Jump to content

अंधाधुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंधाधून या पानावरून पुनर्निर्देशित)
Andhadhun (es); 盲舂舂風暴 (yue); Andhadhun (fr); Стреляйте в пианиста (ru); अंधाधुन (mr); Andhadhun (de); ଅନ୍ଧାଧୁନ (or); ملودی کور (fa); 调音师 (zh); ಅಂಧಾಧುನ್ (ಚಲನಚಿತ್ರ) (kn); अन्धाधुन (ne); اندھادھن (ur); অন্ধাধুন (bn); Andhadhun (it); Andhadhun (id); Andhadun (cy); Surman sävel (fi); 看不見的旋律 (zh-tw); 盲舂舂風暴 (zh-hant); अंधाधुन (hi); అందదున్ (te); 블라인드 멜로디 (ko); Andhadhun (en); اللحن الأعمى (ar); Слепота (bg); 盲目のメロディ〜インド式殺人狂騒曲〜 (ja) film indiano del 2018 (it); শ্রীরাম রাঘবন পরিচালিত ২০১৮ সালের চলচ্চিত্র (bn); film indien (fr); фильм 2018 года (ru); २०१८चा विनोदी व रोमांचक चित्रपट. श्रीराम राघवन दिग्दर्शित (mr); Film von Sriram Raghavan (2018) (de); ୨୦୧୮ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); فیلم ۲۰۱۸ هندی به‌کارگردانی سریرام راگاوان (fa); 2018年由斯里蘭姆·拉格萬執導的電影 (zh); अन्धाधुन श्रीराम राघवनद्वारा सह-लिखित र निर्देशित सन् २०१८ को भारतीय हिन्दी भाषाको हास्य आपराधिक थ्रिलर चलचित्र हो। यो चलचित्रलाई म्याचबक्स पिक्चर्सद्वारा निर्माण गरिएको थियो भने भायकम १८ मोसन पिक्चर्सद्वारा वितरित गरिएको थियो। (ne); 2018年のインドのコメディ映画 (ja); film India oleh Sriram Raghavan (id); film van Sriram Raghavan (nl); श्रीराम राघवन द्वारा निर्देशित 2018 की फिल्म (hi); శ్రీరామ్ రాఘవన్ దర్శకత్వం వహించిన చిత్రం 2018 (te); филм на Срирам Рагхаван от 2018 (bg); 2018 film directed by Sriram Raghavan (en); ffilm ddrama am drosedd gan Sriram Raghavan a gyhoeddwyd yn 2018 (cy); película de 2018 (es); ᱒᱐᱑᱘ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat) Андхадхун (ru); 盲舂舂風暴, 看不見的旋律 (zh); Andhadhun (fi)
अंधाधुन 
२०१८चा विनोदी व रोमांचक चित्रपट. श्रीराम राघवन दिग्दर्शित
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • नाट्य
  • black comedy film
  • गुन्हा व थरार
  • गुन्हेगारीवर आधारित चित्रपट
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Sriram Raghavan
  • Arijit Biswas
  • Yogesh Chandekar
  • Hemanth M. Rao
  • Pooja Ladha Surti
वितरण
  • video on demand
वर आधारीत
  • L'Accordeur
दिग्दर्शक
  • Sriram Raghavan
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • ऑक्टोबर ४, इ.स. २०१८ (कुवेत, संयुक्त अरब अमिराती)
कालावधी
  • १३९ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अंधाधुन एक २०१८ सालचा विनोदी व रोमांचक चित्रपट आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शिन केले असुन वायाकॉम१८ मोशन पिक्चर्सद्वारे याची निर्मिती आहे. या चित्रपटात तब्बू, आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. एका पियानो वादकाची ही कथा आहे जो एका चित्रपट अभिनेत्याच्या हत्येमध्ये अजाणतेपणाने गुंतला जातो.

चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ रोजी चित्रपटगृहात झळकला. समीक्षकांनी चित्रपटचे लिखाण व खुराणा आणि तब्बू यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. चित्रपटाने चार स्क्रीन पुरस्कार, चार झी सिने पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार व तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. हा चित्रपट ₹३२ कोटी च्या बजेटवर तयार झाला होता आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹४५६ कोटी पेक्षा जास्त कमाई केली.[][]

कथानक

[संपादन]

आकाश (आयुष्मान खुराणा) एक पियानो वादक असतो जो सोफीला (राधिका आपटे) भेटतो. ओळखीतून लवकरच त्यांच्यात जिव्हाळ्याचे प्रेमसंबंध बनवतात. आकाशच्या प्रतिभेने सोफी प्रभावित होते. एक निवृत्त अभिनेता, प्रमोद सिन्हाचे (अनिल धवन), आकाशकडे लक्ष वेधते आणि आपल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम सादर करण्यासाठी तो त्याला आमंत्रित करतो. आकाश सिंहासच्या फ्लॅटवर तेतो आणि प्रमोदची पत्नी सिमी (तब्बू) दरवाजा उघडते. आकाश अंधळा आहे याची खात्री पटवून सिमी त्याला पियानो वाजवण्यास सांगते. आकाश जनळच प्रमोदचा मृतदेह बघतो, पण अज्ञानाची नक्कल करत तो पियानो वाजवतो. तो बाथरूममध्ये लपून बसलेला मनोहरला (मानव विज) पाहतो; ज्याचे सिमीशी प्रेमसंबंध आहेत. आकाश पियानो वाजवत असताना सिमी आणि मनोहर मृत शरीर सूटकेसमध्ये भरतात.

आकाश हत्येचा अहवाल देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला मनोहर पोलिस असल्याचे समजते. दरम्यान, सिमी तिच्या वृद्ध शेजारीणीला पोलिस अधिकाऱ्याशी बोलताना ऐकते आणि तिला पण ठार मारते. जेव्हा सिमी आकाशच्या कॉफीमध्ये विष ओतते आणि त्यावर बंदूक रोखते, तेव्हा आकाश खरं सांगतो कि तो अंधळा नाही. पण सिमी त्याला विष पाजते व तो अंधळा होतो. दुसरीकडे सोफीला पण समजते की आकाश इतके दिवस नाटक करत होता. गुंगी मधून तो उठतो तेव्हा तो एका बेकायदेशीर अवयव रोपण चिकित्सालयामध्ये जागा होते. आकाशची कथा ऐकून डॉ. स्वामी (झाकीर हुसेन) आणि त्याचे सहाय्यक मुरली आणि सखू आकाशला वाचवण्याचा निर्णय घेतात आणि त्याला नवीन डोळे देण्याचे पण ठरवतात. अनेक घडामोडी मध्ये मनोहर आणि सिमी मारले जातात.

दोन वर्षांनंतर सोफीला आकाश भेटतो, जो अजूनही आंधळा असतो. आकाशने तिला संपूर्ण कहाणी सांगितल्यानंतर, सोफी आकाशला सांगतो की, त्याने डॉ. स्वामींकडून स्वतःची दृष्टी परत घ्यावी. शांतपणे, आकाश तिथून निघतो आणि आपल्या छडीचा उपयोग करून वाटेतली एक बाटली उडवतो.

निर्माण

[संपादन]

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा कडून आयुष्मान खुराणाने या चित्रपटाविषयी ऐकले आणि त्यावर काम करण्यास रस असल्याचे दाखवून राघवनशी संपर्क साधला. देहबोलीत काय फरक पडेल हे मला बघण्यास राघवनने दोन चाचण्या घेतल्या ज्यामध्ये नायक आंधळा आसण्याचे नाटक करतो आणि जेव्हा तो खरोखर आंधळा असतो. चित्रपटात पियानो वाजवणाऱ्या खुराणाने अनेक अंध विद्यार्थ्यांना भेट दिली आणि ते कसे आपले हात चालवता हे पाहिले.[] खुराणा यांनी लॉस एंजेलिसमधील पियानो वादक अक्षय वर्मा यांच्याखाली दररोज चार तास पियानोचा अभ्यास केला आणि चित्रपटात त्याने बॉडी डबल वापरली नाही.[] त्याने यास आपल्या कारकीर्दीतील "सर्वात आव्हानात्मक भूमिका" म्हणले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Andhadhun". Box Office India. 30 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Andhadhun Box Office Collection". Bollywood Hungama. 4 May 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Radhakrishnan, Manjusha (3 ऑक्टोबर 2018). "Ayushmann Khurrana, Tabu poised to thrill in 'Andhadhun'". Gulf News. 23 ऑक्टोबर 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 नोव्हेंबर 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Avinash Lohana (29 ऑगस्ट 2017). "Ayushmann Khurrana learns piano for Sriram Raghavan's thriller, Shoot the Piano Player". Mumbai Mirror. 22 जून 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 जुलै 2018 रोजी पाहिले.
  5. ^ Dubey, Bharti (8 ऑक्टोबर 2018). "Ayushmann on his blind act in Andhadhun: Director didn't use body double for my fingers". National Herald. 7 नोव्हेंबर 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 नोव्हेंबर 2018 रोजी पाहिले.