Jump to content

मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मालाहाइड क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
द व्हिलेज
मैदान माहिती
स्थान मालाहाईड, डब्लिन
स्थापना १९६६
आसनक्षमता ११,५००
मालक मालाहाईड नगर परिषद
प्रचालक क्रिकेट आयर्लंड
यजमान आयर्लंड क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. ३ सप्टेंबर २०१३:
आयर्लंड वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. १८ जून २०१६:
आयर्लंड वि. श्रीलंका
प्रथम २०-२० १७ जुलै २०१५:
नेपाळ वि. पापुआ न्यू गिनी
अंतिम २०-२० २६ जुलै २०१५:
नेदरलँड्स वि. स्कॉटलंड
शेवटचा बदल २५ जुलै २०१६
स्रोत: ईएस्‌‍पीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

द व्हिलेज किंवा मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान हे मालाहाईड, आयर्लंड येथील एक क्रिकेट मैदान आहे. सदर मैदान हे मालाहाईड क्रिकेट क्लबच्या मालकीचे आहे.

सप्टेंबर २०१३ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सदर मैदानास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी मान्यता दिली. ह्या मैदानावर यजमान आयर्लंड विरुद्ध इंग्लंड असा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला गेला, ज्यामध्ये आयॉन मॉर्गनच्या १२४ धावांच्या जोरावर इंग्लंडने १२४ धावांनी विजय मिळवला.

११,५०० प्रेक्षकक्षमतेसहित सदर मैदान हे सध्या आयर्लंडमधील सर्वात मोठे मैदान आहे.

डब्लिन मधील कॅसल अव्हेन्यू आणि स्टॉरमॉंट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानानंतर हे मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीचे आयर्लंडचे तिसरे मैदान आहे.

२०१५, आयसीसी ट्वेन्टी-२० पात्रता स्पर्धेत सदर मैदानावर काही सामने खेळवले गेले होते.