नदीम-श्रवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नदीम-श्रवण ही बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक जोडी होती. नदीम सैफी व श्रवण राठोड ह्या दोन संगीतकारांनी मिळून अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. १९९० च्या दशकामध्ये नदीम-श्रवण बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय संगीतकार होते. त्यांनी आशिकी, साजन, दीवाना, दिल है के मानता नहीं, राजा, अग्नि साक्षी, राजा हिंदुस्तानी, परदेस इत्यादी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार आजवर ४ वेळा मिळाला आहे.

नदीम-श्रवणनी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, अभिजीत, एस.पी. बालसुब्रमण्यम, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम इत्यादी जवळजवळ सर्व आघाडीच्या गायकांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली.

श्रवण राठोड यांचे २०२१मध्ये कोरोनाच्या साथीत निधन झाले.[१]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ईसकाळ". ईसकाळ.कॉम. २०२१-०४-२३ रोजी पाहिले.