गोविंद सखाराम सरदेसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोविंद सखाराम सरदेसाई
G.S.Sardesai.jpg
जन्म नाव गोविंद सखाराम सरदेसाई
जन्म १७ मे, इ.स. १८६५
गोविल, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २९ नोव्हेंबर, इ.स. १९५९
कामशेत, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, साहित्य
भाषा मराठी
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती मराठी रियासत (८ खंड)
मुसलमानी रियासत (२ खंड)
ब्रिटिश रियासत (२ खंड)
वडील सखाराम
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारविजेते

रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई (जन्म : गोविल, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, १७ मे १८६५; - कामशेत,(खडकाळे), ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे मराठी इतिहासकार व लेखक होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.