झांसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झाशी या पानावरून पुनर्निर्देशित)

झाशी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. हे उत्तर प्रदेशच्या अत्यंत दक्षिणेला बेत्रवति नदीच्या काठावर बुंदेलखंड प्रदेशात आहे. झाशी हे झाशी जिल्ह्याचे आणि झाशी विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बुंदेलखंडचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते, झाशी हे पाहुज आणि बेत्रवति नद्यांच्या जवळ आणि आजूबाजूला सरासरी २८५ मीटर (९३५ फूट) उंचीवर वसलेले आहे. हे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीपासून सुमारे 420 किलोमीटर आणि राज्य राजधानी लखनऊपासून 315 किलोमीटर अंतरावर आहे.

१८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणीच्या ऐतिहासिक भूमिकेमुळे हे शहर विश्व प्रसिद्ध आहे.  तीन प्रमुख महामार्ग शहरातून जातात - राष्ट्रीय महामार्ग 27, राष्ट्रीय महामार्ग 39 आणि राष्ट्रीय महामार्ग 44.

गणेश मन्दिर[संपादन]

श्री गणेश मंदिर सभागृह
श्री गणेश मंदिर, झाँसी
श्री गणेश मंदिर, झाँसी
  • गणपति देऊळ

झाशी च्या ह्या गणेश महाराज गंगाधर राव आणि वीरांगना लक्ष्मीबाई यांचा विवाह झाले होते. हे मंदिर उत्तर भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात सिद्ध मंदिर आहे, त्याचे मान श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई आणि महाराष्ट्रातील दगडूशेठ मंदिराइतके आहे. हे गणपतीचे अति प्राचीन मंदिर आहे. जिथे दर बुधवारी शेकडो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.

बरुआ सागर, शिवपुरी, दतिया, ग्वाल्हेर, खजुराहो, महोबा, तोडी फतेहपूर, इत्यादी देखील झाशीजवळील पर्यटन स्थळे आहेत.

झाशीचे सुभेदार[संपादन]

  • राजा बिरसिंह देव – १६१३ – झाशीच्या किल्ल्याचा निर्माणकर्ता
  • महाराजा छत्रसाल – १७२९-१७४२ च्या सुमारास किल्ला यांच्याकडेच होता.
  • नारो शंकर – १७४२-१७५७ – नारो शंकर यांना पेशव्यांनी परत बोलावले.
  • माधव गोविंद काकिर्डे , बाबुलाल कन्हई – १७५७-१७६६
  • विश्वासराव लक्ष्मण – १७६६-१७६९
  • दुसरे रघुनाथराव नेवाळकर – १७६९-१७९५ : हे अतिशय उत्तम असे व्यवस्थापक होते, त्यांनी झाशी संस्थानाचा महसूल वाढवण्यास मदत केली. यांनीच महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले.
  • शिवराव नेवाळकर – १७९५ – १८१३
  • रामचंद्रराव नेवाळकर – १८१३ – १८३५
  • तिसरे रघुनाथराव नेवाळकर – १८३५ – १८३८ : १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला.
  • गंगाधरराव नेवाळकर – १८३८-१८४३ : १८४२मध्ये यांचे लग्न मनकर्णिका हिच्या बरोबर झाले. मनकर्णिकाचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. या पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने प्रसिद्ध झाल्या.
  • राणी लक्ष्मीबाई : १८४२- १८५८ (जन्म : १९ नोव्हेंबर १८३५ - १७ जून १८५८) - राणीचा जन्म काशी येथे झाला होता.

वडील - मोरोपंत तांबे; आई : भागीरथी तांबे
माहेरचे नाव : मनकर्णिका तांबे, टोपण नाव : मनू
राणी ४ वर्षाची असताना तिची आई वारली. तिचे वडील बिठूरमध्ये पेशवा न्यायालयात काम करत असत. पेशव्यांनीच नंतर मनूचा सांभाळ केला. तिने लग्नानंतर मुलाला (दामोदरराव) जन्म (१८५१) दिला पण तो जन्मानंतर ४ महिन्यातच मरण पावला. असे म्हणतात की राजा मुलाच्या मृत्यूनंतर परत सावरला नाही आणि २१ नोव्हेंबर १८५३ रोजी त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्ष्मीबाईंनी गंगाधरराव नेवाळकर यांच्या चुलत्याचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले. त्याचे नावही दामोदरराव ठेवण्यात आले.

  • १८५८ -१८६१ : इंग्रज अधिकारी
  • १८६१मध्ये इंग्रजांनी झाशीचा किल्ला आणि शहर जियाजीराव सिंदिया यांच्या हाती दिले.
  • १८८६मध्ये इंग्रजांनी झांशी परत घेतले.