किंकरी देवी
Indian environmentalist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२५ सिरमौर जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर ३०, इ.स. २००७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
किंकरी देवी (१९२५ - ३० डिसेंबर २००७) ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ती आणि पर्यावरणवादी होत्या.त्यांचा जन्म हिमाचल प्रदेश मधील असून तेथे होणाऱ्या बेकायदेशीर खाण आणि उत्खननाविरोधात आंदोलन करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. किंकरी देवी अशिक्षित असून त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. परंतु त्यांच्या मृत्यूपूर्वी काही वर्ष आधी आपली स्वाक्षरी कशी करावी हे त्यांनी शिकून घेतले होते.[१]
किंकरी देवी ह्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या गरिबीची बातमी एका पंजाबी भाषिक वृत्तपत्रात छापून आली होती. ही बातमी हिमाचल प्रदेशातील एका अमेरिकन धर्मादाय संस्थेला जेव्हा वृत्तपत्रातुन वाचण्यात आली, तेव्हा त्यांनी किंकरी देवींना योग्य ती मदत करून त्यांची गरिबी कमी केली.[२]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]किंकरी देवीचा जन्म इ.स. १९२५ मध्ये हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील 'घाटोन' गावात झाला. तिचे वडील दलित म्हणजेच तत्कालीन अस्पृश्य जातीचे मुख्य शेतकरी होते. किंकरी देवींनी आपल्या बालपणीच नोकर म्हणून काम सुरू केले. त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह बंदिस्त मजूर असलेल्या 'शामू राम' नावाच्या व्यक्ती सोबत झाला. अवघ्या काही वर्षात म्हणजे किंकरी देवी बावीस वर्षांच्या असताना त्यांच्या पतीस विषमज्वर नावाचा आजार झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.[१][२]
साफ-सफाई कामगार म्हणून नवीन नोकरीत काम करत असताना एकदा किंकरी देवीच्या लक्षात आले की, हिमाचल प्रदेशच्या डोंगराच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्यामुळे, पिण्याचे आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावेळी देवीने स्वतःच लक्षपूर्वक खाणकाम करण्याचा निर्णय घेतला.[३]
चळवळ
[संपादन]इ.स.१९८८ मध्ये किंकरी देवींनी तब्बल ४८ खाण मालकांविरोधात शिमला येथील हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळेस 'पीपल्स अॅक्शन फॉर पीपल इन नीड' (People’s Action for People in Need) या स्थानिक स्वयंसेवक गटाने देवीला पाठिंबा दिला. देवींनी यात असा आरोप केला की, चुनखडीच्या उत्खननात खाणकाम करणाऱ्या कंपन्या निष्काळजीपणा दाखवत असून त्यामुळे नद्या आणि पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. परंतु कोर्टात या दाव्याला नाकारले आणि खाण मालकांचा त्यात विजय झाला. परंतु स्वतःचा पराभव न मानता किंकरी देवीने न्यायालयाबाहेर तब्बल १९ दिवस उपोषण केले. न्यायालयाने हा मुद्दा गंभीरपणे विचार घेतला आणि अखेर न्यायालयाने खाणकामावर स्थगिती देण्याचा आदेश दिला. याविरुद्ध खाण मालकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले, परंतु जुलै १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले. या सर्व घटना प्रसंगाने किंकरी देवी केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.[३]
तत्कालीन अमेरिकेतील प्रथम महिला हिलरी क्लिंटन यांनी तिच्यावर स्वारस्य घेतले आणि त्याच वर्षी देवीला बीजिंगमधील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले. समारंभाच्या सुरुवातीला देवींच्या हातून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी देवींनी आपल्या लढ्याबद्दल माहिती दिली आणि सामान्य लोक आपला प्रभाव कसा टाकू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले.[४]
किंकरी देवींनी पर्यावरणवादाव्यतिरिक्त, आपल्या सारखे इतरांनी अशिक्षित राहूनये म्हणून अट्टाहास करत आपल्या गावात पदवी पर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्यास राज्य सरकार कडे पिच्छा पुरवला. अखेर इ.स. २००७ मध्ये महाविद्यालयाची गावात स्थापना करण्यात आली.[१][२][३] उतारवयात असल्याने अखेर किंकरी देवीचे चंदीगड मध्ये आपल्या वयाच्या ८२व्या वर्षी, ३० डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.[१]
पुरस्कार
[संपादन]१९९९ मध्ये देवीला स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पुढे चालून नारी शक्ती पुरस्कार नावाने ओळखला जाऊ लागला [२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d Pandya, Haresh (2008-01-06). "Kinkri Devi, 82, battled illegal mining in India". International Herald Tribune. 2008-02-21 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Kinkri Devi: Impoverished Dalit woman who became an unlikely celebrity after campaigning against mining in her home region". The Times. 2008-01-03. 2008-02-22 रोजी पाहिले.
- ^ a b c "She Was Not Literate. Yet the Brave Kinkri Devi Educated the World about the Environment". 7 February 2016 रोजी पाहिले.
- ^ "किंकरी देवी: वो महिला जो हिमाचल के जंगल और ज़मीन बचाने के लिए खनन माफ़िया से भीड़ गई थीं" (english भाषेत). २६ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)