अहिराणी बोलीभाषा
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
अहिराणी ही खानदेश प्रदेशात बोलली जाणारी पश्चिम हिंद-आर्य भाषा आहे व ती देवनागरी लिपीत लिहिली जाते. ही भाषा तिच्या प्रादेशिक नावावरून खानदेशी म्हणूनही ओळखली जाते तर ती मूळ अहिर लोकसमूहाची भाषा असल्या कारणाने ती अहिराणी म्हणून ओळखली जाते.
अहिराणी भाषा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम भागात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात बोलली जाते. महाराष्ट्राव्यतिरीक्त गुजरातच्या सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या पानसेमल, सेंधवा या तालुक्यांतही अहिराणी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गुजरातमधील डांग जिल्ह्यात बोलली जाणारी डांगी(डांगरी) ही सुद्धा खानदेशीचीच एक बोली म्हणून वर्गीकृत केली जाते.
१९११, १९२१ आणि १९३१ च्या जनगणनेत अहिराणी भाषिक लोक गुजराती म्हणून गणले गेले. परंतु नंतरच्या काळात खानदेशी एक स्वतंत्र भाषा म्हणून गणली जाऊ लागली.
खानदेशी | |
---|---|
अहिराणी | |
प्रदेश |
महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश |
लोकसंख्या | १८.६० लक्ष (२०११) |
बोलीभाषा |
अहिराणी डांगरी(डांगी) गुजरी भिलाऊ |
भाषाकुळ |
हिंद-युरोपीय
|
लिपी | देवनागरी |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ |
khn (खानदेशी) ahr (अहिराणी) |
![]() अहिराणी भाषेचा व्याप |
साहित्य
[संपादन]अहिराणी बोली, शब्दकोश, लोकसाहित्य आणि व्याकरण विषयक पुस्तके
[संपादन]- नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.
- अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) (डॉ. रमेश सूर्यवंशी) : अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश.
- " 'वऱ्हाडी' आणि 'अहिराणी' बोलींचा तौलनिक अभ्यास" डॉ. पुरुषोत्तम सदानंद तायडे
- अहिराणी बोली सुलभ व्याकरण (डॉ. रमेश सुर्यवंशी)
- खान्देशातील कृषक जीवन सचित्रकोश (डॉ. रमेश सुर्यवंशी)
अन्य पुस्तके
[संपादन]- अहिराणी : आंतरराष्ट्रीय भाषा (डाॅ. बापूराव देसाई)
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |