चिन्ना पिल्लई
Indian microfinancier | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | 1960s | ||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
चिन्ना पिल्लई या तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील, पुल्लीसेरी नामक छोट्याशा गावातील एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] त्यांनी तामिळनाडूमधील खेड्यांमध्ये एक अतिशय यशस्वी बँकिंग प्रणाली सुरू केली आणि महिलांचे सक्षमीकरण करून गरिबी आणि कर्जाच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करणारी एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ती आहे.[२] पुल्लुचेरी या कर्जबाजारी गावातील महिलांमध्ये बचत गटाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा हेतू इतका यशस्वी झाला की लवकरच या प्रदेशात या सम अनेक गट निर्माण झाले. पिल्लई यांच्या समर्पण आणि योगदानामुळे कलंजियम, सूक्ष्म बचतगट चळवळीला मोठी चालना मिळाली, ज्यामुळे गरिबीखाली जगणाऱ्या अनेक महिलांपर्यंत ही योजना पोहोचली.[३]
चिन्ना पिल्लई अशिक्षित आहेत आणि त्या फक्त स्वतःच्या नावाची सही करू शकतात. परंतु केवळ आपल्या वाकचातुर्याच्या कौशल्यामुळे त्या एक नेता म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांनी कामगारांच्या बाजूने लढा लढला ज्यामुळे मालक लोकांच्या लक्षात आले की आता जास्त वेतन देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांना फारसा अनुभव आणि माहित नसताना स्थानिक तलावात मासेमारीचा ठेका घेण्यासाठी बोली लावली. हे पारंपारिकपणे स्थानिक श्रीमंत जमीनमालकांचे राखीव तलाव होते म्हणून जेव्हा त्यांनी हा करार जिंकला तेव्हा त्यांनी पिल्लई वर प्रतिहल्ला केला. या लोकांनी त्यांना आपल्या कामावर घेण्यास नकार दिला. म्हणून मग पिल्लई आणि त्यांचा गट गावाबाहेर कामाला गेला. हा गट आता स्वतःची मत्स्यशेती करतो.[१]
पुरस्कार
[संपादन]इ.स. १९९९ मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार मिळविणाऱ्या पाच महिलांपैकी चिन्ना पिल्लई एक होत्या. हा स्त्री शक्ती पुरस्कार आता नारी शक्ती पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना आदराने नतमस्तक झाले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. [४] त्यानंतर पिल्लई यांना इ.स. २०१९ मध्ये आपल्या या सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Menon, Rasmesh (15 January 2001). "The Negotiator". Rediff. 7 July 2020 रोजी पाहिले.
- ^ Dharmaraj, Vidyashree (23 March 2002). "Woman Achiever". The Hindu. 28 November 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Doraisamy, Vani (24 January 2007). "Chinna Pillai to embark on a major mission". The Hindu. 15 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Rajachandrasekaran, Anitha (5 March 2005). "On an EQUAL footing". The Hindu. 20 November 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards 2019 Announced: Full list of awardees". The NEWS Minute. 25 January 2019. 25 January 2019 रोजी पाहिले.