संभाजी कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

प्रा. संभाजी सोमा कदम (जन्म : देवगड-सिंधुदुर्ग, ५ नोव्हेंबर १९३२; मृत्यू : ठाणे, १५ मे १९९८) हे एक सर्जनशील कलावंत, कवी, कलाशिक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते.. त्यांची साहित्य, चित्र, शिल्प, संगीत या कलांमध्ये विशेष गती होती. साहित्यशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, तत्त्वज्ञान इत्यादीचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

संभाजी कदम हे मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्ट या संस्थेत अध्यापन करीत. कालांतराने ते संस्थेचे अधिष्ठाता झाले. निवृत्तीला अकरा वर्षे असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि केवळ लेखन हे काम हाती घेतले. मौज साप्ताहिकातून त्यांनी विरूपाक्ष या टोपणनावाखाली कलाप्रदर्शनांची परीक्षणे लिहिली; सत्यकथा मासिकातून चित्रसमीक्षा लिहिल्या आणि मराठी विश्वकोशात कलांतील विविध सिद्धान्तांची चर्चा करणारे लेख लिहिले.

प्रा. संभाजी कदम यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • कलास्वाद (कलास्वरूप शास्त्रावरचा एक महत्त्वाचा मराठी ग्रंथ)
  • पळसबन (कवितासंग्रह)

एकल चित्रप्रदर्शने[संपादन]

  • मुंबईच्या कॅम्लिन कंपनीने भरवलेले ओअॅसिस कलादालनातले चित्रप्रदर्शन (१९६९)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर म्हैसूर येथील चामराजेंद्र कला अकादमीत भरलेले चित्रप्रदर्शन (१९८५)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर मुंबईतील चेतना कलादालनातले प्रदर्शन (१९८८)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर मुंबईतील जहांगीर कलादालनातले प्रदर्शन (१९९७)
  • मुंबईतील Artist’s Centre येथील Homage Show (१९९९), वगैरे वगैरे.

पुरस्कार[संपादन]

  • डाॅली करसेटजी चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस (१९५६)
  • Bombay Art society & Maharashtra State Art exhibitionsमध्ये अनेक बक्षिसे


(अपूर्ण)

संदर्भ[संपादन]