पर्ड्यू विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्ड्यू विद्यापीठ
PurdueUniversitySeal.png
ब्रीदवाक्य
स्थापना इ.स. १८६९
संस्थेचा प्रकार विद्यापीठ
मिळकत १७८ कोटी डॉलर
कर्मचारी ६,६१४
Rector
कुलपती
अध्यक्ष फ्रान्स कोर्डोवा
संचालक
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी ४०,०९०
पदवी ३१,२९०
पदव्युत्तर ७,९३८
स्नातक
स्थळ वेस्ट लाफयेट, इंडियाना, अमेरिका
आवार
रंग
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.purdue.edu
Purduebanner.png


पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता १,५०,००० डॉलर्सची देणगी दिली म्हणुन त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. पर्ड्यू विद्यापीठाचे पहिले वर्ग सप्टेंबर १६ १८७४ रोजी ३ इमारतींमध्ये ६ शिक्षक व ३९ विद्यार्थ्यांमध्ये भरवले गेले.

पर्ड्यू विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वांत महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. क्रॅनर्ट व्यापारमहाविद्यालय हे देखील देशातील सर्वोत्कृष्ट व्यापारमहाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २०० हून अधिक विषयांमध्ये पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळते.

नील आर्मस्ट्राँग, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अतंराळवीर तर युजीन सेर्नन, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अतंराळवीर हे दोघेही पर्ड्यू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.