भागीरथी अम्मा
Indian centenarian and winner of Nari Shakti Puraskar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | c. इ.स. १९१४ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै २२, इ.स. २०२१ | ||
नागरिकत्व | |||
पुरस्कार |
| ||
| |||
भागीरथी अम्मा (१९१४ - २२ जुलै २०२१) ह्या केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यातील एक रहिवासी होत्या. वयाच्या १०५व्या वर्षी अम्माने केरळ राज्यातील 'अक्षरलक्षम' मोहिमे अंतर्गत परत शिक्षण घेतले आणि त्या राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीस आल्या. भगीरथी अम्माला राष्ट्रपतींकडून महिलांसाठीच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या या जिद्दीचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला होता.[१]
पूर्वायुष्य
[संपादन]भागीरथी अम्मांचा जन्म इ.स. १९१४ मध्ये ब्रिटिश भारतातील प्रकुल्लम, जिल्हा कोल्लम, केरळ येथे झाला होता.[२] भागीरथी अम्मा लहान असतानाच बाळंतपणात त्यांची आई मरण पावली. त्यामुळे अम्मावर त्यांच्या लहान भावंडांची जिम्मेदारी येऊन पडली. तिसाव्या दशकात म्हणजे लग्नानंतर अल्पावधीतच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे अम्मावर त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची जिम्मेदारी एकटीवर येऊन पडली.[३] अम्माला पाच ते सहा मुले, १३ ते १६ नातवंडे आणि १२ पणतू असल्याची नोंद आहे. अम्माला दुरचित्रवाहिनी वर क्रिकेट आणि दैनंदिन मालिका पाहायला आवडत असे.[४][२]
वयाच्या १०५व्या वर्षी अम्मांनी आपले शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि गणित, मल्याळम भाषा आणि पर्यावरण विज्ञान या विषयांची परीक्षा दिली. अम्माच्या वयाची अडचण लक्षात घेऊन केरळ साक्षरता मिशनने अम्माला तीन दिवसात घरून परीक्षा देण्याची परवानगी दिली. या परीक्षेत अम्माने २७५ पैकी २०५ गुण मिळवले आणि समतुल्य परीक्षा देणारी सर्वात वयस्कर व्यक्ती अशी त्यांना मान्यता मिळाली.[२][५]
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]अम्माला इ.स. २०१९ मधील नारी शक्ती पुरस्कार देण्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अम्माची विशेष स्तुती केली आणि म्हणले की, "जर आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपण स्वतःचा विकास केला पाहिजे, जर आपल्याला जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठीची सर्वप्रथम अट आहे की आपल्यातील विद्यार्थी हा कधीही मरणार नाही."[१] याच वर्षीच्या आणखी एक विजेता केरळातीलच ९८वर्षीय कार्त्यायनी अम्मा ह्या आहेत.[१][६]
अम्मा प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण लवकरच त्यांना दरमहा १५००₹ पूर्वलक्षी निवृत्ती वेतन सुरू करण्यात आले. काही अडचणी आणि वयोमानानुसार अम्माला आधार कार्ड मिळवण्यासाठी यापूर्वी बायोमेट्रिक माहिती जोडणे शक्य झाले नव्हते. परंतु नंतर एका राष्ट्रीयकृत बँकेने अम्माला याकामी पुढाकार घेऊन योग्य ते सहकार्य केले.[१][६]
मृत्यू
[संपादन]२२ जुलै २०२१ रोजी उतारवयाशी संबंधित आजारांमुळे अम्मांचे वयाच्या १०७व्या वर्षी निधन झाले.[७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d "After PM's praise, oldest learner Bhageerathi Amma set to get Aadhaar". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). PTI. 27 February 2020. 1 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Varma, Vishnu (20 November 2019). "Kerala's literacy history gets new ambassador: 105-year-old Bhageerathi Amma". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 17 June 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "105-year-old Bhageerathi Amma Sits for Fourth Standard Exams at Kerala's Kollam". News18 (इंग्रजी भाषेत). 20 November 2019. 21 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ Adhikari, Somak (5 March 2020). "Meet Karthiyani & Bhageerathi Amma, They'll Get Nari Shakti Puraskar For Academic Excellence". India Times (इंग्रजी भाषेत). 11 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ Staff Reporter (6 February 2020). "105-year-old student from Kerala clears all Class 4 papers". The Hindu (इंग्रजी भाषेत). 6 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "Old-age pension for 'grandmother of learning' Bhageerathi Amma". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). 12 March 2020. 1 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bhageerathi Amma passes away". The Week. 23 July 2021. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Kerala's 'oldest learner' Bhageerathi Amma no more - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.