विष्णू केशव पाळेकर
विष्णू केशव पाळेकर (३१ डिसेंबर, इ.स. १८८८ - ९ जुलै, इ.स. १९६७) हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे.[१] पाळेकर नागपूरला रहात. त्यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक असत.
'प्रज्ञालोक' या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या [ इ. स. १९५८ एप्रिल ] चैत्र पौर्णिमेला नागपूरला सुरू झाले. भारतीय राष्ट्रीय विचारसरणी तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण, पद्धतीनी मांडली जावी ही या त्रैमासिकाच्या मागची प्रेरणा होती. त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ. ब.स. येरकुंटवार असले तरी विष्णू केशव पाळेकर हे सर्वदृष्टीनी मासिकाचा आधार होते. (पुढे ते मासिक द्वैमासिक झाले आणि २०१४सालातही चालू आहे.)
विष्णू केशव पाळेकर हे भारतीय संस्कृतीचे जीवनव्रती प्रचारक समजले जात. वर्तमानपत्रात कुठे भारतीय संस्कृती बद्दल विपरीत, खोडसाळ लिखाण आल्यास सजगपणाने त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करून सत्य समोर मांडायचे हा त्यांचा बाणा होता. वर्तमानपत्रांतून त्यांचे असे अनेक 'वाद' गाजलेले आहेत.
वि.के. पाळेकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अण्णासाहेब पटवर्धनांचे चरित्र
- ऋग्वेदाचा संदेश
- ऐक्याचे खरे शत्रू
- दोन साम्यवाद
- द्वितीय दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती
- पातंजल योगसूत्रे
- ब्राह्मण एक प्रश्न
- भारतीय विवाहशास्त्र
- मराठेशाहीचा आदिसंत
- वैदिक संस्कृतीची पुनर्घटना
- शिक्षणाचा खेळखंडोबा
- सनातन्यांचे भवितव्य
- हिंदुकोडचे कृष्णकारस्थान
- The Brahmarshi's gospel, or, The transcendental bases of Vaidic religion and society
- The Science of Yoga (Volume 1 and 2).
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ संजय वझरेकर (३१ डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ८ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.