मुकुंद टाकसाळे
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मुकुंद टाकसाळे (जन्म : ४ ऑक्टोबर १९५१) हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.
टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ललित मासिकात आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते.
पुस्तके[संपादन]
- आणखी गमतीगमतीत
- आनंदीआनंद
- उंदरावलोकन
- गमतीगमतीत
- टप्पू सुलतानी
- टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
- टांकसाळेतील नाणी
- तिरपागड्या कथा
- तेंडुलकर : असेही तसेही
- नाही मनोहर तरी
- पु. ल. नावाचे गारूड (संपादित)
- मिस्किलार
- मुका म्हणे
- राधेने ओढला पाय ...
- सक्काळी सक्काळी
- स(द)रमिसळ
- साडेसत्रावा महापुरुष
- हसंबद्ध
- हास्यमुद्रा
पुरस्कार[संपादन]
- चिं.वि. जोशी पुरस्कार
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार
- राधेने ओढला पाय या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा एक लाख रुपयांचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार.