चांद्रयान २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रयान २ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ नंंतरची भारताची दुसरी चंंद्रमोहीम आहे. हेे यान इस्रोने बनवले असून, ते दिनांक २२ जुुुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा अवकाश केेंंद्रातूूून Geosynchronous Satellite Launch Vehicle मार्क ३ (GSLV MK III -M1)द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लँडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून त्यांना देशातल्या देशात विकसित करण्यात आले आहे.

चांद्रयान २
चांद्रयान २मोहीम = चांद्र कक्षाभ्रमर, लँडर, रोव्हर


नियंत्रक = इस्रो( भारतीय अवकाश संशोधन संस्था) (ISRO)


संकेतस्थळ = www.isro.gov.in[१]


मोहिमेचा कालावधी = कक्षाभ्रमर : १ वर्ष

विक्रम लँडर : < १५ दिवस

प्रज्ञान रोव्हर : < १५ दिवस

अवकाशयानाचे तपशील
उत्पादक = इस्रो (भारतीय अवकाश

संशोधन संस्था)

launch वस्तुमान = एकत्रित (आर्द्र) :

३,८५० किग्रॅ

एकत्रित (शुष्क) :

१,३०८ किग्रॅ


यानभाराचे वस्तुमान = कक्षाभ्रमर(आर्द्र) : २,३७९ किग्रॅ

कक्षाभ्रमर(शुष्क) :६८२ किग्रॅ

विक्रम लँडर (आर्द्र) :

१,४७१ किग्रॅ

विक्रम लँडर (शुष्क) :

६२६ किग्रॅ

प्रज्ञान रोव्हर : २७ किग्रॅ


शक्ती = कक्षाभ्रमर : १ कि वॅट

विक्रम लँडर : ६५० वॅट

ज्ञान रोव्हर : ५० वॅट

मोहिमेची सुरुवात
प्रक्षेपण दिनांक = २२ जुलै २०१९, १४:४३:१२ (भारतीय

प्रमाणवेळेनुसार)


प्रक्षेपक = GSLV MK lll


प्रक्षेपणस्थळ = द्वितीय सतीश धवन अवकाश केंद्र

प्रक्षेपण पट्टी


कंत्राटदार = इस्रो

चांद्रयान २

इतिहास[संपादन]

१२ नोव्हेंबर २००७ रोजी, रशियन सांघिक अवकाश संस्थेच्या व इस्रोच्या प्रतिनिधींनी 'चांद्रयान २' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर एकत्र कार्य करण्याचा करार केला होता. या प्रकल्पात इस्रोने कक्षाभ्रमर, रोव्हर तर रशियन सांघिक अवकाश संस्थेने लँडर तयार करण्याची मुख्य जबाबदारी स्वीकारली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली १८ सप्टेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत भारत सरकारने या मोहिमेला मंजुरी दिली. ह्या यानाचा आराखडा दोन्ही देशांतील वैज्ञानिकांच्या एकत्रित बैठकीने ऑगस्ट २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. इस्रोने या यानावरील भार (payload) वेळापत्रकाप्रमाणे निश्चित केला, मात्र ही मोहीम जानेवारी २०१३पर्यंत स्थगित करून पुन्हा २०१६ साली करण्याचे ठरवले. कारण रशियन सांघिक अवकाश संस्थेला लँडर वेळेत पूर्ण करणे शक्य नव्हते. २०१६ असणाऱ्या मोहिमेकरिता २०१५पर्यंत सुद्धा रशियन अवकाश संस्थेला हा लँडर, काही अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण करणे शक्य झाले नाही. मग मात्र भारताच्या इस्रो संस्थेने ही चांद्रमोहीम स्वतंत्रपणे पार पाडायचे निश्चित केले.

या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मार्च २०१८ला चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्याचे नक्की करण्यात आले. मात्र सुरुवातीला एप्रिलपर्यंत आणि नंंतर ऑक्टोबरपर्यंत काही अन्य अंतराळ वाहनांची चाचणी करण्याकरिता ही मोहीम स्थगित करण्यात आली. २०१९च्या पहिल्या अर्धवर्षात ह्या मोहिमेच्या चौथ्या सर्वसमावेश तांत्रिक चर्चामंडळाच्या सभेनंतर यानाच्या संरचनेत व अवतरण क्रमात काही बदल करण्यात आला.

फेब्रुवारी २०१९च्या चाचणीत, लँडरच्या दोन पायांना अल्पप्रमाणात हानी पोहोचली होती. ती दुरुस्ती झाल्यावर चांद्रयान २ चे प्रक्षेपण १४ जुलै २०१९ला ठरवण्यात आले. मात्र पुन्हा काही तांत्रिक गोंधळामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी १८ जुलै रोजी, इस्रोने २२ जुलै २०१९ हा दिवस चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी जाहीर केला.

अशाप्रकारे, चांद्रयान २ 'GSLV MK lll' ह्या प्रक्षेपकाद्वारे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २२ जुुलै २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:४३ (जागतिक प्रमाणवेळेनुुसार सकाळी ९:१३) वाजता अखेरीस प्रक्षेपित झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "चांद्रयान २".