Jump to content

इंडिगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईंडिगो या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडिगो
आय.ए.टी.ए.
6E
आय.सी.ए.ओ.
IGO
कॉलसाईन
IFLY
स्थापना १५ ऑगस्ट २००६
हब इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई)
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर)
मुख्य शहरे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद)
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोची)
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)
चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ)
विमान संख्या ८४
मुख्यालय गुरगांव, हरियाणा
प्रमुख व्यक्ती राहुल भाटिया
संकेतस्थळ http://www.goindigo.in
सिंगापूर चांगी विमानतळावरून उड्डाण करणारे इंडिगोचे एरबस ए-३२० विमान

इंडिगो (IndiGo) ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३% इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.

इतिहास

[संपादन]

इंटरग्लोब एन्टरप्राइझेसच्या राहुल भाटिया आणि अमेरिकास्थित अनिवासी भारतीय राकेश गंगवाल या दोघांनी मिळून २००६ च्या सुरुवातीस ही कंपनी उभी केली. इंडिगोमध्ये इंटरग्लोबची ५१.१२% आणि गंगवालच्या व्हर्जिनियास्थित कॅलम इन्व्हेस्टमेंट कंपनीची ४८% गुंतवणूक आहे.[] २००६ च्या मध्यापर्यंत विमान सेवा सुरू करण्याच्या इराद्याने जून २००५ मध्ये या कपंनीने १०० एरबस ए ३२०-२०० विमानांची मागणी नोंदविली. जवळजवळ वर्षभरानंतर २८ जुलै २००६ रोजी इंडिगोला ही विमाने मिळाली. ४ ऑगस्ट २००६ रोजी नवी दिल्ली ते गुवाहाटीमार्फत इंफाळपर्यंत पहिले उड्डाण झाले. २००६ च्या अखेरीस इंडिगोकडे सहा विमाने आली होती.[] २०१२ पर्यंत इंडिगोच्या ताफयात ५० विमाने सामील झाली.

यानंतर इंडिगोने दरवर्षी प्रवासीसंख्या वाढवत नेली. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत इंडिगोने प्रवाशांना दिलेल्या स्वस्त दरातील सेवेमुळे किंगफिशर, जेट एअरवेज यांसारख्या कंपन्यासुद्धा स्पर्धेत मागे पडल्या.जानेवारी २०१३मध्ये जगामध्ये इंडोनेशियातील लायन एअरनंतर इंडिगो दुसऱ्या क्रमांकावर असलेली विमान कंपनी होती.[] एअरबस ए३२०-२०० जातीची विमाने वापरून इंधनवापरात बचत करणारी ही पहिली भारतीय कंपनी होती.[]

गंतव्यस्थाने

[संपादन]

इंडिगोची विमाने भारतात आणि भारताबाहेर रोजच्या ४५९ फेऱ्यांद्वारे ३६ शहरांकडे ये-जा करतात.[] पाच वर्षे देशांतर्गत सेवा केल्यानंतर जानेवारी २०११ मध्ये इंडिगोला आंतरराष्ट्रीय सेवा पुरविण्यास परवानगी मिळाली. १ सप्टेंबर, २०११ रोजी इंडिगोचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी दिल्ली ते दुबई दरम्यान झाले आहे.[] नंतर काही दिवसांमध्ये ही सेवा नवी दिल्ली आणि मुंबईपासून बँकॉक, सिंगापूर, मस्कत आणि काठमांडूपर्यंत वाढविण्यात आली.[]

इंडिगो एरलाइन्सची एअरबस ए३२०-२३२

इंडिगो रॅम्प

[संपादन]

व्हीलचेरने प्रवास करणाऱ्या अपंग, विकलांग प्रवाशांना रॅम्पद्वारे विमानात विनासायास प्रवेश करता येणे हे फक्त इंडिगोच्या विमांनामध्ये शक्य आहे. संपूर्ण जगामध्ये अशी सुविधा देणारी ही एकमेव विमानवाहतूक कंपनी आहे.

गंतव्यस्थाने

[संपादन]

इंडिगोची विमाने भारतातील ८५ व जगातीलइतर ३३ शहरांना जातात. रोज २,०००पेक्षा जास्त उड्डाणे होतात यांत आठवड्यात १७४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतात.[][][१०] दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंडिगोचे मुख्य ठाणे आहे.[११] याशिवाय बेंगलुरु[१२], चेन्नई, हैदराबाद[१३], कोलकाता, मुंबई आणि कोच्ची[१४] येथेही इंडिगोची ठाणी आहेत.

ताफा

[संपादन]

२०२४ च्या सुमारास इंडिगोकडे एअरबस कंपनीची ए३२०-२००, ए३२१ आणि एटीआर ७२ प्रकारची ३४१ विमाने आहेत. याशिवाय कंपनीने ९६३ विमानांची मागणी नोंदवलेली आहे.

विमान सेवेमधील मागणी प्रवासी नोंद
एरबस ए३२०-२०० २० - १८० सेवासमाप्तीच्या मार्गावर
एरबस ए३२०निओ १८२ २८३ १८० किंवा १८६ २०१६ पासून सेवारत
एरबस ए३२१निओ ९४ ६०२[१५] २२ किंवा २३२ २०१८ पासून सेवारत[१६]
एरबस ए३२१ एक्सएलआर - ६९ ठरले नाही २०२५पासून सेवारत
एकूण ३४१ ९६३

२०१० पर्यंत इंडिगोकडे ४० विमाने होती आणि २०१५-२०१६ ही संख्या १०० पर्यंत जाईल. फेब्रुवारी, २०१२ मध्ये पन्नासावे विमान कंपनीच्या ताफ्यात सामील झाले. व्हीटी-आयएफएच या नावाने नोंदणीकृत झालेले एरोप्लेन नावाचे विमान इंडिगोचे बासष्टावे विमान आहे.[१७] याशिवाय इंडिगोने ए३२० नियो प्रकारची विमाने २०१६ ते २०२५ च्या दरम्यान विकत घेण्याचा करार केलेला आहे.[१८]

नवीन विमानांची मागणी

[संपादन]

२००५ मध्ये पॅरिस एर शेा मध्ये इंडिगोने १०० एअरबस ए३२० प्रकारच्या विमानांची मागणी नोंदविली. पूर्ण शोमध्ये ६ अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या रकमेची केलेली ही मागणी विमानांच्या व्यवहारामधील विक्रम ठरली.[१९][२०] ११ जानेवारी, २०११ रोजी एअरबस ए३२०ची १८० व न्यू इंजिन ऑप्शनच्या (नियो) १५० विमानांसाठीचा करार करण्यात आला. व्यापारी वाहतुकीच्या इतिहासामधील ही सर्वांत मोठी मागणी म्हणून नोंदविली गेलेली आहे. इंडिगो एअबस ए३२०निओ प्रकारची विमाने उडविणारी पहिली कंपनी आहे. या कराराची एकूण किंमत १५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे.[२१][२२]

सेवानिवृत्ती

[संपादन]

६ वर्षापेक्षा जास्त जुनी झालेली विमाने इंडिगोमधून बाद केली जातात. ९३ विमानांपैकी अशी १६ विमाने लीझिंग कंपनीला[मराठी शब्द सुचवा] दिलेली आहेत.[२३]

रंगसंगती

[संपादन]

इंडिगोची सर्व विमाने जांभळया आणि पांढऱ्या रंगाने रंगविलेली आहेत. विमानाचा तळभाग जांभळया रंगाने रंगविलेला असून शेपटीखाली निळसर रंगाचे पट्टे असतात. विमानाच्या पांढऱ्या पृष्ठभागावर इंडिगोचे इंग्लिश नांव मोठया अक्षरांमध्ये लिहिलेले दिसते. विमानाच्या नाकाकडील भागावर बिंदूंचे नक्षीकाम केलेले असून इंजिनावर जांभळया रंगांमध्ये गोइंडिया.इन असे वेबसाईटचे नांव ठळक अक्षरामध्ये लिहिलेले असते.

विमानाअंतर्गत सेवा

[संपादन]

इंडिगोच्या विमानांत फक्त इकॉनॉमी वर्ग असतो. यांत खाद्यपदार्थ/मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

११ जानेवारी, २०११ रोजी विमान क्र.३३३ च्या कॅप्टन परमिंदर गुलाटीकडून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चुकीच्या पद्धतीने विमान उतरविले गेले.

मान आणि सन्मान

[संपादन]

इंडिगोला मिळालेले सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

  1. एअरलाईन पॅसेंजर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा सर्वोत्कृष्ट स्वस्त दरात सामान वाहतूक करणारी कंपनी[२४]
  2. सर्वोत्कृष्ट स्वस्त दरात सामान वाहतूक करणारी कंपनीसाठीचे गॅलिलिओ एक्सप्रेस ट्रॅव्हल ॲवॉर्ड्‌स [२४]
  3. सीएनबीसी आवाज ट्रॅव्हलकडून स्वस्त दरात सामान वाहतूक करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कंपनीसाठीचा ॲवॉर्ड[२४]
  4. स्कायट्रॅक्स ॲवॉर्ड - सर्वोत्कृष्ट स्वस्त दरात सामान वाहतूक करणारी कंपनी (२०१०,११,१२,१३)[२५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "इंडिगोमध्ये निम्म्यापेक्षाही जास्तीचा समभाग परकीय कंपन्यांचा[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). 2013-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "इंडिगोची विमानवाहतूक लवकरच सुरू" (इंग्लिश भाषेत). 2014-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "इंडिगोचे सर्वांत जास्त वेगवान विमान कंपनी म्हणून सर्वपरिचित" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "इंडिगोने इंधन बचतीसाठी एअरबस ३२० ची मागणी केली" (इंग्लिश भाषेत). 2013-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "इंडिगोकडे ८ नवीन विमानांचा ताबा, शहरामध्ये विमांनांची संख्या वाढली" (इंग्लिश भाषेत). 2014-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ हाशिम (२ सप्टेंबर २०११), फिरदौस. "इंडिगाचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "१ सप्टेंबर २०१२ रोजी इंडिगोचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "International Expansion: A Look At IndiGo's Moves Into Africa & Central Asia". Simple Flying (इंग्रजी भाषेत). 4 June 2023. 3 July 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "IndiGo is back with a bang, looking to start flights to many international destinations: CEO Pieter Elbers". The Economic Times. 17 February 2023. ISSN 0013-0389. 3 July 2023 रोजी पाहिले.
  10. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 6E नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  11. ^ "Profile on IndiGo". CAPA. 17 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 March 2016 रोजी पाहिले.
  12. ^ "IndiGo adds to Bengaluru base". Anna.aero. 16 February 2016. 9 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2016 रोजी पाहिले.
  13. ^ "IndiGo starts new domestic route from Hyderabad". Anna.aero. 6 August 2014. 19 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2016 रोजी पाहिले.
  14. ^ "IndiGo commences seventh route to Dubai". Anna.aero. 17 December 2014. 19 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2016 रोजी पाहिले.
  15. ^ "इंडिगोने ए३२०निओची १५० आणि ए३२० ची ३० विमानांची मागणी" (इंग्लिश भाषेत). 2014-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  16. ^ पीटीआय. "पहिले एरबस ए३२१-निओ इंडिगोच्या ताफ्यात दाखल". २०१९-०१-०२ रोजी पाहिले.
  17. ^ "व्हिटी-आयएफएच इंडीगो एअरबस ए३२०-२३२(डब्ल्यू एल) – सी एन ५४३७" (इंग्लिश भाषेत). 2013-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  18. ^ सौरभ (१३ जानेवारी २०११), सिन्हा. "इंडिगोची मागणी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  19. ^ "इंडियामधून एअरबसची ६ बिलियन डॉलरची मागणी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  20. ^ "एअरबसची मागणी आणि पुरवठा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  21. ^ "एअरबस आणि एअरएशिया यांची २०० विमानांची मागणी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  22. ^ "ऑन बोर्ड इंडिगो एअरलाइन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  23. ^ "इंडिगोचे काही प्रश्न" (इंग्लिश भाषेत). 2015-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  24. ^ a b c "सीएनबीसी आवाज ट्रॅव्हल ॲवॉर्ड २००९ चा पुरस्कार इंडिगो विमान कंपनीला" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  25. ^ "इंडिगोला स्कायट्रॅक्स ॲवाॅर्ड मिळाला" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवा

[संपादन]