नारायण दामोदर सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नारायण दामोदर सावरकर (२५ मे, इ.स. १८८८ भगूर जि. नाशिक - १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९ मुंबई) हे चरित्रलेखक व कादंबरीकार होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते बंधू होते.[१] स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ इंग्रजी भाषेतील हिंदुत्वहिंदुपदपादशाही या ग्रंथांचे मराठी भाषांतर त्यांनी केले. कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी मुंबईत दंतवैद्याचा व्यवसाय केला. होमरुल चळवळ व अन्य काही राजकीय चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. श्रद्धानंद या सावरकरवादी साप्ताहिकाचे ते सात वर्षे संपादक होते.[२]

लेखन[संपादन]

  • जाईचा मंडप खंड १ (इ.स. १९१३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • जाईचा मंडप खंड २ (इ.स. १९१४) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • मरण की लग्न (पूर्वार्ध इ.स. १९३३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • सेनापती तात्या टोपे (इ.स. १९४०)
  • हिंदूंचा विश्वविजयी इतिहास (इ.स. १९४४)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Veer Savarkar's Family Members" (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "सावरकर, नारायण दामोदर". मराठी विश्वकोश. २३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.