Jump to content

कार्त्यायनी अम्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्त्यायनी अम्मा
जन्म कार्त्यायनी अम्मा
इ.स. १९२२
चेप्पड, अलप्पुळा जिल्हा, केरळ
राष्ट्रीयत्व भारत, भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती वयाच्या ९६व्या वर्षी शालेय शिक्षण घेतले

कार्त्यायनी अम्मा (१९२२ चेप्पड,अलप्पुळा) ही एक भारतीय महिला आहे. अम्मा आपल्या वयाच्या ९६व्या वर्षी साक्षरता परीक्षा देऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या. यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. यासाठी अम्माला भारत सरकारकडून महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

कार्त्यायनी अम्माचा जन्म भारतातील केरळ राज्यातील, अलप्पुळा जिल्ह्यातील चेप्पड गावी इ.स. १९२२ मध्ये झाला.[] लहानपणी अम्माला रोजंदारीवर जावे लागत असे आणि त्यामुळे त्यांनी लहान वयातच शाळेत जाणे बंद केले. नंतर योग्य वेळी अम्माचे लग्न झाले. लग्ना नंतर त्यांना सहा मुले झाली. अम्मा रस्त्यावर सफाई कामगार आणि मोलकरीण म्हणून काम करत असत.[] अम्माच्या म्हणण्यानुसार त्या शाकाहारी असून दररोज सकाळी ४ वाजता न चुकता झोपेतून उठतात.[] इ.स. २०१८ साली, कार्त्ययानी अम्मा वृद्ध लोकांसाठीचे सामाजिक निवासस्थान लक्षम वीडू कॉलनी येथे राहायला गेल्या.[]

प्रसिद्धी

[संपादन]

अम्माच्या मुलीने आपल्या वयाच्या साठव्या वर्षी परीक्षा दिली. याच मुलीच्या प्रोत्साहनाणे प्रेरित होऊन अम्मांनी शिक्षण घेण्याचे ठरवले.[] ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी केरळ राज्य साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या अक्षरलक्षम (मिलियन लेटर) कार्यक्रमात सहभागी होऊन परीक्षा दिली. या परीक्षेत केरळ राज्यातून जवळपास ४०,३६२ लोकांनी परीक्षा दिली होती[][] अम्माला अलप्पुळा जिल्ह्यातुन परीक्षा देणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान मिळाला. याकामी अम्माच्या नऊ आणि बारा वर्षांच्या पणतुंनी अभ्यासात मदत करून वाचन आणि लेखनाचे धडे दिले.[][]

वाचन, लेखन आणि गणिताची चाचणी दिलेल्या, कार्त्यायानी अम्मांनी संभाव्य १०० पैकी ९८ गुण मिळवून परीक्षेत अव्वल दर्जा मिळवला.[] यावर बोलताना अम्मा म्हणाल्या,

"मी विनाकारण खूप अभ्यास केला. माझ्यासाठी या चाचण्या तर खूपच सोप्या होत्या".[]

परीक्षेमधील या यशानंतर, कार्त्ययानी अम्मा राष्ट्रीय पातळीवर एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या. मल्याळी चित्रपट अभिनेत्री मंजु वारियार अम्माला दिवाळीच्या दरम्यान भेटल्या; सी रवींद्रनाथ (केरळ शिक्षण मंत्री) यांनी त्यांना लॅपटॉप दिला; पिनाराई विजयन (केरळ राज्याचे मुख्यमंत्री) यांनी अम्माला गुणवत्ता प्रमाणपत्र दिले.[][][] इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार अम्माला वयाच्या १००व्या वर्षी पुढील स्तराची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे.[]

इ.स. २०१९ मध्ये कार्त्यायनी अम्मा 'कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग' (COL)च्या दूत बनल्या.[] मार्च २०२०, मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हातून कार्त्यायनी अम्माला इ.स. २०१९चा भारतीय महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठी अम्माला दिल्लीला विमानाने जायचे होते. परंतु अम्माने यापूर्वी कधीही विमानाने प्रवास केला नव्हता. कार्यक्रमाच्या काही दिवस आधी त्यांना माजी पुरस्कारप्राप्त एमएस सुनील यांनी विमान प्रवासाची माहिती देऊन आश्वस्त केले.[] नारी शक्ती पुरस्कार प्राप्त करणारी अम्माची आणखी एक सहकारी केरळातील भगीरथी अम्मा होती. भगीरथी अम्मा ह्या १०५व्या वर्षी अक्षरलक्षम परीक्षा उत्तीर्ण झालेली सर्वात वृद्ध व्यक्ती आहे.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Grannies of learning go digital". The New Indian Express. 2021-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "96-year-old to take literacy exam". The Hindu (इंग्रजी भाषेत). IST. 4 August 2018. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f g "96-year-old Karthyayani Amma clears Kerala's literacy exam, win hearts - A winner". The Economic Times. IST. 31 October 2018. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ a b Bagchi, Poorbita Bagchi (21 January 2019). "Kerala: At 96, Karthyayani Amma Becomes Commonwealth Learning Goodwill Ambassador". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 2020-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ Das, Ria (21 January 2019). "Karthyayani Amma Is Now Commonwealth Learning Goodwill Ambassador". She the people. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Karthyayani Amma, the star at 96, celebrates Diwali with Manju Warrier". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). IST. 7 November 2018. 2021-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  7. ^ "Education minister gifts laptop to Karthyayani Amma". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). IST. 8 November 2018. 2021-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  8. ^ "96-yr-old Karthyayani Amma becomes Commonwealth Goodwill Ambassador". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). IST. 20 January 2019. 2021-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  9. ^ "At 98, Karthyayani Amma prepares for 1st flight; to receive Nari Shakti Puraskar on Women's Day". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). 2021-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  10. ^ Staff (7 March 2020). "98 yrs old from Kerala to be presented Nari Shakti Puraskar: Here's Why?". The Dispatch. 2021-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.