चिंतामणी नागेश रामचंद्र राव
सी.एन.आर.राव | |
पूर्ण नाव | चिंतामणी नागेशा रामचंद्र राव |
जन्म | ३० जून १९३४ बंगलोर, ब्रिटिशकालीन भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदु |
कार्यक्षेत्र | संशोधन |
पुरस्कार | पद्मश्री (इ.स. १९७४), |
वडील | हनुमंता |
आई | नागम्मा |
चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव (कन्नड: ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ ರಾಮಚಂದ್ರ ರಾಯ ; रोमन लिपी: Chintamani Nagesa Ramachandra Rao / C.N. R. Rao ;) (३० जून, इ.स. १९३४; बंगळूर; कर्नाटक - हयात) हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.
जीवन
[संपादन]रावांनी इ.स. १९५१ साली म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्रवेश घेतला व इ.स. १९५८ साली पीएच.डी मिळवली. त्यांनी इ.स. १९६३ ते इ.स. १९७६ या काळात कानपुरातील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या रसायनशास्त्र विभागात, तर इ.स. १९८४ ते इ.स. १९९४ या काळात बंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले.
सध्या (इ.स. २०११) ते बंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र येथे संशोधक प्राध्यापक व मानद अध्यक्ष म्हणून काम करतात.
पुरस्कार
[संपादन]- भारतीय केंद्रशासनाने रावांना पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवले आहे.
2014 भारतरत्न पुरस्कार प्राप्त
- चीनच्या विज्ञान अकादमीचा मानाचा पुरस्कार २०१२[१]
बाह्य दुवे
[संपादन]- "जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावरील चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा अल्पपरिचय" (इंग्रजी भाषेत).