तूप
तूप हे लोणी कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेच धार्मिक क्रियांमध्ये केला जातो.
तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे दुधामधील अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थ जास्त असतात त्यामुळे त्याचे तूप जास्त उतरते.
दुधापासून तयार होणाऱ्या लोण्यात सुमारे ८० ते ८२ टक्के स्निग्ध पदार्थ,१६ ते १७ टक्के पाणी व २ टक्के घन पदार्थ असतात. घी (संस्कृत : घृतम्), एक विशेष प्रकार का मख्खन (बट र) जो भारतीय उपमहाद्वीप मध्ये प्राचीन काळापासून भोजनाच्या एका अवयव रूप प्रयुक्त होताे. भारतीय भोजनात खाद्य तेलाच्या जागी प्रयुक्त होते. यह दूध के मक्खन से बनाया जाता है। दक्षिण एशिया एवं मध्य पूर्व के भोजन में यह एक महत्वपूर्ण अवयव है।
उत्पादन[संपादन]
तूप तयार करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करण्यात येतो:
घरगुती पद्धत[संपादन]
गायीचे किंवा म्हशीचे. दूध तापविल्यानंतर त्यात असणारे व तरंगणारे स्निग्ध पदार्थाचे कण वर येतात. ते उष्णतेने वितळतात. थंड होण्याचे क्रियेदरम्यान, त्याचा एक पातळ थर दुधावर निर्माण होतो. ते कण एकमेकांना चिकटून गार झाल्यावर तो थर जाडसर होतो. हीच साय आहे.
ही साय वेगळी काढून जमा केली जाते व त्यात विरजणासाठी विरजण घालण्यात येते.दह्यात असणारे लॅक्टिक बॅक्टेरिया हे दुधात (सायीत)असणाऱ्या लॅक्टोज (एक प्रकारची साखर) याचे विघटक करतात व त्याद्वारे सायीतल्या स्निग्ध पदार्थात असलेले प्रथिनांचे कण एकत्र होऊन त्याचे एक घट्ट जाळे निर्माण होते. ते साईचे दही मग घट्ट होते.
या तयार झालेल्या घट्ट दह्यास थोडे पाणी टाकून घुसळण्याने त्यात अंतर्भूत असलेल्या अमिनो आम्लाच्या साखळ्या सुट्या होऊन स्निग्ध पदार्थांच्या कणांचा गोळा बनतो. तेच लोणी आहे.
हे लोणी मंद विस्तवावर कढविल्याने त्याचे 'साजूक तूप' तयार होते. तूप कढविण्याने त्यात ॲंटिऑक्सिडंट्स तयार होतात. त्याचा शरीरास फायदा होतो. तूप थंड झाल्यावर घट्ट होते.
घरगुती तुपाच्या गुणवत्तेचे निकष[संपादन]
लोणी कढवितांना व त्यापासून घरगुती तूप बनवितांना साधारणतः खालील तीन ठोकताळे लावले जातात:
- लोणी तापवितांना त्यातील घन पदार्थ तपकिरी अथवा सोनेरी रंगाचे झाल्यास,
- भांड्यात बघितल्यावर,त्याचा तळ स्वच्छपणे दिसत असल्यास,
- त्यात दोन-तीन थेंब पाणी टाकल्यावर त्याचा कडकड असा आवाज आल्यास, (जास्त पाणी टाकल्यास ते अंगावर उडू शकते-हे करावयाचे असल्यास काळजीपूर्वकच करावयास हवे)
यानुसार, तूप पूर्णपणे तयार झाले असे समजतात. ते रवाळ होण्यासाठी त्यास डब्यात घालून ते हळुहळु थंड होऊ देतात.
पूर्वीच्याकाळी लोणी कढवतांना त्यात विड्याचे पान टाकीत असत. या पानात असलेल्या कॅल्शियममुळे तुपाच्या कणांना मोठे होण्यास मदत मिळते.त्यायोगे तूप रवाळ होते.[१]
औद्योगिक उत्पादन[संपादन]
तळणाचे माध्यम[संपादन]
तूप गरम केल्यावर वितळते. शुद्ध तूप तापविल्यावर, सुमारे १७५ डिग्री सेल्सियस इतक्या तापमानावर धूर येऊ लागतो. त्यामुळे कमी तापमानावर तळले जाणारे पदार्थ त्यात तळता येतात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ डॉ. वर्षा जोशी. ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, साजूक तूप Check
|दुवा=
value (सहाय्य). दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)