श्रीकांत बोजेवार
| श्रीकांत बोजेवार | |
|---|---|
|
श्रीकांत बोजेवार | |
| टोपणनाव | तंबी दुराई |
| राष्ट्रीयत्व | भारत |
| कार्यक्षेत्र | लेख, कथा, कादंबरी, पत्रकार, संपादक, चित्रपट लेखन |
| भाषा | मराठी |
| साहित्य प्रकार | लेख, कथा, कादंबरी |
| कार्यकाळ | १९९० पासून कार्यरत |
| प्रसिद्ध साहित्यकृती | पावणे दोन पायांचा माणूस, तंबी दुराई यांचे पाच खंड |
| वडील | वसंत बोजेवार |
| आई | वासंती |
| पुरस्कार | महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखनाचा पुरस्कार. २०२२ |
श्रीकांत बोजेवार हे मराठीतील पत्रकार, संपादक, चित्रपट समीक्षक, स्तंभ लेखक, लेखक आहेत. चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांनी लिहिली आहेत व त्या क्षेत्रातही कार्यरत आहेत.
सध्या दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत.
पत्रकारिता कारकीर्द
[संपादन]एकूण पत्रकारिता कारकीर्द १९९० पासून आतापर्यंत)
सकाळ- १९९०-१९९२ (उपसंपादक)
लोकसत्ता- उपसंपादक १९९२-१९९९, सहायक संपादक १९९९-२००९, निवासी संपादक २००९-२०११ (उपसंपादक व चित्रपट समीक्षक म्हणून प्रवेश. लोकरंग, हास्यरंग, रंगतरंग इत्यादी पुरवण्यांचे प्रमुख म्हणून काम. त्यानंतर निवासी संपादक)
महाराष्ट्र टाइम्स २०११- २०२२ निवासी संपादक, २०२२ पासून पुढे कन्सल्टंट ( सल्लागार)
वर्तमानपत्रांसाठी विशेष स्तंभ लेखन
[संपादन]लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत २००० साली ‘तंबी दुराई’ या टोपण नावाने ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर सुरू झाले. राजकीय, सांस्कृतिक उपहास आणि विनोद असलेल्या या स्तंभाला लोकप्रियता मिळाली. लोकसत्तामध्ये सलग १२ वर्षे हे सदर सुरू होते. त्यानंतर २०१२ च्या जानेवारीपासून ‘दीड दमडी’ या नव्या नावाने तेच सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर रविवारी प्रसिद्ध होत आहे. २०२४ हे तंबी दुराईचं २५ वं वर्ष आहे.
प्रकाशित पुस्तके
[संपादन]१)दोन फुल एक हाफ- खंड १, खंड २ आणि खंड ३ (या खंडांना सर्वोत्कृष्ट विनोदी साहित्याचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार)
२)दीड दमडी खंड १ आणि खंड २
३)पावणे दोन पायांचा माणूस. (कादंबरी) या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीचा बाबा पद्मनजी पुरस्कार.
या कांदबरीचा इंग्लिशमध्ये विक्रांत पांडे यांनी अनुवाद केला असून दिल्लीच्या वेस्टलँड प्रकाशनातर्फे तो २०२४मध्ये प्रकाशित झाला आहे. इंग्लिशमधील अनुवादाचे नाव: One and Three quarters [१]
४) शुक्रवार उजाडण्यापूर्वी (निवडक चित्रपट समीक्षणांचा संग्रह)
५) समांतर चित्रपट- (मराठी-हिंदी समांतर चित्रपटांचा थोडक्यात इतिहास आणि इसविसन २००० पर्यंतची समांतर चित्रपटांची सूची.)
या संशोधनासाठी १९९७मध्ये म्हाळगी प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली होती. [२]
६) बिरबलाने न सांगितलेल्या गोष्टी (बिरबलाच्या आधुनिक कथा)
७) अगस्ती-इन अॅक्शन (आजच्या काळातील गुप्तहेर कथा. तीन लघू कादंबऱ्यांचा संच)
या पुस्तकास लोकसेवा संघाचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार.
८)मीच एवढा शहाणा कसा? (विनोदी लेखांचा संग्रह)
९) गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बाल कथांचा संग्रह)
१०)आणि मी रस्ता ओलांडला… (‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकात गेल्या पंधरा वर्षात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
११) पुन्हा शुक्रवार उजाडण्यापूर्वी
१२) ‘क्ष क्षुल्लकची गोष्ट’ (विनोदी कथांचा संग्रह- रोहन प्रकाशन)
आगामी पुस्तके
[संपादन]• ‘राक्षस व पोपटाची अॅडल्ट कथा’ (कथा संग्रह- रोहन प्रकाशन)
• अगस्ती इन अॅक्शन- या मालिकेतील पुढील तीन कादंबऱ्यांचा संच (रोहन प्रकाशन)
दिवाळी अंक इत्यादी
[संपादन]दिवाळी अंक- महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पद्मगंधा, कालनिर्णय, मौज, हेमांगी, अनुभव, ललित, आमचा मराठवाडा, वयम् इत्यादी किमान २५ दिवाळी अंकांमधून कथा, ललित व इतर लेख.
संशोधन
[संपादन]( सध्या सुरू असलेला प्रकल्प)
लोकप्रिय आणि रहस्यरंजन प्रधान साहित्याचा गेल्या शंभर वर्षांचा धांडोळा तसेच या प्रकारच्या साहित्याकडे पाहण्याच्या वाचक-समीक्षक यांच्या दृष्टीतील फरक.
चित्रपट (लेखक म्हणून)
[संपादन]१)एक हजाराची नोट- (कथा, पटकथा, संवाद, गीत) या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि सर्व मिळून एकूण ३२ पुरस्कार प्राप्त.[३]
२)लोणावळा बायपास (पटकथा, संवाद)
३) ब्रेव्ह हार्ट- (पटकथा, संवाद, गीते) या चित्रपटातील अभिनयासाठी संग्राम समेळ यांस सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राज्य पुरस्कार.
४) ताठ कणा- (पटकथा,संवाद. प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामानी यांच्या आयुष्यावरील चित्रपट)
५) तहान- (कथा, पटकथा, संवाद)
६) भक्ती हीच खरी शक्ती- (संवाद)
७) सर्व लाईन व्यस्त आहेत- (गीत लेखन)
८) माझी आई- (पटकथा, संवाद)
९)स ला ते, स ला ना ते (कोलकाता, म्हैसूर चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार)
२)ओवा (कथा, पटकथा,संवाद, गाणी. प्रमुख भूमिका मकरंद अनासपूरे)
३) महामार्ग ( पटकथा,संवाद. उद्धव शेळके यांच्या कादंबरीवर आधारीत)
टीव्ही मालिका
[संपादन]१)बंड्याचा फंडा (राजकीय विनोद. एबीपी माझा)
२)टिकल ते पॉलिटिकल (राजकीय विनोद. इटीव्ही मराठी)
३) नांदा प्रेमभरे( दूरदर्शन. प्रमुख भूमिका विक्रम गोखले)
आगामी वेब सीरीज
[संपादन]१)अगस्ती या गुप्तहेर कथांवर वेब सीरीज.
सहभाग / सन्मान
[संपादन]१)गेली २५ वर्षे प्रभात चित्र मंडळ या प्रतिष्ठेच्या फिल्म सोसायटीचा कार्यकारिणी सदस्य
२)एशियन फौंडेशनचा संस्थापक विश्वस्त
३) मराठीत एकेकाळी प्रसिद्ध झालेल्या प्रमख मासिकातील दुर्मिळ लेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देत असलेल्या ‘पूनश्च’ या संकेत स्थळाचा एक संस्थापक.
४)साहित्य अकादमी सदस्य
५) विश्वकोश मंडळ- सदस्य
पुरस्कार
[संपादन]१)पत्रकार संघ पुरस्कार- २००५
२)प्र के अत्रे पुरस्कार-२००६)
३) विद्याधर गोखले पुरस्कार- २००६
४) भावे पुरस्कार-२००७
५) दाते साहित्य पुरस्कार-२००७
६)अत्रे प्रतिष्टान पुरस्कार-२००८
७)प्रियदर्शिनी पुरस्कार-२००९
८)सावरकर अक्षर पुरस्कार-२००९
९)अनंत पाटील ग्रंथालय पुरस्कार- २००९
१०) दत्तू बांदेकर पुरस्कार
११) महाराष्ट्र साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार २०१०
१२) मुक्तछंद पुरस्कार- २०१०
१३)मनोहर जोशी प्रतिष्ठान पुरस्कार २०१०
१४)माझा सन्मान पुरस्कार- २०११
१५) प्रभात पुरस्कार-२०१४
१६)संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१४
१७) मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार २०१४ [४]
१८) मॅजेस्टिक प्रकाशनचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार २०१९ [५]
१९)संत नामदेव पुरस्कार २०२२
२०)महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखनाचा पुरस्कार. २०२२
२१)पी. सावळाराम पुरस्कार-२०२३
२२) ठाणे मानबिंदू पुरस्कार
२३) नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा साहित्य पुरस्कार [७]
२४) राजहंस प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार
२५) विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार शांताराम कथा पुरस्कार [८]
२६) छत्रपती शिवाजी पुरस्कार २०२५
२७) पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार- क्ष क्षुल्लकची गोष्ट या पुस्तकासाठी २०२५
संदर्भ व टीप
[संपादन]- ^ इंग्लिश भाषेतील पुस्तकाची समीक्षा. "'One and Three Quarters' book review: A rare find that enchants".
- ^ Index of Realistic Hindi/ Marathi Movies (1947-1997), समांतर चित्रपटांची सुची. "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फेलिशिप १९९७".
- ^ एक हजाराची नोट, चित्रपटास पुरस्कार. "Marathimovieworld 'Ek Hazarachi Note' turns more richer'".
- ^ २०१४-१५ दोन फुल एक हाफ साठी. "वामन अनंत रेगे वाड्_मयीन पुरस्कार" (PDF).
- ^ दीड दमडी या विनोदी लेखनासाठी जयवंत दळवी स्मृती पुरस्कार https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/srikant-bojevar-received-the-dalvi-memorial-award/articleshow/70864644.cms
- ^ ‘जयवंत दळवी स्मृति पुरस्कार’ प्रदान करताना परीक्षकांच्या वतीने अवधूत परळकर यांनी केलेले भाषण https://kartavyasadhana.in/view-article/did-damadi-book-shrikant-bojewar-avdhoot-paralkar
- ^ सावाना पत्रकार पुरस्कार https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nashik-shrikant-bojewar-statement-of-writers-are-more-intolerant-than-politicians-marathi-news-dsp97
- ^ विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार ‘शांताराम कथा पुरस्कार https://deshonnati.com/vidarbha-sahitya-sangh-vadmay-award-announced/#google_vignette