ६९ (७०)
मोहम्मद इरफान २/२६ (५ षटके)
इंग्लंड ४ गडी व १२ चेंडू राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि टिम रॉबीन्सन (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)


५वा सामना[संपादन]

४ सप्टेंबर
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३०२/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०४/६ (४८.२ षटके)
जासन रॉय ८७ (८९)
हसन अली ४/६० (१० षटके)
सरफराज अहमद ९० (७३)
मार्क वूड २/५६ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: रॉब बेली (इं) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: सरफराज अहमद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: लियाम डॉसन (इं)
  • गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०


टी२० मालिका[संपादन]

एकमेव टी२०[संपादन]

७ सप्टेंबर
१८:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१३५/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३९/१ (१४.५ षटके)
ॲलेक्स हेल्स ३७ (२६)
वहाब रियाझ ३/१८ (४ षटके)
खालिद लतीफ ५९* (४२)
आदिल रशीद १/२९ (४ षटके)
पाकिस्तान ९ गडी व ३१ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: वहाब रियाझ (पा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बाबर आझम आणि हसन अली (पा).
  • सरफराज अहमदचा पाकिस्तानचा कर्णधार म्हणून पहिलाच टी२० सामना.
  • गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०.


आयर्लंड[संपादन]

पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६
आयर्लंड
पाकिस्तान
तारीख १८ – २० ऑगस्ट २०१६
संघनायक विल्यम पोर्टरफिल्ड अझर अली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा गॅरी विल्सन (२१) शर्जील खान (१५२)
सर्वाधिक बळी बॅरी मॅककॅर्थी (४) इमाद वसिम (५)
मालिकावीर शर्जील खान (पा)

संघ[संपादन]

एकदिवसीय
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१८ ऑगस्ट
१०:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
३३७/६ (४७ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८२ (२३.४ षटके)
शर्जील खान १५२ (८६)
बॅरी मॅककॅर्थी ४/६२ (१० षटके)
गॅरी विल्सन २१ (३३)
इमाद वसिम ५/१४ (५.४ षटके)
पाकिस्तान २५५ धावांनी विजयी
मालाहाइड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि मार्क हॉथॉर्न (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
  • ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: हसन अली आणि मोहम्मद नवाझ (पा).
  • शर्जील खानचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
  • पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा धावांचा विजय.
  • आयर्लंडची मायदेशामधील सर्वात निचांकी आणि एकदिवसीय क्रिकेट मधील दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या .


२रा सामना[संपादन]

२० ऑगस्ट
१०:४५
धावफलक
वि
एकही चेंडू न खेळवता सामना रद्द
मालाहाइड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि मार्क हॉथॉर्न (आ)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ७ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "इसीबीतर्फे २०१६ आंतरराष्ट्रीय उन्हाळी मोसमाच्या तारखा जाहीर". इसीबी.सीओ.युके (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "पाकिस्तान वि. इंग्लंड वेळापत्रक २०१६" (इंग्रजी भाषेत). ८ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड-पाकिस्तानच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पुढच्या पावलाचा नो-बॉल टीव्ही पंच ठरवणार" (इंग्रजी भाषेत). २० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "ट्रेंट ब्रिज येथे एकदिवसीय विक्रमी धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लंड वि श्रीलंका: 'सुपर सिरीज' मध्ये विविध प्रकारच्या क्रिकेटसाठी गुण दिले जाणार" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "बॉलन्स, रोलंड-जोन्सचा इंग्लंडच्या संघात समावेश" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "इंग्लंड दौर्‍यासाठी मोहम्मद आमिरची निवड" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ "इंग्लंडच्या एकदिवसीय संघात वूड आणि स्टोक्स" (इंग्रजी भाषेत). १६ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "पाकिस्तान एकदिसीय चमूमध्ये उमर गुलचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "संपूर्ण ताकदीच्या टी२० संघात स्टोक्सची निवडम, डॉसन मालिकेला मुकणार" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "अमाद बटने पाकिस्तान टी२० संघात स्थान मिळवले" (इंग्रजी भाषेत). १ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ सीर्वी, भरत. "कसोटी शतक करणारा सर्वात मोठा कर्णधार " (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ जयरामन, शिवा. "कुकने गावस्करला मागे टाकले" (इंग्रजी भाषेत). १६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ गार्डनर, ॲलन. "राहतच्या तीन बळीमुंळे इंग्लंडची वाताहत" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "लॉर्डसवर २० वर्षांनंतर पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "पाकिस्तानची लॉर्डस् वरील दीर्घ प्रतिक्षा संपलीः त्यांचे याआधीचे तीन विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "यासिर शाह गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर" (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]